
Dr.Nitin Pawar,Editor,satyashodhaknews.com
Contents
- 1 ब्राम्हणांनी जाती निर्माण केल्या नाहीत? मग कुणी केल्या आणि ब्राम्हण त्या करुही शकत नाहीत? मग कुणी केल्या? का व कसे ते वाचा….
- 1.1 एक कमेंट आली आणि त्या अनुशंगाने काय वास्तव सापडले?प्रत्येकाने वाचावे असे चिंतन !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 4 डिसेंबर : (संपादकीय )
- 1.1.2 शिरुर,दिनांक 4 डिसेंबर : (संपादकीय )
- 1.1.3 आपल्याला एकमेकांची किंमत कळेना !
- 1.1.4 वैज्ञानिक देखील अंधश्रद्धाळु?
- 1.1.5 गुंतागुंतीची असलेली जाती व्यवस्था ब्राह्मण निर्माण करु शकत नाहीत !
- 1.1.6 प्रगतीच्या मापदंडानुसार आपण कुठे आहोत?
- 1.1.7 फसवणुकीचा दुर्गुण कायमच !
- 1.1.8 प्रलोभनांशिवाय स्विकार न करणे….
- 1.1.9 संस्कृती दिर्घकाळ टिकण्याचे कारण काय ?
- 1.1.10 विकृत मानसिकतेत समाज !
- 1.1.11 About The Author
- 1.1 एक कमेंट आली आणि त्या अनुशंगाने काय वास्तव सापडले?प्रत्येकाने वाचावे असे चिंतन !
ब्राम्हणांनी जाती निर्माण केल्या नाहीत? मग कुणी केल्या आणि ब्राम्हण त्या करुही शकत नाहीत? मग कुणी केल्या? का व कसे ते वाचा….
एक कमेंट आली आणि त्या अनुशंगाने काय वास्तव सापडले?प्रत्येकाने वाचावे असे चिंतन !
शिरुर,दिनांक 4 डिसेंबर : (संपादकीय )

“ब्राम्हणांनी जाती निर्माण केल्या नाहीत? मग कुणी केल्या आणि ब्राम्हण जाती निर्माण करुही शकतही नाहीत? मग कुणी केल्या? का व कसे ते वाचा….”
शिरुर,दिनांक 4 डिसेंबर : (संपादकीय )
“मंदिराची वाईट घटना घडली. पण देव,धर्म या भावना नकली दिसल्या.फोटोत सर्व हसत होते.” अशी एक कमेंट आली .या बातमी तील कार्यकर्ते फोटोत हसत होते.म्हणजे विटंबनेचे काही सोयरसुतक नव्हते !”अशी कमेंट आमच्या बातमीवर आली ! त्यावरुन विचार करायला भाग पडले !
हे आजच्या समाजाचे प्रातिनिधीक चित्र आहे. वास्तव आहे.
तेच काय ! सर्वच ; कदाचित मार्क्सवादी अपवाद आहेत ! याच मानसिकतेचे आहेत.गरीब,अतिगरीब,सर्वहारा, मध्यमवर्ग,कनिष्ठ व उच्च मध्यमवर्ग,श्रिमंत, अतिश्रीमंत, ज्ञानी,अज्ञानी, आस्तिक,नास्तिक,गुढवादी,संशयवादी,महापुरूषवादी,नेतावादी ,धर्मवादी,विज्ञानवादी,स्री,पुरुष,मधले,असे सर्व अशा मानसिकतेत आहेत.
Read more >>
बलात्कार करणार्याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड !
शिरुर पोलिसांनी एकावर विनयभंगाचा गुन्हा केला दाखल ! वाचा कुणावर आणि का ?…..
आपल्याला एकमेकांची किंमत कळेना !
भारताच्या भुमीवर दिर्घकाळ युद्ध न होणे हे एक महत्वाचे कारण आहे. आपण स्वता कारण तर आहोतच ! आपणही पैसा हेच मुल्य मानतो. स्वतःला विचारले तर समजेल.
म्हणुन कदाचित अशा स्थितीत समाज आला की मोठ्या जगव्यापी युद्धाची आवश्यकता असते.जग चालवणार्या ‘शक्ती’ ते घडवुनही आणतातही.
जिंकणार्यांच्या नेत्याला ‘अवतार’ म्हणतात .हरणार्यांच्या नेत्याला राक्षस म्हणतात ! उदाहरणार्थ रावण ! त्यात भारतीय समाज अतिशय खालच्या मानसिकतेचा दर्जाचा आहे. एका बाजुला तो अध्यात्मिकतेचे ढोंग करतो, ढोल वाजवतो. दुसर्या बाजुला भौतिक सुखांमधे लोळण्याची सतत कामना करतो. ढोंगीपणा हा या समाजाचा मुख्य गुण आहे.
वैज्ञानिक देखील अंधश्रद्धाळु?

त्याचे कारण ‘गंगास्नान’ केल्यावर किंवा ‘देवदेव’ केल्यावर देवाचे कार्य होते. पापक्षालन होते.असा short cut समाजाने सोईस्कर पणे स्विकारला आहे.पापं विसरण्यासठी दर पंधरा दिवसांनी एका उत्सवाची व्यवस्था केली आहे. हा एक tool उपलब्ध झाला !
तर कुणी म्हणेल ब्राम्हणी व्यवस्थेने हे केले आहेत. पण ते बिलकुल खोटे आहे. ते या समाजानेच तयार केले आहेत.
गुंतागुंतीची असलेली जाती व्यवस्था ब्राह्मण निर्माण करु शकत नाहीत !

