
Contents
- 1 चार चाकी वाहनाच्या धडकेत दांपत्य जखमी !
- 1.1 चार चाकी वाहनाच्या धडकेची घटना सरदवाडी जवळ !
चार चाकी वाहनाच्या धडकेत दांपत्य जखमी !
चार चाकी वाहनाच्या धडकेची घटना सरदवाडी जवळ !
शिरुर , दिनांक 1 1 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

चार चाकी वाहनाच्या धडकेत दांपत्य जखमी झाले आहे. ही धडकेची घटना सरदवाडी जवळ घडली आहे. याची शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आली आहे .शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
ती घटना पुढील प्रमाणे आहे–
दिनांक 07/02/2025 रोजी रात्री 23: 30 ते 23:50 वाजण्याचा दरम्याण सरदवाडी, तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे गावच्या हददीत अपघात घडला आहे. सरदवाडी ते शिरूर प्रवासादरम्याण भारत पेट्रोल पंपासमोर अज्ञात चार चाकी वाहनावरील अज्ञात चालक त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवत होता. अविचाराने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालला होता .
Read more >>
शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी !
चार चाकी वाहनाच्या धडकेची माहीती न देता पळाला —-
नंतर तो व त्याच्या चार चाकी वाहनाने स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम. एच. 12 एस. डब्ल्यु. 4375 हिला पाठीमागुन ठोकर मारली. त्यामुळे अपघात झाला आहे.
चार चाकी वाहनाच्या धडकेत दांपत्य जखमी —
या अपघातात फिर्यादी निखील सोहरायसिंग रवानी ,वय- 19 वर्ष, व्यवसाय -शिक्षण, मुळ राहणार – बोराडेमळा, शिरूर , तालुका -शिरूर, जिल्हा – पुणे, सध्या माटुंगा असा आहे.यांची आई सौ. शारदा सोहरायसींग रखानी ,वय -39 वर्ष व वडील सोहरायसींग पुनवासीसींग खानी ,वय- 41 वर्ष, दोन्ही राहणार – बोराडेमळा ,शिरूर ,तालुका, शिरूर ,जिल्हा – पुणे यांना गंभीर दुखापत झाली. मोटर सायकलचेही नुकसान झाले.शिवाय हा अपघातासाठी कारणीभुत असुन सुद्धा अपघाताची खबर न देता पळुन गेला .
Read more >>
शिरुर पोलिसांनी एकावर विनयभंगाचा गुन्हा केला दाखल ! वाचा कुणावर आणि का ?…..
जखमी व्यक्ती—
1. सौ. शारदा सोहरायसींग खानी, वय -39 वर्ष,
2. सोहरायसींग पुनवासीसींग रवानी, वय- 41 वर्षे,
दोन्ही राहणार – बोराडेमळा ,शिरूर ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे
म्हणुन त्यांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरुध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
Read more >>
शिरुर तालुक्यात 6 लाख 36 हजार रुपयांच्या सोन्या,चांदीची चोरी कुठे व कशी झाली ते वाचा इथे !
बेजबाबदार चार चाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल —
अज्ञात चालका विरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर-आहे.तर 95/2825 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281, 125 (b), 324 (4), मोटर वाहन कायदा कलम 184,134,177 N नुसार गुन्हा दाखल करण्मात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. भगत हे आहेत. तर पुढील तपास देखील अंमलदार पोलिस हवालदार श्री. भगत हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.