
Contents
- 1 C.T.Bora Collage : सी टी बोरा कालेज समोरील मैदानातुन काय चोरीला गेले?
- 1.1 C.T.Bora Collage मैदान व परिसर देखील झाला असुरक्षित?
C.T.Bora Collage : सी टी बोरा कालेज समोरील मैदानातुन काय चोरीला गेले?
C.T.Bora Collage मैदान व परिसर देखील झाला असुरक्षित?
News Shirur Crime 14 March 2025:
(Satyashodhak News Report)
C.T.Bora Collage : सी टी बोरा कालेज,शिरुर समोरील मैदानातुन काय चोरीला गेले? ते वाचा या बातमीत ! आता C.T.Bora Collage मैदान व परिसर देखील असुरक्षित बनला आहे. तेथुन देखील दिवसा ढवळ्या एक मोटर सायकल चोरीला गेली आहे. हा भाग सी सी टी व्ही युक्त असावा. मात्र चोरटयांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे.किंवा चोरटे ‘अडाणी ‘ (अदानी नाही !) असावेत.अशी शक्यता आहे.पण चोरटे आता अगदी काॅलेजच्या जवळ पोचले आहेत. हे खरे. शिरुर पोलिसांची आणि नागरिकांची डोकेदुखी मात्र चोरटयानी वाढवली आहे. हे खरे!
Read more >>
टी बोरा काॅलेज, शिरुरसी समोरच चोरी —-
हकिकत अशी आहे. खालील वर्णनाची मोटर सायकल दिनांक 8 मार्च 2025 रोजी सखाळी 9 वाजण्याच्या ते दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान चोरीला गेली आहे. शिरूर हददीतील सी. टी बोरा कॉलेज समोरील मोकळ्या जागेतुन ही मोटर सायकल चोरीला गेली आहे. ती येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
C.T.Bora Collage समोरुन चोरीस
गेलेला माल पुढील प्रमाणे आहे—
1) 11,000/- रूपये किमतीची एक निळ्या रंगाची हिरो होंडा फॅशन प्लस गोटार सायकल. तिचा आर टी ओ नंबर – एम एच 12 डी. क्यु 9399 चॅसी नंबर – 06K09C43619 इंजीन नंबर- 06K08M31587.
एकुण किंमत अंदाजे 11,000/रुपये इतकी आहे.
Read more >>
शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल —-

म्हणुन फिर्यादी यश सचिन भोगावळे, वय- 21 वर्षे, व्यवसाय- शिक्षण, राहणार -. गोलेगाव ,तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे मोबाईल नंबर यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधे अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
Read more >>
शिरुर पोलिस करत आहेत तपास —-
शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 165/2025 असा आहे. तर अज्ञात चोरट्याविरूध्द भारतीय न्याय संहीता कायदा कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार श्री. खेडकर हे करत आहेत. दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री कदम हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
Read more >>
C.T.Bora Collage समोरील मैदानात बर्याच गाड्या पार्कीग केलेल्या असतात. अर्थात नेहमी प्रमाणे अस्ताव्यस्त! ती काही अधिकृत पार्कीग ची जागा नाही. त्याचाच फायदा चोरटयांनी घेतला आहे. सहज बेमालुमपणे गाडी लांबवली आहे.तिची चावी कशी खोलली? हा संशोधनाचा विषय ठरु शकते.शिरुर शहरात व अन्यत्र नकली चाव्या बनवुन देणारे कोणी आहेत का ? याचा एकदा शोध घेतला पाहिजे. कारण चावी किंवा तत्सम वस्तुशिवाय गाडी काही जागची हलणार नाही ! आणि उचलुन न्यायला कोणी कुंभकर्ण किंवा भिमपुत्र घटोत्कच च पाहिजे !