
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 ब्रेकिंग न्युज : 65 वर्षीय वृद्धास ट्रकची धड ; मोटार सायकलींचेही नुकसान!
- 1.1 ब्रेकिंग न्युज: शिरुर जवळ अपघात !
ब्रेकिंग न्युज : 65 वर्षीय वृद्धास ट्रकची धड ; मोटार सायकलींचेही नुकसान!
ब्रेकिंग न्युज: शिरुर जवळ अपघात !
शिरुर,दि.6 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
ब्रेकिंग न्युज : 65 वर्षीय वृद्धास ट्रकची धडक बसली आहे तर इतर मोटार सायकलींचेही नुकसान या अपघातात झाले आहे. शिरुर जवळ हा अपघात झाला आहे.या अपघाताची नोंद शिरुर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. पुढील तपास श्री.ज्योतीराम गुंजवटे ,पोलिस निरिक्षक ,शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहेत. मात्र अशा प्रकारे बेजबाबदारपणे वाहन चालवण्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे ही बाब खेदजनक असल्याचे नागरिकांनी ‘सत्यशोधक न्यूज’ शी बोलताना सांगितले आहे. संबंधित अधिकार्यांनी याबाबतीत लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी आहे.
न्हावर्यात घडला अपघात. ..
या बाबतीतील फिर्यादीत नोंदवल्याप्रमाणे सविस्तर हकिकत अशी आहे की दिनांक 5/07/2024 रोजी सकाळी 10 : 30 वाजण्याच्या सुमारास कळसकरवाडी , तांदळी, ता. शिरूर ,जिल्हा- पुणे येथे न्हावरा बाजुकडुन तांदळी बाजुकडे जाणार्या रोडवरून टाटा कंपनीचा ट्रक नं. MP09HH3283 हा चालला होता. या ट्रकवरील चालक रिंकु कल्याणसिंग यादव , राहणार ,बुडाडोंगर ,तालुका – बदरवास, जिल्हा- शिवपुरी (मध्यप्रदेश) येथील आहे . हा चालक न्हावरा बाजुकडुन तांदळी बाजुकडे ही गाडी चालवत जात होता. रस्त्त्याच्या परीस्थीतीकडे व नियमांकडे त्याने दुर्लक्ष केले. त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवले. असे या फिर्यादीत नोंदवले आहे .
वयोवृद्धास वाहनाची धडक….
समोरून चालत जाणारे वयोवृद्ध नागरिक श्री. बापु मारूती माकर , वय -65 वर्षे , राहणार – ढोकसांगवी , तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे यांना या वाहनाने धडक मारली. त्यामुळे अपघात होवुन अपघातात ते जखमी झाले आहेत . या अपघातात बापु मारूती माकर या वयोवृद्धास किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. तसेच रस्त्याचे कडेला उभ्या असलेल्या मोटारसायकलींचे नुकसानी झाले आहे . अपघातात वापरल्या गेलेल्या या टाटा कंपनीच्या ट्रकचा नंबर MP09HH3283 आहे. वरील चालक रिंकु कल्याणसिंग यादव राहणार, बुडाडोंगर ,तालुका, बदरवास, जिल्हा- शिवपुरी (मध्यप्रदेश) या चालकाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ….
याबाबतची फिर्याद अक्षय सुभाष कळसकर , वय – 34 वर्षे, धंदा- व्यवसाय, राहणार – तांदळी, तालुका – शिरूर ,जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिली आहे. वाहन चालक आरोपी रिंकु कल्याणसिंग यादव, राहणार ,बुडाडोंगर ,तालुका – बदरवास, जिल्हा- शिवपुरी (मध्यप्रदेश) याच्यावर शिरुर पोलीस स्टेशनला गु.र.न 615/2024 व भारतीय न्याय. संहिता कलम 281,125 (A), 125 (B), 324(4), सह मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक संतोष खबाले हे पोलिस निरीक्षक श्री. ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
ग्रामीण भागातुन वाहन चालवताना चालकाला काही बाबींची माहिती असणे अपेक्षित असते.वाहन चालनाचे शास्रशुद्ध प्रशिक्षण बर्याच वाहनचालकांचे झालेले नसते.या चालकाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे.हे समजले नाही. पण बहुदा परराज्यातील अल्पशिक्षीत लोक वाहन चालवताना दिसुन येतात.त्याची तपासणी करण्याची कोनती यंत्रणा उपलब्ध आहे हे माहिती नाही.
ग्रामीण भागातुन वाहन चालवताना. …
ग्रामीण भागातील लोक औपचारिक अशा काही गोष्टी सहसा करत नाहीत.गावात वावरताना गावकरी सहज वावरत असतात.वृद्ध सावकाश चालत असतात.पटकन एखादी कृती चलाखीने करण्याचा त्यांना अनुभव नसतो.लांब पल्ल्यासाठी वाहन चालवताना चालक बर्याच प्रमाणात थकलेला असतो.एखादी लहान सहान चूक त्याच्याकडून होते.मात्र निरपराध नागरिकांना त्याचा त्रास होतो. प्रसंगी जीव गमवावा लागतो.म्हणुन चालकाने वाहन चालवताना विशेषता लांब पल्याच्या प्रवास करताना योग्य तेवढा आराम करणे आवश्यक बाब आहे. त्यातुन तो स्वत:ही संभाव्य संकटातून वाचू शकतो.इतरांनाही वाचवु शकतो.वहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचा स्वताला सराव करुन देणे,घेणे फार आवश्यक आहे. ‘अक्सिडेंट से देर अच्छी’ असे एक ब्रिदवाक्य पुष्कळ गाड्यांवर आपण पाहतो.
ब्रेक महत्वाचा?
आपल्या वाहनाचा ते चालवताना चा वेग हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नाही तर ब्रेक लावला तरी त्या गाडीला अपघात होतो.म्हणुन वाहतुकीच्या नियमांचा भाग असलेले स्पिड ब्रेकर वगैरे बाबी या व्यवस्थितपणे पाळल्या पाहिजेत.रोज आपण काहीच्या काही वेगाने एखादा लहान वाहन चालक किंवा मोठे वाहन चालक पाहतो.हे बेजबाबदारपणे वाहन चालवत असतात.परवाना नसलेले ,अल्पवयीन चालक व वाहतूक पोलीस हे चित्र आपल्याला चांगले परिचीत आहे.तरी पण रासरोजपणे हे चालुच असलेले आपण पाहत असतो.वाहतुक पोलिसही कित्येकदा हे नित्याचेच आहे.असे समजुन दुर्लक्ष करतात. काही मोठ्यांची लाडकी पोरं बिनधास्तपणे गाड्या चालवतात.यांच्याही पालकांना समज देणे आवश्यक असते.
चालकांमद्ध्ये व्यसनाधिनता?
यातील आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की चालकांची व्यसने ! काही चालक दारु पिल्याशिवाय आपण ड्राइव्हिंगच करु शकत नाही, असे सांगतात.हा दारु पिण्यासाठीचा बहाणाच आहे.हे कदापी योग्य नाही. नशेत डोळे किंवा हात व पाय यांची आवश्यक हालचाल कित्येक वेळा बिघडुन जाते.त्या स्थितीत अपघातांची संभाव्यता जास्त असते.वाहतुकीच्या नियमात दारु पिऊन वाहन चालवण्यास सक्त प्रतिबंध आहे.या बाबीकडे दुर्लक्ष करतात.
एकंदरीतच हा विषय जीवन मरणाशी खेळणारा असल्याने सर्वांनीच त्याबाबतची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.