
Contents
- 1 वयोवृद्ध आई-वडिलांची मुलाकडुन फसवणूक प्रकरण: पोलिस स्टेशनच्या चकरा मारुन मारुन शेवटी दवाखान्यात दाखल?
- 1.1 वयोवृद्ध आई-वडिलांची शिरुर पोलिसांकडे धाव! पोलिस संरक्षणाची मागणी ! जिवितास धोका?
वयोवृद्ध आई-वडिलांची मुलाकडुन फसवणूक प्रकरण: पोलिस स्टेशनच्या चकरा मारुन मारुन शेवटी दवाखान्यात दाखल?
वयोवृद्ध आई-वडिलांची शिरुर पोलिसांकडे धाव! पोलिस संरक्षणाची मागणी ! जिवितास धोका?
दिनांक : ८ जुलै २०२५ | शिरूर प्रतिनिधी |

” वयोवृद्ध आई-वडिलांची मुलाकडुन फसवणूक होवुन त्यांची जमीन फसवणूक करून अंगठे घेउन त्यांच्याच मुलाने विकली.त्यांचा सांभाळ न करता वार्यावर सोडलेले आई वडिल शिरुर पोलिस स्टेशन ला मदतीसाठी वारंवार चकरा मारुन शेवटी चक्कर येवुन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले.
त्यानंतर संबंधीत पोलिस आणखी काही दिवसांची मुदत देत या प्रकरणाचा पुढील तपास करुन खात्री करून संबधित मुलाबाबत कारवाई करतील,असे आश्वासन देत आहेत. मात्र या वृद्ध दाम्पत्याने हे प्रकरण लाच (?) घेऊन दडपले जात असल्याचे ‘सत्यशोधक न्यूज ला सांगितले आहे. शिरुर तालुक्यात या घटनेने नागरिक अस्वस्थ झाले असून शिरुर पोलिसांनी गुन्हा नोंदवुन मुलाला तपासासाठी अद्याप का ताब्यात घेतले नाही? यात काहितरी ,’ काळेबेरे‘ असल्याची शंका व्यक्त करत आहेत. ”
—- बातमीची ताजी स्थिती!
Breaking Crime News : न्हावरे येथील वयोवृद्ध दाम्पत्याने शेतजमिनीच्या फसवणुकीसंदर्भात शिरूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. मुलगा, सून व इतरांविरोधात जबरदस्ती, खोटे बोलून जमिनीची खरेदी, धमकी याबाबत गंभीर आरोप. वाचा सविस्तर बातमी.
News Shirur Police अंतर्गत एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून न्हावरे येथील वयोवृद्ध दाम्पत्य दत्तु उर्फ दत्तात्रय नामदेव खेडकर (वय ८०) व पत्नी सौ. गंगुबाई (वय ७८) यांनी आपल्या मुलगा, सून व इतर व्यक्तींविरोधात जबरदस्ती, फसवणूक व जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.
फसवणूक कशी घडली?—-
दत्तु खेडकर यांची न्हावरे गावात गट नंबर 1029/2 मधील 00.42 आर हेक्टर जमीन ही त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे. त्यांनी आपल्या पाचही अपत्यांमध्ये अद्याप वाटणी केलेली नाही. मात्र त्यांच्या वयाचा, कमी ऐकू व कमी दिसण्याचा गैरफायदा घेत त्यांच्या मुलगा महादेव दत्तु खेडकर, सून जयश्री खेडकर यांनी अतुल जेधे व त्यांची पत्नी काजल यांच्या संगनमताने ही जमीन केवळ 7,90,000 रुपयांना दिनांक १७ मार्च २०२५ रोजी तळेगाव ढमढेरे येथील निबंधक कार्यालयात विकत दिली.
अशा रितीने झाली फसवणूक—-
👉 सरकारी कर्जमाफीसाठी अंगठा आवश्यक असल्याचे सांगून आधीच तयार दस्तऐवजावर वाचून न दाखवता अंगठा घेतला.
👉 नंतर त्या अंगठ्याचा वापर करून जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला.
👉 जमीन विकल्याचे व नोटीस आल्यावरच अर्जदार दाम्पत्याला खरेदीविषयी माहिती मिळाली.
👉 या जमिनीत बोअरवेल व रस्त्याची सुविधा असूनही ती कमी किमतीत विकण्यात आली.
👉 एकूण 2.42 आर हेक्टर पैकी 30 आर जमीन विक्रीस गेलेली आहे.
तिर्थाटनासाठी पाठवून दिशाभूल?—-
👉 फसवणूक केल्यानंतर महादेव यांनी आपल्या आई-वडिलांना केवळ 10,000 रुपये देऊन तिर्थाटनासाठी पाठवले. तोपर्यंत बँकेतून रक्कमही काढून घेण्यात आली होती.
धमकी व जीवे मारण्याचा प्रयत्न?—
२५ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता एक अज्ञात व्यक्ती दगडगोटे घेऊन त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. शेजाऱ्यांच्या मदतीने तो निसटला, परंतु यामुळे अर्जदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पोलीसांकडे संरक्षणाची मागणी—
अर्जदारांनी Shirur Police Station येथे मागणी केली की –
👉 त्यांच्या मुलगा, सून व जेधे दाम्पत्य यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.
👉 खरेदीचा दस्तऐवज बिनशर्त रद्द करावा.
👉 फसवणुकीने खरेदी केलेली जमीन परत अर्जदारांच्या मालकीत द्यावी.
👉 त्यांच्या जिवीतास धोका असल्याने पोलिस संरक्षण द्यावे.
सामाजिक व कायदेशीर मुद्दे—
ही घटना फक्त वैयक्तिक फसवणुकीपुरती मर्यादित न राहता वृद्ध पालकांवरील अत्याचाराचा गंभीर सामाजिक प्रश्न उभा करते. वृद्धापकाळात देखभाल करण्याऐवजी संपत्तीच्या हव्यासापोटी आईवडिलांची फसवणूक ही निंदनीय बाब आहे.
✅ वाचा संबंधित कायदे आणि अधिकार —
ज्येष्ठ नागरिकांचे हक्क – भारत सरकार
📢 News Shirur Police या प्रकारावर कडक कारवाई करेल का? वृद्ध दाम्पत्याला न्याय मिळेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
📌
आपण या बातमीबाबत तुमचे मत कळवू शकता. वयोवृद्ध पालकांच्या न्यायासाठी एक आवाज उठा!
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••••
News Police Action: शिरूर पोलिसांची कारवाई : मंडप डेकोरेटर्स चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश !