
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 शिरुरमधे धारदार वस्तुने मारहाण ! गुन्हा दाखल.
- 1.1 शिरुरमधे ‘ आमच्या गावात कसे राहतोस तेच बघतो ‘ असे म्हणत धारदार वस्तुने मारहाण. …
- 1.1.1 शिरुर , दि. 25 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
- 1.1.2 शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे रोख रक्कम व दागिन्यांची चोरी….
- 1.1.3 शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत मारामारी?….
- 1.1.4 “तु आमच्या गावात कसे राहतोस हेच बघतो”अशी धमकी?
- 1.1.5 शिरुर परिसरात कुठे मिळतात धारदार वस्तु? ….
- 1.1.6 भारतात खाजगी शस्त्रे बाळगायला परवानगी नाही. …
- 1.1.7 ही प्रवृत्ति सामाजिक समस्या? …..
- 1.1.8 About The Author
- 1.1 शिरुरमधे ‘ आमच्या गावात कसे राहतोस तेच बघतो ‘ असे म्हणत धारदार वस्तुने मारहाण. …
शिरुरमधे धारदार वस्तुने मारहाण ! गुन्हा दाखल.
शिरुरमधे ‘ आमच्या गावात कसे राहतोस तेच बघतो ‘ असे म्हणत धारदार वस्तुने मारहाण. …
शिरुर , दि. 25 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )

शिरुरमधे धारदार वस्तुने एकाला मारहाण करण्यात आली आहे. आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यावेळी फिर्यादी कैलास महादेव शेळके यांनी शिरुरमधे ‘ आमच्या गावात कसे राहतोस तेच बघतो ‘ असे म्हणत धारदार वस्तुने मारहाण केली गेली आहे. अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. तर शिरुर तालुक्यातील दुसर्या एका घटनेमधे 35000 रुपये रोख व 35000 रुपयांचे सोन्याचे दागीने यांची चोरी झाली आहे.
शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे रोख रक्कम व दागिन्यांची चोरी….
शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे 35000 हजार रोख व 35000 हजार रुपये किमतीचे सोन्याचा दागिने चोरीला गेले आहेत. एकूण किमतीचे श्री. संपत गणपत जगताप, रा. शिरसगाव काटा, यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ता. 23/06/2024 रोजी रात्री 8:30 ते 01:36 वाजण्याचा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुद्दाम लबाडीच्या इरादयाने स्वतःचे फायदयाकरीता ही चोरी केलेली आहे. या कारणावरून शिरूर पोलीस ठाण्यात आय सी पी कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
या चोरीच्या घटनेचा पुढील गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक श्री. संपत खबाले हे करत आहेत.
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत मारामारी?….
तर दुसर्या एका घटनेत तारिख 24/06/2024 रोजी दुपारी 3:00 वाजण्याच्या सुमारास शिरूर,ता.शिरूर,जिल्हा-पुणे गावच्या हद्दीत मार्केट यार्ड , शिरूरच्या मागील बाजूस फिर्यादी कैलास महादेव शेळके, राहणार- दानेवाडी, ता.श्रीगोंदा ,जिल्हा- अहमदनगर हे मोटर सायकल वरून काकडी घेऊन घरी चालले होते. त्यावेळी आरोपी इसम नामे 1) आशिष संपत थेऊरकर 2) संपत जयवंत थेऊरकर व इतर अनोळखी सात ते आठ ईसम यांनी गर्दी जमा केली.त्यानंतर ही माणसे जमवून दिनांक 22/06/2024 रोजी दाणेवाडी गावी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यानि शिवीगाळ व दमदाटी केली.नंतर सर्वानी हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . फिर्यादी खाली पडला असताना आशिष संपत थेऊरकर याने त्याच्या हातातील धारदार वस्तुने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर जोराने मारून अंगठ्याला मोठी जखम केली आहे.
“तु आमच्या गावात कसे राहतोस हेच बघतो”अशी धमकी?
फिर्यादीचा मुलगा संदेश शेळके सोडवायला आला.तेव्हा असताना त्यालाही मारहाण केली.आरोपी जाताना फिर्यादी याला, ” तु आमच्या गावात कसे राहतोस हेच बघतो.” असे बोलून धमकी दिली आहे .म्हणून या कारणाने शिरूर पोलीस ठाण्यात ता. 25/06/2024 रोजी मध्यरात्री 592/2024 IPC कलम 326, 143, 147, 148, 149,323,504,506 प्रमाणे वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहेत . वरील दोन्ही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक श्री. ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.
