
Contents
Breaking News: शिरूर पोलिसांची गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर मोठी कारवाई!
Breaking News Police Raid At Illegal Daru
📍 शिरूर (पुणे) | दिनांक : २५/०६/२०२५ |
Breaking News: शिरूरमध्ये गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा! हजारोंच्या किंमतीचा मद्यसाठा जप्त. आरोपीवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अवैध मद्यनिर्मिती बंद करण्याचा इशारा.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंंजळे व त्यांच्या पथकाने गावठी हातभट्टी निर्मितीवर मोठी कारवाई करत अवैधरित्या बनवलेल्या मद्याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मौजे कवठे येमाई येथील गावाच्या हद्दीत करण्यात आली असून, एकूण ₹1,13,375 किंमतीचा हातभट्टीचा दारु व ₹13,200 किमतीची इतर रसायने, केमिकलयुक्त ताडी आदी साठा नष्ट करण्यात आला.
ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पो.ह.वा.सुद्रीक,श्री.सांगळे, पो.ह.वा.भवर यांच्या पथकाने एकत्रितपणे कवठे येमाई येथे छापा टाकून अवैध मद्यनिर्मितीचा पर्दाफाश केला.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल—
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४६६/२०२५ भारतीय दंड विधान कलम २७३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६५(क)(फ) प्रमाणे आरोपी सागर गणपत मलगुंडे (रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन—
या कारवाईसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत ढोले, व पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंंजळेयांचे मार्गदर्शन लाभले.
पोलीस प्रशासनाचा इशारा—
शिरूर पोलिसांनी स्पष्टपणे सूचित केले आहे की, गावठी हातभट्टी सारख्या अवैध कृतीमध्ये सहभागी असणाऱ्यांनी त्वरित हे प्रकार बंद करावेत. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
1. https://mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
2. https://pune.gov.in – पुणे जिल्हा प्रशासन
3. https://www.indiacode.nic.in – भारतीय कायदेविषयक संदर्भ
1 thought on “Breaking News: शिरूर पोलिसांची गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर मोठी कारवाई!”