
Contents
Dead Body Found? चिंचणी बॅकवॉटरमध्ये आढळले अनोळखी पुरुषाचे प्रेत?
बातमी,शिरुर,दिनांक 14 मे 2025:
(Satyashodhak News Report)
Dead Body Found?: शिरूर, पुणे – दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मौजे चिंचणी गावाच्या हद्दीत धरणाच्या बॅकवॉटरमध्ये अंदाजे 40 ते 45 वयोगटातील अनोळखी पुरुषाची प्रेते आढळली. सदर घटनेची माहिती स्थानिक मच्छीव्यापारी बाळासाहेब जगन कचरे (वय 45, रा. चिंचणी) यांनी पोलिसांना दिली.
मृतदेह पाण्यात आढळल्याची माहिती दिली—-
घटनेच्या हकीकतीनुसार, बाळासाहेब कचरे यांना गावातील अनिल माणिक पवार यांचा फोन आला आणि त्यांनी धरणाजवळ एक मृतदेह पाण्यात आढळल्याची माहिती दिली. यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली आणि पोलिसांना कळवले. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्याबाहेर काढला.
कोणतेही ओळखपत्र आढळले नाही—-
प्राथमिक तपासात मृतदेहाचे शरीर कुजलेले असून, त्यावर जलचर प्राण्यांनी कुरतडल्याचे स्पष्ट दिसून आले. अंगावरील त्वचा सुटून गेलेली असून प्रेतावरून दुर्गंधी येत होती. सदर मृतदेहाचे कोणतेही ओळखपत्र आढळले नसून तो सध्या ‘अनोळखी’ म्हणून नोंदविण्यात आलेला आहे.
पुढील तपास शिरुर पोलीसांकडे—-
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार टेंगले करत असून, पोलीस हवालदार वाडेकर यांनी घटनास्थळावर उपस्थित राहून प्रकरणाची नोंद केली आहे. प्रभारी अधिकारी पोनि. केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
कोणताही नागरिक जर या मृत व्यक्तीची ओळख पटवू शकत असेल, तर त्यांनी शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.