
धर्म, मानव आणि सृष्टीचा समतोल
अतिथी लेख :✍️ लेखक : माणिक भडंगे
धर्म, मानव आणि सृष्टीचा समतोल यावर आधारित माणिक भडंगे यांचा अतिथी लेख. मानवसेवा हीच विश्वसेवा आणि जाती-धर्मापलीकडे जाऊन सर्वांच्या प्राणांचे रक्षण करण्याचा संदेश.
धर्म आणि धर्मांतर ही संकल्पना मानवजातीइतकीच जुनी आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र इतिहासाकडे पाहिल्यास असे दिसून येते की जाती-धर्मांच्या सीमारेषा ओलांडून मानवाने सातत्याने धर्मांतर केले आहे. या प्रक्रियेतूनच “मानवधर्म” ही सार्वत्रिक संकल्पना उभी राहिली.
मानवाचे रक्षण हेच प्रत्यक्षात सृष्टीचे रक्षण आहे. कारण मानव आणि सृष्टी यांच्यात एक अदृश्य समतोल आहे. या विश्वाला आधार देणारा सर्वोच्च शक्तिस्रोत हा निसर्गच आहे. जन्म आणि मृत्यू हे अपरिहार्य सत्य आहे. जो जन्माला येतो तो मृत्यूला जातो. परंतु या पृथ्वीवर जीवनाची अखंड परंपरा सतत चालूच राहते.
धर्माच्या नावाखाली विभागणी नको–
धर्माच्या नावावरून समाजात विभागणी होणे धोकादायक आहे. लोकशाही आणि संविधान या दोन मोठ्या मूल्यांना जातीयतेचा व धार्मिक वादांचा रंग लावणे योग्य ठरणार नाही. “सृष्टी एकच आहे, मानव एकच आहे” हे तत्व आपण लक्षात घेतले पाहिजे. धर्माच्या नावाखाली कुचंबना होणे म्हणजे मानवतेवरच अन्याय होय.
मानवसेवा हीच विश्वसेवा आहे. त्यामुळे प्रत्येकाने जाती-धर्मापलीकडे जाऊन मानवाच्या प्राणांचे रक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.
कबूतरखाना आणि मानव—–
पशुपक्षी, प्राणी, कबूतर यांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी आधी मानवाचे रक्षण आवश्यक आहे. कारण पशु-पक्ष्यांचे संगोपन, त्यांना अन्नधान्य व चारा देणारा, त्यांचे रक्षण करणारा हाच मानव आहे. जर मानव जिवंत राहिला नाही, तर पशुसंवर्धन शक्य होणार नाही.
धर्माचा गौरव गाण्याऐवजी, जात-पात मिरवण्याऐवजी जर आपण आरोग्य, शिक्षण, अन्न, पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र आलो, तरच खरी धर्मसेवा होईल. सर्व धर्मांमध्ये “सर्व जीवांचे रक्षण” हाच खरा संदेश आहे.
समाजासाठी आवाहन—
आज अनेक गरिब कुटुंबांना आरोग्याच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मी सर्वांना नम्र विनंती करतो की –
👉 आपल्या घरातील कोणीही आजारी असल्यास एस.एम.बी.टी. हॉस्पिटल (SBMT Hospital) येथे जरूर जा.
👉 एकमेकांना सहकार्य करा, मदत करा.
👉 एखाद्याचा प्राण वाचविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
आपल्यामुळे जर एका कुटुंबाचा जीव वाचला, तर हे जग अधिक सुंदर होईल.
शेवटचे शब्द—-
मानवतेच्या सेवेतूनच खऱ्या धर्माची स्थापना होईल. जाती-धर्मापलीकडे जाऊन आपण “मानवधर्म” जोपासला, तरच पृथ्वीवरील सृष्टीचे रक्षण होईल.
जय महाराष्ट्र! जय भारत! जय हिंद!
– माणिक भडंगे
संस्थापक अध्यक्ष
भारतीय भूमिपुत्र प्रतिष्ठान व अखिल भारतीय कुष्ठ सेवा संघ
धर्म, मानव आणि सृष्टीचा समतोल यावर आधारित माणिक भडंगे यांचा अतिथी लेख. मानवसेवा हीच विश्वसेवा आणि जाती-धर्मापलीकडे जाऊन सर्वांच्या प्राणांचे रक्षण करण्याचा संदेश.
🎯 अधिक माहिती वाचण्यासाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
1. भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता
👉 https://legislative.gov.in/constitution-of-india
2. United Nations – Human Rights
👉 https://www.un.org/en/humanrights
3. World Health Organization – Universal Health Coverage
👉 https://www.who.int/health-topics/universal-health-coverage
4. Ministry of Health & Family Welfare, India
👉 https://main.mohfw.gov.in/
5. Animal Welfare Board of India
👉 https://awbi.gov.in/
6. UNESCO – Peace & Intercultural Dialogue
👉 https://www.unesco.org/en/peace
7. Save The Children India – NGO
👉 https://www.savethechildren.in/
‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून ••••
‘आधार छाया फाउंडेशन, शिरूर’ तर्फे पोलिस व एसटी डेपो अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत राखीबंधन उत्सव!
What is Hindutwa ? “हिंदुत्व म्हणजे नेमकं काय?” – एक मूलभूत परिचय