
Contents
- 1 Danewadi Mauli Gavhane Murder Case: सागर गव्हाणे व शुभम मांडगे होते समलैंगिक?
- 1.1 Danewadi Mauli Gavhane Murder Case: केवळ समलैंगिक संबंध माहिती ठरला माऊली गव्हाणे !
- 1.2 खास भेट:
- 1.2.1 सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
- 1.2.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.2.3 हे धक्कादायक उदाहरण महाराष्ट्रात गेले —-
- 1.2.4 न्यायालय भावनेवर चालत नाही—-
- 1.2.5 सर्व भटका समाज समस्यांना तोंड देत असतो—-
- 1.2.6 शिवाय दोन कुटुंबांमधे शत्रुत्व कोनत्या टोकाला जाईल याची खात्री नाही—
- 1.2.7 About The Author
Danewadi Mauli Gavhane Murder Case: सागर गव्हाणे व शुभम मांडगे होते समलैंगिक?
Danewadi Mauli Gavhane Murder Case: केवळ समलैंगिक संबंध माहिती ठरला माऊली गव्हाणे !
Shirur Crime News 19 March 2025 :
(Satyashodhak News Report)
Danewadi Mauli Gavhane Murder Case: सागर गव्हाणे व शुभम मांडगे होते समलैंगिक? आणि यांचे हे समलैंगिक संबंध केवळ माऊली गव्हाणे या त्या दोघांचा तिसरा विश्वासु मित्र असलेला माऊली गव्हाणे याला माहिती झाल्याने माऊली गव्हाणे क्रुर हत्येचा बळी ठरला आहे.अशी ताजी माहिती आहे.अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण शाखेने ही माहिती दिली आहे.यातील शुभम मांडगे हा अल्पवयीन मुलगा आहे. हे सर्व तसे कमी वयाचे आहेत.तसेच माऊली गव्हाणे याचा शोध घेताना वगैरे सर्व घटनाक्रमात लोकांमधे वावरतो होते.अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
अघटित या दाणेवाडी येथे घडले आहे—-

पुण्यात पुर्वी गाजलेल्या जोशी अभ्यंकर हत्याकांडात हत्यारे जक्कल आणि सुतारही असेच वावरत होते.एवढेच नाही तर पोलिस स्टेशन मधे जावुन आपल्या मित्राचा तपास कुठपर्यंत आला आहे? असे पोलिस अधिकार्यांना विचारत असत.एका पोलिस अधिकार्याला जक्कल ची दाढी गुंड व गुन्हेगारासारखी वाटली.त्याने अचानक जक्कल ला टोकल्यावर जक्कल काहीसा गडबडला ! मग पुढे काय घडले ते महाराष्ट्र अजुन विसरला नाही. तसेच थोडेसे साम्य इथे दिसते.पण इतक्या कमी वयाचे,ग्रामीण भागात राहणारी ही मुले असे काही करतील असा विश्वास सहजासहजी बसणार नाही! इतके अघटित मात्र शिरुर जवळच्या या दाणेवाडी येथे घडले आहे.
शुभम मांडगे हे सागर गव्हाणे याच्या समलैंगिक पार्टनरचे नाव पुढे आले —-
पोलिसांकडुन आधी सागर गव्हाणे चे नाव पुढे आले.दुसरा अल्पवयीन मुलगा म्हणता म्हणता शुभम मांडगे हे सागर गव्हाणे याच्या समलैंगिक पार्टनरचे नाव पुढे आले आहे.यात आणखीन एकुण सहा जण असल्याचे सांगण्यात येते.इतरांबाबतचा तपास सुरू आहे. अर्थात अधिक अधिकृत माहिती अहिल्यानगर पोलिसांनी अदयाप दिलेली नाही.पण विश्वासु मित्र असल्याने माऊली गव्हाणे याला रात्री या दोघांनी लुडो खेळु असे खोटे सांगुन बोलवले.निरागस व भोळा माऊली गव्हाणे त्यांना भेटायला गेला.तिथे त्यांची बाचाबाची झाली.त्यातुन माऊली गव्हाणे याचा गळा आवळला गेला.नंतर त्याची ओळख पटु नये म्हणुन कटरचा वापर करण्यात आला. त्याचे शीर,हात व पाय कापण्यात आले.दोन वेगवेगळ्या पोत्यांमधे वजनदार दगड ठेवुन दोन वेगवेगळ्या पण एकाच दाणेवाडी येथील घोडनदीलगतच्या भागात ही पोती टाकण्यात आली !
