BMC Budget 2026: मुंबई महापालिकेचा खर्च आणि उत्पन्न असतो तरी कसा?
BMC Budget ची ताजी आकडेवारी, सत्य ल सविस्तर विश्लेषण
दिनांक 19 जानेवारी 2026|महाराष्ट्र भरातील नागरिकांना उपयुक्त लेख|
BMC Budget 2026: मुंबई महापालिकेचे उत्पन्न व खर्च, ₹74,427 कोटी बजेट इतका साधारणपणे,Capex vs Revenue Expenditure, नागरिकांवर परिणाम, इ. सविस्तर मराठीत.
(Mumbai BMC Budget Analysis in Marathi
“पैसा किती आहे हे महत्वाचे आहेच , पण यापेक्षा तो कसा खर्च होतो, कशावर खर्च होतो,समतोल विकासावर होतो का? यावर शहराचं भविष्य ठरतं.”
मुंबई महानगरपालिका (BMC) ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे.हे आपल्या सर्वाना माहिती आहे. केन्द्र सरकारला सर्वात जास्त कर मुंबईतुन जातो.
तरीही मुंबईकरांच्या व सर्व महाराष्ट्रातील लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न सतत येतो. कुतुहल असते.पण नेमकी माहिती नसते.
👉 इतकं मोठं बजेट असूनही मुंबई मधे ( राज्यातील इतर शहरांत) ही रस्ते, पाणी, आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न कायमच कसे आहेत?का?
या लेखात आपण Mumbai BMC Budget 2025–26, मुंबई महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च, Capex vs Revenue Expenditure, व नागरिकांवर होणारा प्रत्यक्ष परिणाम
हे सगळं ताजी आकडेवारी आणि सोप्या भाषेत समजून घेण प्रयत्न करत आहोत.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिका बजेट 2025–26: ताजी आकडेवारी
💰 एकूण BMC बजेट: ₹74,427 कोटी
🏗️ भांडवली खर्च (Capital Expenditure): ₹43,162 कोटी (सुमारे 58%)
🧾 दैनंदिन/प्रशासकीय खर्च (Revenue Expenditure): ₹31,205 कोटी (सुमारे 42%)
असा साधारण आहे.
👉 यावरून स्पष्ट होते की मुंबई महापालिकेचा भर मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर अधिक आहे.त्याला विरोध आहे, असे नाही. पण शहरातील लोकांचे दरडोई उत्पन्न,घराची स्थिती,दर्जेदार आरोग्य व्यवस्था, दर्जेदार शिक्षण व्यवस्था यांचा स्तर उन्चावला का जात नाही? हा एक रास्त प्रश्न निर्माण होतो, असे आम्हाला का वाटु नये?
मुंबई महापालिकेचे उत्पन्न कुठून येते? |BMC Revenue Sources|
मालमत्ता कर |Property Tax Mumbai|
BMC चा सर्वात मोठा आणि स्थिर उत्पन्नाचा स्रोत हा आहे.
घर, दुकान, ऑफिस, मॉल यांवर आकारणी होत असते.
रिअल इस्टेट मार्केटवर थेट अवलंबित्व असते.
“कर जनता भरते, म्हणून सेवा मागतो — हा अधिकारच आहे.”
विकास शुल्क व बांधकाम परवाने
पुनर्विकास प्रकल्प मधून कर मिळतो.
नवीन इमारती, प्रीमियम यामधुन कर मिळतो.
शहर वाढेल तसा महसूल वाढत जातो.
पाणी कर व सेवा शुल्क
घरगुती व व्यावसायिक पाणी वापर करण्याचा कर नागरिक भरतात.
पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी वापर यातुन होतो.
जाहिरात कर व व्यवसाय परवाने
होर्डिंग्स, डिजिटल जाहिराती यामधुन देखील कर मिळतो.
दुकाने, हॉटेल्स, उद्योग परवाने यामधुनही कर मिळतो.
राज्य व केंद्र सरकारचे अनुदान
आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन इ. साठी अनुदान मिळते.
