धनगर समाजाला विविध मागण्यांसाठी एकत्र येण्याचे शिवाजीराव कुर्हाडे यांनी शिरुर तालुक्यातील धनगर समाज बांधवांना केले आहे. समस्त धनगर समाज शिरुर तालुका 23 सप्टेंबरला कानिफनाथ मंदिर समोर जोरदार रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती श्री.शिवाजीराव कुर्हाडे यांनी केली आहे.
धनगर समाज शिरुर तालुका सहभागी होणार. .
धनगर समाजाच्या महाराष्ट्र सरकारकडे विविध मागण्या बर्याच काळापासुन आहेत.त्याचा एक भाग म्हणून सकल धनगर समाज महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचा पंढरपुर येथे उपोषण चालु आहे.त्या कार्यकर्यांना पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज शिरुर तालुका रास्ता रोको आंदोलन कानिफनाथ मंदिर न्हावरे फाटा येथे करणार असल्याची माहिती श्री शिवाजीराव कुर्हाडे यांनी सत्यशोधक न्यूज ला दिली आहे.’धनगर’
धनगर समाजाचा अनुसुचित जमातींत समावेश करण्याची मागणी मुख्यत्वे…
या उपोषणकर्या व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी धनगर समाजाला S.C.(Scheduled Tribes) अर्थात अनुसुचित जमातीचा दर्जा द्यावा व अनुसुचित जमातीचे आरक्षण द्यावे ही एक प्रमुख मागणी आहे. या आधी अनुसुचित जमातीचा प्रवर्ग व अनुसुचित जमातींची सुची अस्तित्वात आहे. या प्रवर्गासाठी महाराष्ट्रात 7℅आरक्षण लागु आहे. धनगर समाजाचा सुद्धा या प्रवर्गात समावेश करण्यात यावा,असे सकल धनगर समाजाची मागणी आहे.
डॉ.नितीन पवार, उमेदवार,संपादक व शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ, आम आदमी पक्ष, शिरुर.
” आरक्षण हे साधन आहे की साध्य? तर साधन आहे.Tool आहे.भारतात जातीव्यवस्था नावाचा एक अत्यंत गुंतागुंतीचे सामाजिक structure आहे.व्यक्तीचे जवळजवळ सर्व जीवन जातजाणीव बरोबर घेऊन जगले जाते.त्यामुळे अनेक समस्या व्यक्ती व सामाज यांना भोगाव्या लागतात.तर तीचे काहीही कर्म /कर्तृत्व न करता अनेक फायदेही व्यक्तीला मिळतात.हे मी संविधान लागु होण्याआधीची परिस्थिती सांगतो आहे.त्यानंतर जवळपास 75 वर्षांचे आपले राष्ट्रजीवन किंचीत बदलले.मात्र जातीव्यवस्था वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होत राहीली.टिकली.
सर्व जातींचा सामाजिक दर्जा व संधी यांची एक उतरंड आपण पाहतो.परिणामी काही जाती व त्यांचे प्रवर्ग निर्माण केले.समदुख्खी व समशोषित लोकांचे.असमान संधी व सामाजिक दर्जा यांमुळे आरक्षणाचे धोरण आणले गेले.मुळ दुखणे जातीव्यवस्थेचे अस्तित्व असणे हे आहे.सर्वांना समान पातळीवर आणणे गरजेचे होते.नाहीतर सामाजिक व पर्यायाने आर्थिक गैरबराबरीमुळे या व्यवस्थेमधे भरडले गेलेले आणखीन भरडले गेले असते.
म्हणुन जातीच्याच आधारावर आरक्षणासारखे धोरण ठेवावे लागले.त्यातुन जातींमधे जागरुकता आली.आणि आरक्षणासारखे साधन एक प्रभावी साधन आहे हे अनुसुचित जाती जमातींच्या प्रगतीतुन दिसले.त्यातुन आरक्षण व प्रवर्ग मिळवण्याची धडफड या ना त्या प्रकारे सुरु झाली.
तरी आम्ही आरक्षण व तत्सम धोरणे कायम नसावीत,असे मानतो.कारण त्यामुळे समाज विभागला जातो.’बाल्कनायझेशन’ व्हायला वेळ लागणार नाही. म्हणुन होईल तेवढ्या लवकर सामाजिक विषमतेचा बकलाग भरुन जातीव्यवस्था समाप्त झाली पाहीजे. जात,पोटजात कुठेही नोंद केली गेली नाही पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.
