
अपघाताचे प्रतिक चित्र !
Contents
ब्रेकींग न्युज : 17 कमानीच्या पुलाजवळ अपघातात एक जण जागीच मृत्युमुखी !
ब्रेकींग न्युज : मलठणचे 36 वर्षीय दत्तात्रय शिंदे अपघातात मुत्युमुखी !
शिरुर, दिनांक 1 नोव्हेंबर:
(प्रकाश करडे यांच्याकडुन )
ब्रेकींग न्युज घडली आहे. शिरुर जवळच्या 17 कमानीच्या पुलाजवळ अपघातात एक जण जागीच मृत्युमुखी पडला आहे.
मलठणचे 36 वर्षीय दत्तात्रय शिंदे या अपघातात मुत्युमुखी पडले आहेत.
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानुसार हकीगत अशी की दि. 30/11/2024 रोजी मध्य रात्री 12: 30 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत पुणे अहमदनगर हायेवे रोड जवळ सतरा कमान पुलाजवळ शिरूर गावामध्ये येणार्या चौकात रोडवर शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे येथे फिर्यादी विकास शिवराम शिंदे,वय- 36 वर्षे ,व्यवसाय – शेती, राहणार – शिंदेवाडी, मलठण, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांचा मोठा भाउ दत्तात्रय शिवराम शिंदे,वय-36 वर्षे हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल नं. एम. एच. 12. एफ. जे. 1731 वरून शिरूर मध्ये येण्यासाठी मोटार सायकल चालवीत रोड कॉस करीत असताना पुणे बाजुकडुन अहमदनगर बाजुकडे जाणार्या लक्झरी बस नं. एम. पी. 13. झेड.इ.0748 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील लक्यरी बस ही भरधाव वेगात, हयगयीने, निष्काळजीपणे, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून चालवुन त्या बसची मोटार सायकलला धडक मारून अपघात करून अपघातामध्ये मयत झालेला त्यांचा मोठा भाउ दत्तात्रय शिवराम शिंदे, वय- 36 वर्षे याला किरकोळ व गंभीर दुखापती होवुन त्याचा जागीच मृत्यु होण्यास व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभुत झाला आहे.ब्रेकींग न्युज.
त्यानंतर अपघाताची खबर न देता पळुन तो गेला आहे. म्हणुन त्याबाबतची लक्डारी बस नं. एम. पी. 13. झेड. इ.0748 वरील अज्ञात चालका विरुध्द शिरुर पोलिस स्टेशनला कायदेशीर तक्रा केलीर आहे.
शिरूर पोलीस स्टेशनला सी आर नं 968/2024 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 106 (1), 281,125 (अ) (ब), 324 (4) सह मो वा काक 184, 134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.वाघमोडे हे आहेत.तर पुढील तपास
अंमलदार सहायक फौजदार श्री. साबळे हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.