विशिष्ट योजनांसाठी मर्यादित निधी महापालिकेला मिळतो.
मुंबई महापालिकेचा खर्च कुठे होतो? |BMC Expenditure Breakdown|
भांडवली खर्च म्हणजे काय? |Capital Expenditure Meaning|
रस्ते, पूल, ड्रेनेज यांवरील खर्च
पूरनियंत्रण प्रकल्पावरील खर्च
पाणीपुरवठा योजनेवरील खर्च
दीर्घकालीन शहरी विकास हेतुने होणारा खर्च.
फायदा: भविष्यातील शहर मजबूत (Infrastructure) निर्माण होणे अपेक्षित असते.पण ते त्या कामान्च्या दर्जावर ठरणार आहे. तोटा: आजच्या समस्या लगेच सुटत नाहीत. त्या तशाच राहतात. अशी स्थिती नेमकी किती काळानंतर येईल हे सांगता येत नाही.
Revenue Expenditure म्हणजे काय?
कर्मचारी पगारावर होणारा खर्च,
रुग्णालये, शाळा यांवर होणारा खर्च,
कचरा व्यवस्थापनावर होणारा खर्च,
रोजची देखभाल ठेवण्यासाठी होणारा खर्च.
“Capex शहर उभारतो खरं, पण Opex खरे म्हणजे माणसाचं जगणं सोपं करत असतो.”
BMC बजेटमध्ये अनुसूचित जाती–जमातींसाठी किती खर्च केला जातो? | तरतूद, अंमलबजावणी आणि वास्तव
दलित वस्ती, मुंबई!
मुंबई महापालिका (BMC) ही केवळ भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. हे आपण पाहिले.त्यामुळे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये किती आणि कसा खर्च केला जातो? हा प्रश्न सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
🔹 BMC बजेटमध्ये SC/ST साठी स्वतंत्र तरतूद असते का?
तर होय.
BMC बजेटमध्ये दरवर्षी SC Component Plan (SCP) आणि Tribal Sub Plan (TSP) या अंतर्गत स्वतंत्र तरतूद केली जाते. ही तरतूद शहरातील SC/ST लोकसंख्येच्या प्रमाणात असावी, अशी घटनात्मक आणि धोरणात्मक अपेक्षा आहे.
मुंबईत अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी असली, तरी त्यांच्या वस्ती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या समस्या अधिक तीव्र आहेत. त्यामुळे बजेटमधील ही तरतूद केवळ आकड्यांची नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची बाब आहे.हे आम्ही आधोरेखीत करतो.
🔹 हा निधी नेमका कुठे खर्च केला जातो?
BMC कडून SC/ST साठी होणारा खर्च मुख्यतः पुढील क्षेत्रांमध्ये केला जातो:
🎓 शिक्षणासाठी खर्च-यामधे
शिष्यवृत्ती,
वसतिगृहांची देखभाल,
SC/ST विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा देणे.
🏥 आरोग्य सेवा—
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सवलतीत उपचार दिले जातात,
मातृ व बालआरोग्य योजना अशा योजना राबवल्या जातात.
SC/ST वस्तीतील आरोग्य शिबिरे भरविली जातात.
🏠 निवास व वस्ती सुधारणा—
SC/ST वस्ती सुधार योजना,
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सुविधा
💼 रोजगार व स्वयंरोजगार
कौशल्य विकास प्रशिक्षण,
लघुउद्योग व स्वयंरोजगारासाठी सहाय्य
🚰 मूलभूत सुविधा
पाणीपुरवठा,
स्वच्छता,
अंतर्गत रस्ते, नाले इ.
🔹 वास्तवात अडचणी कुठे आहेत?
कागदावर SC/ST साठी तरतूद असली तरी वास्तवात काही गंभीर प्रश्न दिसतात:
निधी पूर्णपणे खर्च न होणे!
काही वेळा SC/ST साठी राखीव निधी सामान्य योजनांमध्ये मिसळणे घडते.
खर्चाचा थेट लाभार्थ्यांपर्यंत परिणाम न दिसत नाही.