शिरुर परिसरात कुठे मिळतात धारदार वस्तु? ….
धारदार वस्तु शिरुर तालुक्यात जी हाणामारीत वापरली जातात.यावर कोनताच मार्ग नाही का?की अशी वस्तु बनवुन देणार्यावर वचक राहिल.त्याने ते दिले तर ते पोलिसांना लवकरच समजेल.पोलिस त्याची झडती घेवु शकते.ही बनवून देणारे मुख्यतः लोहारकाम करणारे असतात.ते सांगेल तशी वस्तु बनवून देतात.कारण हे सांगितले जाते की शेतीकामासाठी ही वस्तु लागत आहे.आवश्यक आहे.किंवा अगदी बिबट्याशी लढण्याची वेळ आलिच तर त्यासाठी कोयता व इतर लोखंडी व धारदार पाते असलेल्या वस्तु कम शेतीपुरक साहित्य/अवजारे बनवुन लोहारकाम करणारे लोक बनवुन देतात.
याव्यतिरिक्त अन्य काही रेडीमेड अशा साधनांचा पुरवठा केला जातो, असे सांगितले जाते. पण हे योग्य आहे का?अमेरिकेत शस्त्रे बाळगायला परवानगी आहे.तेथे यादवीच्या काळात हे सुरु झाले. नंतर आज देखील ते आहे.परिणामी शाळामधल्या माथेफिरु विद्यार्थ्यांनी घरुन पिस्तुल आणले व शाळेतच बेधुंद गोळीबार केला. अशा बातम्या येत असतात. अर्थात अमेरिकेत उच्च शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. पोलिस यंत्रणा सर्व साधनांनी भक्कम आहे.
भारतात खाजगी शस्त्रे बाळगायला परवानगी नाही. …
भारतात भारतीय नागरिकांना प्राणघातक वस्तु बाळगायला परवानगी नाही. ती द्यावी अशीही काही सामाजिक कारणांनी पिडीत लोक लोक हा उपाय सुचवतात.पण भारतात साधी भांडणे रोज घरात,शेजारी व समाजात चाललेली असतात.त्यामुळे अशी परवानगी देणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणार्या सरकारी यंत्रणाना डोकेदुखीच ठरेल.हे स्पष्ट आहे. पण कायद्याचा भंग करणे.किंवा त्यातून पळवाट काढणे यात भारतीय लोक एक्सपर्ट आहेत.हे जगजाहिर आहे.किंबहुना कायदे हे पालन न करण्याचा इथे एक फिनाफिनाच आहे.यातुन बंदुक फार कमी पण अशी इतर प्राणघातक शस्त्रे बाळगायला सोपे आहे.प्रसंगी वापरायलाही सोपे आहे. कारण पोलिसांचा धाक या लोकांना वाटत नसावा.ते याचा वापर करताना मात्र दिसुन येतात.लांडग्यांसारखे कळपाने सावजावर तेही गरीब उदाहरणार्थ हरिण वर हल्ला करतात.हे सर्रास दिसुन येते.हेच लांडगे नंतर ते सावज खाण्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठतात.
ही प्रवृत्ति सामाजिक समस्या? …..
ही प्रवृत्ति एक सामाजिक समस्या देखील इथे आहे. तो वेगळा चर्चेचा विषय आहे. पण याची जबादारी अर्थातच पोलिसांकडे बोट दाखवते.पुर्वीच्या सरंजामशाही कालखंडाचे अवषेश म्हणुन काही केंद्रे अस्तित्वात आहेत.हे दहशत करतात.यांच्याकडे बेरोजगार तरुण काही तरी खायला प्यायला मिळण्याच्या आशेने या सरंजामदारांच्या दावणीला बांधले जातात.हे सरंजामदार लोकशाही (?) पद्धतीने सरपंच,नगरसेवक, आमदार, खासदार देखील होत असतात.ते या पडिक बेरोजगारांना कार्यकर्ता असे नाव देतात.आपल्या उद्देशांसाठी मग वापरुन घेतात.