
Contents
- 1 Cruelty With Cows: गाईच्या 14 वासरांना क्रुरतेची वागणुक; गुन्हा दाखल!
- 1.1 Cruelty With Cows: गाईच्या 14 वासरांना एकाच पिक अप गाडीत कोंबले ; अन्नपाणी देखील नव्हते दिले !
- 1.2 फिर्यादी –
- 1.3 आरोपी-
- 1.3.1 1) संदीप आलीकाब काळे ,वय -26 वर्षे 2) रशीका आशोक भोसले, वय- 19 वर्षे, दोघे राहणार – पिंपळगाव खडकी,तालुका – आंबेगाव,जिल्हा -पुणे.
- 1.3.2 Cruelty With Cows: मिळालेला माल (जनावरे) पुढील प्रमाणे आहे— —
- 1.3.3 प्राण्यांशी क्रूरतेने वागणे हा गुन्हाच—–
- 1.3.4 शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —-
- 1.3.5 शिरुर पोलिसांकडुन पुढील तपास सुरू —-
- 1.3.6 व्यापक वैचारिक बैठक निर्माण करणे गरजेचे —
- 1.3.7 About The Author
Cruelty With Cows: गाईच्या 14 वासरांना क्रुरतेची वागणुक; गुन्हा दाखल!
Cruelty With Cows: गाईच्या 14 वासरांना एकाच पिक अप गाडीत कोंबले ; अन्नपाणी देखील नव्हते दिले !
Shirur Taluka Crime News 14 March:
Cruelty With Cows: गाईच्या 14 वासरांना क्रुरतेची वागणुक दिल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाईच्या या 14 वासरांना एकाच पिक अप गाडीत कोंबले होते.त्यांना अन्नपाणी देखील दिले नव्हते.शिरुर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
Read more >>
What’s App Var Seva : महाराष्ट्र सरकार करणार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध !
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील प्रकार—-
घटना सविस्तर अशी आहे. तारीख 11मार्च 2025 ला रात्री साडे दहा वाजता पिंपरखेड, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथील पिंपरखेड -वळती रोड पावरहाउस समोर एक महिंद्रा कंपनीची (पिक अप) चार चाकी गाडी नंबर- एम. एच.14 डी. एम 6168 यामधुन 1) संदीप आलीकाब काळे, वय 26 वर्षे, 2) रशीका आशेक भोसले ,वय- 19 वर्षे,
दोघे राहणार पिंपरगाव खडकी, तालुका – आंबेगाव, जिल्हा – पुणे यांनी चारचाकी गाडीमध्ये काळ्या पांढर्या रंगाची जर्शी गाईची वासरे 14 (आंतुल्या) कुरपणे गाडीत कोंबुन ठेवली होती.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
चारापाण्याची व्यवस्था देखील केली नव्हती —
त्यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची व्यवस्था कलेली नव्हती. तसेच जनावरांची वाहतुकी पुर्वी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावरांची वैद्यकीय तपासणी केलेली नव्हती. तरी त्यांची वाहतुक करून काका कुरेशी (पुर्ण नाव माहीत नाही) राहणार- आहील्यानगर याला विकण्या करता घेवुन चालले होते.
Read more >>
फिर्यादी –
नितेश दत्तात्रय थोरात, पोलीस अंमलदार, नेमणुक -शिरूर पोलीस स्टेशन.
आरोपी-
1) संदीप आलीकाब काळे ,वय -26 वर्षे
2) रशीका आशोक भोसले, वय- 19 वर्षे, दोघे राहणार – पिंपळगाव खडकी,तालुका – आंबेगाव,जिल्हा -पुणे.
Cruelty With Cows: मिळालेला माल (जनावरे) पुढील प्रमाणे आहे— —
1) 8,400/रूपये किंमतीच्या काळ्या पांढर्या रंगाच्या जर्शीगाईंची वासरे 14 (आंतुल्या) प्रत्येकी 600/- रूपये किमतीची.
2) 4,00,000 रूपये किमतीची एक महिंद्रा कंपनीची (पीकाप) चारचाकी गाडी नंबर- एम. एच. 14 डी. एम 6168.
याची एकुण किंमत 4,88,400/- रूपये इतकी आहे.
प्राण्यांशी क्रूरतेने वागणे हा गुन्हाच—–
म्हणुन फिर्यादी नितेश दत्तात्रय थोरात, पोलीस अंमलदार , नेमणुक शिरूर पोलीस स्टेशन यांनी 1) संदीप आलीकाब काळे ,वय -26 वर्षे व 2) रशीका आशोक भोसले, वय- 19 वर्षे, दोघे राहणार – पिंपळगाव खडकी, तालुका- आंबेगाव, जिल्हा – पुणे याच्या विरूद्ध प्राण्यांना कुररतेने वागण्याचा कायदा 1960 चे कलम 11 (1), (घ) (ड) (ज) भारतीय न्याय संहीता कलम 2023 चे कलम 325 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद शिरूर पोलिस स्टेशन मधे केली आहे.
शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —-
शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर – 170/2025 असा आहे. प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम कादा कलम 11 (1), (घ) (ड) (ज) व भारतीय न्याय संहीता कलम 2023 चे कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांकडुन पुढील तपास सुरू —-

दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. कदम हे आहेत. तर पुढील तपास अंमलदा पोलिस हवालदार श्री. गरकळ हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
Read more >>
माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल , कारेगाव येथे दिवाळी पार्टी व दीपोत्सवाचे अनोखे आयोजन !
व्यापक वैचारिक बैठक निर्माण करणे गरजेचे —
भारताचे संविधान व लोकशाही भारतात माणसालाच नाही तर प्राण्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण ही बाब शिक्षणाच्या अभावाने व परंपरांच्या प्रभावामुळे नेहमी दुर्लक्षित राहते.साधा विकेक न बाळगता वागणे लोकशाहीत अपेक्षित नसते. पण असे कायदे असताना देखील काही नागरीक रानटीपणाने वागतात.आता माणुस हा उत्कांत झाला आहे.पुर्वी तो प्राणीच होता.पण सर्वच लोक अजुन माणुस बनलेले नाहीत.हे सत्य कटु आहे.
समाज धर्म,अध्यात्म, भक्ती,अद्वैत,भजने किर्तने गात असतो.पण प्रत्यक्ष रोजच्या दैनंदिन जीवनात तत्वांचे पालन करत नाही. भुतदया म्हणजे माणसाव्यतिरीक्त इतर सर्व प्राण्यांशी देखील प्रेमाणे वागावे.कारण तो माणुस आहे.तो इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे.हे समजण्यासाठी विवेकी माणुस घडवण्याचे शिक्षण आवश्यक आहे.