
Contents
शिरुर जवळ चुलत भावांमधे मारामारी,पुतण्या जखमी !
शिरुर जवळील सरदवाडीतील घटना !
शिरुर,दिनांक- 28 डिसेंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन )
शिरुर जवळ चुलत भावांमधे मारामारी झाली आहे. त्यात पुतण्या जखमी झाला आहे.
शिरुर जवळील सरदवाडीत ही घटना घडली आहे.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार हकीकत अशी की तारीख 27/12/2024 रोजी रात्री 08:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्री. तात्याभाउ नामदेव निस्खणे, वय -40 वर्षे, धंदा- ड्रायव्हर,राहणार- विठठल रुक्मीणी मंदीराच्या पाठीमागे सरदवाडी, तालुका – शिरूर,जिल्हा – पुणे हे व त्यांची पत्नी वैशाली, मुलगा दर्शन, मुलगी खुशी असे सर्वजण त्यांच्या सरदवाडी, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे येथील राहत्या घराच्या बाहेर उभे असताना तेथे त्यांचा चुलत भाउ सुर्यकांत किसन निरयणे व पुतण्या प्रतिक कैलास निरखणे, दोन्ही, राहणार- सरदवाडी, तालुका – शिरूर,जिल्हा – पुणे असे दोघेजण त्यांच्या घराकडे आले.’शिरुर‘
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog
——
त्यांच्या हातामध्ये पि.यु. सी पाईप असल्याचे पाहुन फिर्यादी यांची पत्नी वैशाली हिने फिर्यादीला घरामध्ये कोंडुन ठेवले. ते सर्वजण तसेच त्यांच्या घराचे बाहेर थांबले. त्यावेळी सुर्यकांत यांनी त्यांना,” लोकांना जमीन का विकली आहेस? तु घराचे बाहेर ये” असे मोठमोठ्याने बाहेरून आवाज देत राहीले. फिर्यादीच्या घराच्या दरवाज्यावर बाहेरून जोरजोरात लाथा मारत होते. दगड हातामध्ये घेउन धनदरवाज्यावर मारुती लागले.
सुर्यकांत किसन निरवणे याच्या कडुन त्यांचा मुलगा दर्शन याच्या डाव्या पायाच्या नडगीवर दगड लागल्याने तो जखम झाला.त्यानंतर पत्नी वैशाली हिने फिर्यादीला आवाज दिला.दार उघडुन फिर्यादी घराच्या बाहेर आले असता त्यांना देखील सुर्यकांत निरवणे व प्रतिक निवणे यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहान करून शिवीगाळ दमदाटी केली आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
त्यामुळे या भांडणातील आरोपी 1) सुर्यकांत किसन निरवणे 2) प्रतिक कैलास निरवणे , दोन्ही राहणार – सरदवाडी, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांच्यावर ‘शिरुर’ पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 115 (2), 352, 351(2),351(3),135,3(5) नुसार शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. उबाळे हे आहेत.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. भगत हे करत आहेत.