'भिम छावा' संघटनेच्या वतीने पालकवर्गाचे आंदोलन पुण्यात करण्यात आले आहे. या आंदोलनात 'भिम छावा' च्या कार्यकर्यांनी शिक्षण मंडळ प्रशासकिय अधिकार्यांना घेराव घातला. त्यानंतर चर्चा झाली. प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिक्षण मंडळ प्रशासकिय अधिकारी सौ.वाखारे मॅडम यांनी दिले आहे.
‘भिम छावा’ चा शिक्षण मंडळ प्रशासकिय अधिकार्यांना घेराव !
शिरुर,दिनांक 25 जुलै : ( प्रकाश डंबाळे,शिरुर यांच्याकडुन )
‘भिम छावा’ संघटनेचे प्रमुख शाम गायकवाड निवेदन देताना !
‘भिम छावा‘ संघटनेच्या वतीने पालकवर्गाचे आंदोलन पुण्यात करण्यात आले आहे. या आंदोलनात ‘भिम छावा’ च्या कार्यकर्यांनी शिक्षण मंडळ प्रशासकिय अधिकार्यांना घेराव घातला. त्यानंतर चर्चा झाली. प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिक्षण मंडळ प्रशासकिय अधिकारी सौ.वाखारे मॅडम यांनी दिले आहे.
” याठिकाणी भिम हा महाभारतातील भिमासाठी वापरलेला शब्द नाही.तर डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी वापरला आहे .त्याचे नाव भिमराव रामजी आंबेडकर असे होते.भिवा असेही त्यांना त्यांच्या लहाणपती घरात म्हटले जायचे. भिवा ,भिमराव , पासुन बाबासाहेब व Symbol of Knowledge हे जागतिक स्तरावर विशेषण आज डा. बाबासाहेब आंबेडकर यांना आहे.
डा.बाबासाहेब आंबेडकर जिनीयस होते.बहुआयामी ,अष्टपैलु ,रुबाबदार व्यक्तीमत्व होते.त्यांचा लेखनात जगभरातील तत्कालिन ज्ञानक्षेत्रातील सर्व विषयांवर स्वतंत्र चिंतन व प्रचंड व्यासंगाची जोडही होती. बाबासाहेबांवर भरपुर लेखन त्यांच्या हयातीतही झाले होते.मृत्युनंतर त्याच्याही काही पट लेखन झाले आहे.त्यांच्या लेखनाचे 24 खंड सरकारने प्रकाशित करुन त्यांचे चिंतन देशाला उपयोगी पडावे म्हणून प्रकाशित करुन अत्यंत अल्प किंमतीत उपलब्ध करुन दिले आहे.पुण्यातील बार्टी कडे ती व इतर अनेक पुस्तके विकत मिळतात.
बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन देश बदलण्याचा एक कार्यक्रमच दिला.तसेच हा देश अखंड,सुरक्षित, प्रगत आणि ज्ञानमार्गी व्हावा अशा पद्धतीने अगदी क्लिष्ट समस्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी आगाऊ तरतुदी केल्या.त्याची नंतर आवश्यकता लागेल,अशी त्यांचे दुरदृष्टीयुक्त चिंतन होते.ते निपक्षपाती ,सडेतोड होते.त्यामुळे ते ईसम म्हणजे ‘वाद’ बनले.तत्वज्ञान बनुन आंबेडकरवाद बनले.आंबेडकरवादी या तत्वज्ञानाने निर्माण केले.जे भारत आणि भारताबाहेरही आहेत.
‘संविधान जागृती कार्यक्रमात बौद्ध बहुल देशांतील युवक व त्यांचे राष्टध्वज !
अशा उत्तुंग व्यक्तीमत्वाचा प्रभाव दिर्घकाळ राहणार हे निश्चित आहे.त्यांची गरज व आसरा विद्यमान सरकारने चालवलेल्या घटनाविरोधी कृत्यांमुळे ,हुकुमशहीवजा कार्यपद्धतीमुळे अनेकांचे धाबे दणाणले.पुर्वी ते एका जातीच्या हिताचेच आहे,असा अगदी भिकार समज बहुसंख्येने होता.पण तसे नसतेकोनतेच आधुनिक ‘संविधान ‘ पक्षपाती बनवता येत नसते.जेव्हा दोन दोन विद्यमान मुख्यमंत्री जेलमधे पाठवले गेले.कुणाचीच गय न करता आपल्या छावणीत प्रत्येक राज्यातील अनेकांना आणले गेले तेव्हा हा देश हादरला.मग सुरक्षिततेचा खरा मार्ग कोनता हा प्रश्न उपस्थित झाला.त्याचे उत्तर पुन्हा संविधान असेच मिळाले.
