
Breaking News Gutka : अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या, ₹५,५०,०००/- चा मुद्देमाल जप्त – शिरूर गुन्हे शाखेची कारवाई
Breaking News Gutka
📅 दिनांक: २३ सप्टेंबर २०२५
📍 शिरूर (जि. पुणे)
Breaking News Gutka : शिरूर बायपासवर पोलिसांनी अवैध गुटख्याची मोठी वाहतूक उघडकीस आणली. ₹५.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटक. वाचा संपूर्ण तपशील.
शिरूर तालुक्यातील गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक केली असून ₹५,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई आणि शिरूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे केली.
🚔 तपशीलवार माहिती—-
२२ सप्टेंबर २०२५ रोजी शिरूर बायपासवर रस्ते तपासणी दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी लाल रंगाच्या रिट्झ कार क्रमांक एम एच १६ बी जी ५७९१ ही गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावर पोलिसांनी सापळा लावून अरबाज हबीब शेख (वय १९, रा. मोठी मस्जिद समोर,सुपे,जि.अहिल्यानगर ) यास अटक केली.
त्याच्या ताब्यातून अंदाजे ₹५,५०,०००/- किंमतीचा गुटखा व ₹१,०००/- रोख रक्कम आणि वापरलेली कार असा एकूण ₹५,५१,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५२७/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
👮 प्रमुख अधिकारी आणि तपास पथक—
✅ पोलीस निरीक्षक: श्री. संदेश केंजळे
✅ पोलीस उपनिरीक्षक: शुभम चव्हाण
✅ पोलीस अंमलदार: विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई
✅ पुढील तपास अधिकारी: श्री.शुभम चव्हाण
✅ वरिष्ठ अधिकारी: पोलिस अधिक्षक संदिप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण हे करत आहेत.
अधिक माहितीसाठी पुढील पेज वरील माहिती वाचा••••
सत्यशोधक न्यूज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून ••••
Shirur Breaking News : शिरुरच्या समर्थ पिझ्झा दुकानासमोरून मोटारसायकल चोरी !
https://shorturl.fm/kCC0O