Read more >>
‘सर, समलैंगिक संबंध म्हणजे काय? ‘—-
‘सत्यशोधक न्युज’ #satyashodhaknews च्या एका वाचकाने what’s app वर सेसेज करुन आम्हाला प्रश्न विचारला आहे की, ‘सर, समलैंगिक संबंध म्हणजे काय? ‘ म्हणजे पहा ग्रामीण भागात अजुन हा शब्द सामान्य माणसाला नीट उच्चारता सुद्धा येत नाही. तिथे समलैंगिक संबंध हा प्रकार अगदी दुर्मिळ व क्वचित अस्तित्वात आहे. तशी या समलैंगिक, गे पिपल,गे विवाहाला मान्यता द्यायची की नाही, हे नैसर्गिक आहे की नाही? विकृती आहे की नाही? काही ‘केमिकल लोचा’ आहे की नाही? पासुन निवडणुकीचा मुद्दा ते बायबल व ख्रिश्चन धर्मात याबाबत काय सांगितले आहे वगैरे मोठी चर्चा अमेरिका, युरोप मधे झाली आहे. भारतात तुलनेने खुपच कमी झाली आहे. कारण असली विकृत कल्पना इथल्या मानसिकतेला नवीन अशीच जवळजवळ आहे.प्राचीन कथा,काव्ये,ग्रंथ यांमधेही अशी काही पात्रे आढळत नाहीत.म्हणुन समाजमनात देखील हा घाणेरडा किळसवाणा प्रकार येणे अपवादात्मक असावे.
तरी या विषयावर मराठी,हिंदी व प्रादेशिक भाषांमधे चित्रपट येवुन गेले.पण असा प्रकार समाजात फैलावला.असे झाले नाही.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
हे धक्कादायक उदाहरण महाराष्ट्रात गेले —-
आता दाणेवाडी समलैंगिक संबंध व त्यातुन अशी हत्या करणे हे धक्कादायक उदाहरण महाराष्ट्रात गेले आहे. याचे परिणाम नेमके पुढे काय होणार आहेत?असा ही प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक व आवश्यक आहे.सरकारी वकील अॅड उज्वल निकम यांचे नाव पुढे येत आहे. दुर्मिळातील दुर्मिळ क्रुर खुन किंवा हिंसा,कृत्य ठरवुन आरोपीला फासावर लटकावण्यात ते तरबेज वकील आहेत.कसाबला त्यांनी फासावर लटकवले हे आपल्याला माहित आहे. खैरलांजी प्रकरणात मात्र ते आरोपींना जन्मठेपेपर्यंत पोचवु शकले ! दुर्मिळातील दुर्मिळ क्रुर हत्या सिद्ध करण्यात कमी पडले.
न्यायालय भावनेवर चालत नाही—-

या प्रकरणात देखील बरेच किचकट प्रश्न उपप्रश्न ,वाद,प्रतिवाद होतील.न्यायालय भावनेवर चालत नाही. तथ्यांवर,पुराव्यांवर,अगदी शेवटी राष्टपतींच्या दयेच्या अधिकारावरही चालते.एक आरोपी आता सुरुवातीलाच
अल्पवयीन आहे.पोर्शे कार प्रकरणात अल्पवयीन आरोपी म्हणुन दोघांचा मृत्यु होवुन देखील शिक्षा निबंध लिहिण्याची वगैरे झाली आहे.
Read more >>
Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणेचा एक खुनी सापडला पण …….
सर्व भटका समाज समस्यांना तोंड देत असतो—-
गव्हाणे कुटुंब गोपाळ या भटक्या जमातीचे आहे.या जमातीत अजुन एकही उद्योगपती,कलेक्टर,मंत्री,साहित्यीक,वैज्ञानिक,विचारवंत,लेखक असे प्रतिभावान निर्माण झालेले नाहीत.शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. आर्थिक कुवत कमी आहे.पुर्वाश्रमीच्या चोरी करणार्या जमातींपैकी एक असा शिक्का पडलेला आहे. शिरुर, श्रिगोंदा या भागात तर हातभट्टीची दारु बनवणे हा प्रमुख व्यवसाय (?).यात सामाजिक प्रतिष्ठा नाही. थोडीबहुत कुस्ती क्षेत्रात कामगीरी आहे.म्हणुन बरे.सर्व भटका समाज ज्या समस्यांना तोंड देत असतो. त्याच समस्या या लोकांना आहे.पोलिसांच्या ‘छाप्या’ ची टांगती तलवार आहे. दुसरा पारंपारीक व्यवसाय नाही.शिक्षण कमी.म्हणुन सरकारी व तांत्रीक क्षेत्रात नोकर्यांमधे स्थान नाही.वगैरे बरेच प्रश्न घेवुन हा समाज जगत आहे.
शिवाय दोन कुटुंबांमधे शत्रुत्व कोनत्या टोकाला जाईल याची खात्री नाही—
शिवाय या दोन कुटुंबांमधे शत्रुत्व निर्माण होवुन कोनत्या टोकाला जाईल याची खात्री नाही.
एकंदरच एक नाहक मुलगा मात्र यात बळी गेला आहे. ‘कामातुरा ना भय न लज्जा ‘ असा हा प्रकार घडला आहे. यानिमित्ताने समाजात वैचारीक व प्रबोधनात्मक आत्मपरिक्षण होणे आवश्यक मात्र आहे.