राजकारणातील लोकांना जात संपणे आवडत नाही.वोट बन्केचे राजकारण करुन तात्पुरता फायदा लाटण्यासाठी जातीसमुहाचा वापर राजकारणात स्वतःच्या फायदयासाठी होतो.हे स्पष्ट आहे.पण मुळ समस्या ‘जात’ही आहे.ती नष्ट करण्याचा अजेंडा आज कुणाकडेच नाही. काही दशकांपुर्वी थोडाफार का होईना असे.
हा अजेंडा नव्या काळात नव्याने डिझाईन करावा लागेल. जात आजसुद्धा मार्क्स च्या अफुच्या गोळीसारखी आहे.जरा डिवचुन पहा म्हणजे समजेल !म्हणुन का.शरद पाटील यांनी यावर दोन विलाज सांगितले होते.एक आंतरजातीय विवाह करण्याची सक्ती करणे.कोणी म्हणेल सक्तीने कसे जमेल ?पण हा बहाणा आहे.आणि आता सजातीय विवाह करण्याची सक्तीच नाही का?पण होतात ना ! रक्ताची नाती नसल्यामुळे द्वेष ,अविश्वास,भिती,स्पर्धा,असुया,संघर्ष, दंगली इ.होतात.पण एका जातीअंतर्गत असे झालेले दिसून येत नाही. नवीन पिढी हे लगेच स्विकारेल ! अन्यथा यात पद्धतीला नकळतपणे का होईना नवी पिढी नाकारताना दिसते.दुसरे जमिनींचे फेरवाटप करणे व स्थानांचेही स्थानांतर करुन फेररचना करणे हा मार्ग आहे. नंतर विस्ताराने यावर लिहील ! जिथे जन्मावर आधारित दर्जाची अवैज्ञानिक व्यवस्थेवर समाज चालतो तो काय महाशक्ती आणि विश्वगुरु ढेकळं बनणार आहे.शत्रुने जर जातींना शस्त्रे पुरवली तर काय परिस्थिती, चित्र असेल याची कल्पना करा !जिथे जो शिरजोर असेल तो त्याचा नवीन देश बनविल ! असे भारताचे 48 तुकडे करण्याचा चीनचा प्लन आहे,असे वाचनात आले आहे. “
—- डा.नितीन पवार संपादक.
पुणे नगर रोडवर कानिफनाथ मंदिरासमोर हे रास्ता रोको…
धनगर समाज शिरुर तालुक्यातील पुणे नगर रोडवर कानिफनाथ मंदिरासमोर हे रास्ता रोको आंदोलन करणार आहे.त्यासाठी परवानगी मिळावी, असे निवेदन देखील तहसिलदार शिरुर यांना देण्यात आले आहे. यावेळी श्री. शिवाजीराव कुर्हाडे ,
रामकृष्ण बिडगर, सतिश तागड,अविनाश पोकळे, प्रमोद तांदळकर इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरुर पोलिसांकडे ही परवानगीची मागणी….
हे आंदोलन सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी साडेअकरा ,11:30 वाजता कानिफनाथ मंदिर न्हावरे फाटा येथे सुरु करणार असल्याचे श्री. शिवाजीराव कुर्हाडे यांनी सांगितले आहे.तसेच शिरुर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना देखील हे निवेदन देवुन रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे,पंढरपुर, नेवासा,लातुर येथे सुरु आमरण उपोषण. ..
धनगर समाज एस टी आरक्षणासाठी पुणे,पंढरपुर, नेवासा,लातुर या ठिकाणी धनगर समाज बांधव आमरण उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
धनगर समाजाच्या मागण्यां पुढील प्रमाणे आहेत —
1. धनगर समाजाचे धनगर दाखले तत्काळ रद्द करण्यात यावेत. 2. धनगर एस टी आरक्षणाची मागणी तत्काळ मान्य करण्यात यावी. 3. त्यासंबंधीचा जी आर सरकारने तत्काळ काढावा.
या रास्ता रोको आंदोलनात समस्त व सकल धनगर समाजाने खालील क्रमांकावर तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन श्री.शिवाजीराव कुर्हाडे यांनी केले आहे. -🙏 9623555125/9890916326🙏
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com