Ward-wise (वॉर्डनिहाय) खर्चाबाबत पारदर्शकतेचा अभाव आहे.
यामुळे सामाजिक संघटना व अभ्यासक सतत असा प्रश्न उपस्थित करतात की,
“फक्त तरतूद करणे म्हणजे न्याय झाला, असं मानायचं का?”किमान सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत.
🔹 नागरिक आणि समाजाची भूमिका
अनुसूचित जाती–जमातींसाठीचा खर्च हा कृपादान नाही.तर घटनात्मक हक्क आहे. त्यामुळे:
SC/ST तरतुदी बजेटमध्ये किती आहेत हे समजून घेणे,
त्या प्रत्यक्ष खर्च झाल्या का, यावर प्रश्न विचारणे,
RTI, नागरिक मंच, सामाजिक चर्चा यांचा वापर करणे होणे आवश्यक आहे.
हे लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे.
✅ निष्कर्ष
मुंबई महापालिका बजेटमध्ये अनुसूचित जाती–जमातींसाठी तरतूद केली जाते.पण खरा मुद्दा ‘किती खर्च केला’ यापेक्षा ‘तो खर्च कुणासाठी आणि किती प्रभावीपणे झाला’ हा आहे. सामाजिक न्याय हा आकड्यांमध्ये नव्हे, तर लोकांच्या जीवनात दिसणाऱ्या बदलांमध्ये मोजला गेला पाहिजे.
“न्याय म्हणजे फक्त बजेटची ओळ नाही, तर जगण्यातील बदल आहे.”
इतकं बजेट असूनही समस्या का?| Why Mumbai Faces Civic Issues|
प्रमुख कारणे:
🏙️ प्रचंड लोकसंख्या व तिची घनता
🏗️ Capex-heavy धोरण
⏳ प्रकल्पांमध्ये विलंब
🗳️ निवडून आलेली महापालिका नसल्यास किंवा विलम्बाने आली तर,उत्तरदायित्वाचा अभाव असणे यामुळे
Capex vs Revenue Expenditure| वैज्ञानिक दृष्टिकोन
नगर अर्थशास्त्र स्पष्ट सांगते —
Capex जास्त = दीर्घकालीन विकास
Opex कमी = तात्कालिक असंतोष
संतुलन नसेल तर शहर वासीयांत (गरीब वर्गात) प्रगतीचा अभाव
म्हणजेच प्राधान्यक्रमात सामाजिक न्याय योग्य ठेवला पाहिजे.
मुंबईकर नागरिकांनी काय लक्षात ठेवावे?
BMC चा पैसा म्हणजे आपल्या करांचा पैसा असतो.
बजेट समजून घेणं गरजेचं आहे.
आपल्या वॉर्डचा खर्च तपासासे आवश्यक आहे.
RTI, लोकप्रतिनिधी, प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे.
“प्रश्न विचारणारा नागरिक म्हणजे लोकशाहीचा खरा पहारेकरी.”
निष्कर्ष|मुंबई महापालिकेचा पैसा व मुंबईकरांचे भविष्य|
मुंबई महापालिकेचं बजेट देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठं आहे.
पण प्रश्न बजेटचा नाही —
👉 नियोजन, प्राधान्यक्रमात सामाजिक न्याय व पारदर्शकतेचा आहे.
“हिशेब मोकळा असेल, तर शहरही मोकळा श्वास घेतं.”
FAQs:
मुंबई महापालिकेचा सर्वात मोठा उत्पन्न स्रोत कोणता?
मालमत्ता कर (Property Tax).
BMC चा सर्वात मोठा खर्च कोणता?
भांडवली खर्च (Capital Expenditure).
मुंबईत मालमत्ता कर वाढणार का?
सध्या मोठी वाढ जाहीर नाही; पर्यायी महसूल मार्ग शोधले जात आहेत.
Dr. Nitin Pawar is a journalist, social analyst and editor at Satyashodhak Blog. He writes on democracy, social justice, rural Maharashtra and political analysis with reformist perspective.