जाती सुद्धा ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या नाहीत. ते ती कदापी निर्माण करु शकत नाहीत. ते संख्येचे खुप कमी आहेत.आणि त्यांचे सर्व लोक ऐकतात. हेही खोटे आहे. जाती या अस्तित्वात असलेल्या जातींनीच स्वताच निर्माण केलेल्या आहेत. त्या उत्कांत झाल्या. तसे होण्यासाठी जो पुरेसा वेळ आवश्यक असतो. तो मिळालाही. हे वैज्ञानिक कारणही फिट बसते.पृथ्वीवरच्या उत्क्रांती प्रमाणे !
खरे हे आहे की आसेतुहिमाचल पसरलेला हा समाज रानटी पुर्वजांच्या पुढे फारसा उत्क्रांत झाला नाही. उलट आहे त्या अवस्थेचे तो उदात्तीकरण करत राहिला आहे .कारण त्यात त्याने स्वताला comfortable बनवले आहे. त्यामुळे तो बदलाला घाबरतो !
Read more >>
शिरुर तालुक्यातील कवी गीतकार, अभिनेता आनंद डोळस हे राज्यस्तरीय ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित !
प्रगतीच्या मापदंडानुसार आपण कुठे आहोत?
मानवी प्रगतीच्या (Human Development Index) जागतिक पातळीवर तो 170 व्या क्रमांकावर आहे. त्याच्यासाठी जगात वापरले जाणारे मापदंड त्याच्या गावीही नाहीत. तो जे करतो ते जवळ जवळ सर्व अंधश्रद्धेतुन आलेले असते. सरकारी यंत्रणाही तशीच आहे ! लोक प्रतिनिधी ही तसेच आहेत.उद्योगपती ही तसेच आहेत. सर्वसामान्य लोकही तसेच आहेत.
प्रचंड लोकसंखा असल्याने हे सहजासहजी लक्षात येत नाही. शिवाय कोण सांगतो हे महत्वाचे ! काय सांगतो हे महत्वाचे नाही. म्हणजे सांगणारे एका दमात निकालात निघतात ! आणि आपल्या ‘कंफर्ट झोन’ मधे समाज मस्त !
फसवणुकीचा दुर्गुण कायमच !
आणि हा प्राचीन काळापासुन असाच असणार ! म्हणुन जगात सर्वात जास्त उपदेशक, धर्म, साधु, संत, महापुरूष या समाजातच निर्माण झाले. कारण जास्त गरज इथेच असणार ! जास्त Demand मुळे supply जास्त ! ना कशात नोबेल पारितोषिके, ना Olympic मधे पदके,ना शांतता,ना प्रगती, (मुठभरांचीच !) बारक्या पाकिस्तानवर रूबाब ! चीन समोर लोटांगण , अमेरिकाच्या अलन मस्क समोर लोटांगण ! Google काडीची किंमत देत नाही. जागतिक बॅंक, आंतरराष्टीय नाणेनिधी, स्विस बँके, इ.कडुन कर्ज घेऊन प्रगती दाखवणे इ.असा फसवणुकीचा मार्ग सतत अविरत चालुच !
Read more >>
चारण्या गुरुसाथ्या यांचा निळु फुले नाट्यगृह सांगवी पुणे येथे अप्रतिम नृत्योत्सव !
प्रलोभनांशिवाय स्विकार न करणे….
काहीतरी प्रलोभनांशिवाय हा समाज मतदान करत नाही. म्हणजे हा समाज लोकशाहीस लायक नाही. मतदान ही खोटे, मतदारही खोटे आणि मशीनही खोटे !आता 140 कोटी लोकसंखा ! पण खोगीरभरती. अनुत्पादक ऐतखाऊ करोडोंच्या संख्येने !
वरील कमेंट वरुन हे आठवले. म्हणुन सांगितले !
संस्कृती दिर्घकाळ टिकण्याचे कारण काय ?
मग हा टिकला कसा काय हजारो वर्षे ? कारण स्मशानभूमी बनलेला ! स्मशानशांतता ! स्मशानात मढी असतात.ती आवाज करत नसतात.म्हणुन तिथे शांतता असते. परकियांना विरोध केला नाही.त्यामुळे शत्रूंना यांना हरवण्याची , नष्ट करण्याची गरजच नसायची ! म्हणुन हा प्राचीन काळापासुन आजपर्यंत टिकला.
विकृत मानसिकतेत समाज !
आज हा अत्यंत विकृत मानसिकतेचा बनला आहे.सर्वच बाबतीत ! म्हणुन येणारा काळ सज्जनांना सर्वात जास्त अवघड आणि वाईट असणार आहे ! अशाच वेळी म्हणे ‘अवतार’ जन्म घेतो.आता लवकर ‘अवतार’ आला तर किमाण त्या घटनेचे साक्षीदार बनण्याचे भाग्य आपल्या हयातीत मिळाले तर किमाण जीवनाचे सार्थक होईल !