संविधान जागृती कार्यक्रमात डा.नितीन पवार व ‘बार्टी’चे समता दुत…
सर्व लोक हे संविधानाचे लाभार्थी आहेत हे लक्षात आले.अगदी पंतप्रधान सुद्धा ! ‘संविधान ‘ नसते तर एखाद्या चहावाल्याला भांडवलशाही,सरंजामशाही आणि धर्मशाहीने कशाला देशाच्या सर्वोच्च पदावर बसवले असते? एवढा साधा तर्क आहे.लोकांमधून प्रतिनीधी कशाला निवडले जातील?थेट वरुन आलेल्या आदेशानुसार, हुकुमानुसार नेमणूक केली गेली असती.कोणी आवाज काढला तर तत्काळ त्याचा आवाज कायमचा बंद केला गेला असता.किम जोंग उन करतो तसा !
सारांश लोकशाही संविधान वाचवण्यासाठी सर्व एकत्र आले.जनतेची त्याबाजुने कौल दिला आणि संकटातून वाचवले. म्हणून आज केंद्रातील सरकार नियंत्रणात राहू लागले आहे. हा भारतीय लोकांनी दाखवलेला दुर्मिळ शहाणपणा होता.सत्ताधारी आणि विरोधकही प्रबळ असलेलं चांगलं असतं ! दोघे एकमेकांना नियंत्रित करु शकतात. आणि तसेच घडले.
तर अशा प्रबळ प्रेरणांपैकी एक लिजेंड डा.बाबासाहेब आणि त्यांचे काम व विचार आहेत.फार मोठ्या गैरसमजातुन की संविधान एका जातीचे किंवा जातीसमुहाचेच भले करण्यासाठी लिहिलेले आहे या मुर्खपणाच्या विचारातुन या देशातील माणुस आजमितीला बाहेर पडला आहे.हे फार मोठे कार्य घडले.
त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणा दिर्घकाळ राहणार आहेत.त्यांच्या कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी यापुढे देखील छोट्या असो वा मोठ्या चळवळी,आंदोलने,पक्ष,संघटना निर्माण होत राहतील ! भिम छावा संघटना ही अशीच एक छोटी पण ध्येयवादी तरुणांची संघटना कार्यरत असणे,हा त्याचाच एक पुरावा आहे.”
भिम छावा संघटनेचे प्रमुख शाम गायकवाड. ….
भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड या वेळी स्वतः जातीने उपस्थित होते.छोटे प्रश्न असोत की मोठे प्रश्न शाम गायकवाड हे स्वतः आंदोलने करतात.त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडत असतात. ते ताडीवाला रोड,पुणे येथे राहतात.परंतु पुणे शहर व महाराष्ट्र भर या संघटनेचे जाळे पसरत आहे. शेकडो लोकांचे प्रश्न कोनताही भेदभाव, गाजावाजा न करता ते सोडवत असतात.शिरुर शहरात देखील भिम छावा संघटनेचे काम चालते.’भिम छावा’
समस्या समजुन सांगताना शाम गायकवाड !
समस्या शाळेची वेळ बदलल्याने….
ताडीवाला रोड भागातील पुणे मनपाची ‘महात्मा ज्योतिबा फुले’ शाळा क्रमांक- 97 या शाळेची वेळ बदललेली आहे. बदललेली वेळ पालकांना सोयस्कर नाही . कारण येथील पालक गोरगरीब कष्टकरी, दिनदलित जे की, धुणी भांडी, बिगारी काम करून आपल्या मुलाला शिक्षणासाठी या शाळेत पाठवतात .सकाळी कामे असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे सध्या पालकांसाठी अडचणीचे ठरले आहे. विद्यार्थांनाही अडचणीचे होत आहे. विद्यार्थीही सकाळी लवकर उठून शाळेत येत नाहीत.याचा परिणाम पटसंख्येवर होऊन शाळा बंद होण्याच्या मार्गावर जात आहे.
म्हणून येथील पालकांनी भिम छावा संघटनेशी संपर्क केला . त्यानंतर आज ‘भिम छावा’ संघटनेच्या वतीने सर्व पालकांना घेऊन पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ प्रशासकीय अधिकारी सौ.वाखारे मॅडम यांना घेराव घातला गेला. हे पालक आंदोलन ‘भिम छावा’ संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या आंदोलनाचे संयोजन संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी केले. या वेळी मंगेश कांबळे,सोहन पवार, गोविंद पाटणेकर, संघभूषण साखरे इत्यादी कार्यकर्त्यांसहित मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता .
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com