
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
शिरुर पोलिसांनी पकडला बेकायदा वाळुचा डंपर !
शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील कारवाई !
शिरुर,दिनांक – 31 डिसेंबर 🙁 डॉ. नितीन पवार,संपादक यांच्याकडुन )
शिरुर पोलिसांनी बेकायदा वाळुचा डंपर पकडला आहे.शिरुर तालुक्यातील गुनाट गावात ही कारवाई करण्यात आली आहे.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आल्यानुसार हकिकत अशी की फिर्यादी सचिन आजिनाथ भोई ,पोलीस अंमलदार, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे दिनांक 29 /12/ 2024 रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुनाट गावच्या हद्दीत चौफुला तालुका -शिरूर जिल्हा -पुणे येथे
1) MH 12 WX 6199 या डंपर मध्ये चार ब्रास वाळू किंमत अंदाजे रुपये 30, 32,000/- रुपये.
2) MH12 PQ 0099 यामध्ये चार ब्रास वाळू किंमत अंदाज 30,32,000/-रुपये.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog——
ही चोरून घेऊन जात असताना सापडली. तेव्हा त्यावरील अज्ञात चालक हे पळून गेले आहेत. त्या अज्ञात चालक आणि डंपरच्या मालकाच्या सांगण्यावरून वाळूची चोरी करून ती वाहतूक करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. डंपर वरील अज्ञात चालक व मालक यांच्याविरुद्ध फिर्यादी सचिन आजिनाथ भोई, पोलीस अंमलदार, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे,
सरकार यांच्या तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
अज्ञात वाळु चोर व डंपर मालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.सुद्रिक हे आहेत. पुढील तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक श्री. चव्हाण हे करत आहेत.