
Contents
- 1 Dk’z Vision for Education 2025: ‘Dk’z Vision for Education’ तर्फे 10वी महाराष्ट्र बोर्डासाठी ऑनलाईन बॅच सुरू – पहिला महिना मोफत!
- 1.1 Dk’z Vision for Education 2025 First Month Free !
- 1.1.1 Dk’z Vision for Education ही एक नावाजलेली संस्था —
- 1.1.2 धनश्री कोठावळे : एक सफल प्रवास—
- 1.1.3 धनश्री झावरे या २८ वर्षीय तरुणीला स्पर्धा परीक्षेतून करायचे होते करियर—
- 1.1.4 ‘धनश्रीस अकॅडमीक क्लासेस’ची सुरुवात लॉकडाऊनमुळे—
- 1.1.5 सायन्स, गणित, इंग्रजी, एसएसटी विषय शिकवतात—
- 1.1.6 मुलाकडे ती वैयक्तिक पातळीवर लक्ष्य—-
- 1.1.7 लाइव्ह डेमो, exprimental किट्स व डिजिटल किटचा वापर—
- 1.1.8 स्कॉलरशिप, नवोदय, एनएमएमएस, एनटीएसई, एमपीएससी यांचे वर्गही घेण्याची इच्छा —-
- 1.1.9 कुटुंबाची भक्कम साथ गरजेची असतेच—-
- 1.1.10 📚 बॅचची ठळक वैशिष्ट्ये—
- 1.1.11 📲 प्रवेशासाठी माहिती—
- 1.1.12 About The Author
- 1.1 Dk’z Vision for Education 2025 First Month Free !
Dk’z Vision for Education 2025: ‘Dk’z Vision for Education’ तर्फे 10वी महाराष्ट्र बोर्डासाठी ऑनलाईन बॅच सुरू – पहिला महिना मोफत!
Dk’z Vision for Education 2025 First Month Free !
दिनांक 19 जून 2025 | प्रतिनिधी |
” Dk’z Vision for Education तर्फे महाराष्ट्र बोर्ड 10वी ऑनलाईन बॅच 2025 साठी प्रवेश सुरु. पहिला महिना मोफत डेमो, डिजिटल शिक्षण, साप्ताहिक उजळणी, रेकॉर्डेड लेक्चर्स, आणि माफक दरात दर्जेदार तयारी.”
Dk’z Vision for Education ही एक नावाजलेली संस्था —
महाराष्ट्र राज्यातील 10वी मराठी व सेमी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे! ‘Dk’z Vision for Education’ या अनुभवसंपन्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थेने ऑनलाईन बॅच 2025 साठी प्रवेश सुरू केले आहेत.
या विशेष बॅचसाठी 15 जून ते 15 जुलै 2025 दरम्यान मोफत 1 महिना डेमो लेक्चर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक पालक आणि विद्यार्थ्यांना हा दर्जेदार अनुभव नक्की घ्यावा.
धनश्री कोठावळे : एक सफल प्रवास—

👉 Vision Education for all……
‘स्पर्धा परीक्षांची तयारी सोडून धनश्री कोठावळे कोरोना कालावधीत झाली शैक्षणिक क्षेत्रात उद्योजिका’
धनश्री झावरे या २८ वर्षीय तरुणीला स्पर्धा परीक्षेतून करायचे होते करियर—
कधी कधी आपण आयुष्यात एका मार्गावर चालत असतो. आपल्याला वाटत असते आपल्याला काय हवयं हे पक्के ठाऊक आहे आणि आपण त्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. पण खरंतर आपला रस्ता कधी कुठे कसा बदलेल हे कळत नाही. धनश्री झावरे या २८ वर्षीय तरुणीचेही असेच काहीसे आहे. धनश्री २०१९ साली गणित विषयात एमएससी झाली आणि तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तिला यात आपले करिअर करायचे होते.
‘धनश्रीस अकॅडमीक क्लासेस’ची सुरुवात लॉकडाऊनमुळे—
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू होता आणि त्याच दरम्यान कोरोना आला. कोरोनामध्ये सगळे ठप्प झाले. लॉकडाऊनमध्ये मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. शाळा कॉलेज बंद. कोचिंग बंद यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला. धनश्रीच्या आजूबाजूला राहणाऱ्या पालकांनी धनश्रीला त्यांच्या मुलांना शिकवण्याविषयी विचारले. खरंतर धनश्रीचा स्वतःचा अभ्यास चालू होता पण तिनेही विचार केला आपण मुलांना शिकवले तर त्यांचा फायदा होईल आणि आपलाही सराव होईल. यासोबत अर्थार्जनसुद्धा सुरू होईल. हे करता करता धनश्रीचा यात रस निर्माण झाला आणि इथेच ‘धनश्रीस अकॅडमीक क्लासेस’ची सुरुवात झाली.
सायन्स, गणित, इंग्रजी, एसएसटी विषय शिकवतात—
कोरोनाच्या काळात क्लासेस सुरू केले त्यामुळे ते घरातून सुरू झाले. आज धनश्री ऑनलाईन ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे क्लासेस घेतेय. ‘DK’z Vision education for all क्लासेस ‘ दहावीपर्यंत आहेत. सायन्स, गणित, इंग्रजी, एसएसटी असे वेगवेगळे विषय ती शिकवते.
मुलाकडे ती वैयक्तिक पातळीवर लक्ष्य—-
प्रत्येक मुलाकडे ती वैयक्तिक पातळीवर लक्ष्य देते. त्यांचे प्रश्न, समस्या सोडवायला त्यांना मदत करते. एखाद्या विषयात एखादा विद्यार्थी जर कच्चा असेल तर त्यावर काम करणे जास्त गरजेचे आहे असे ती म्हणते. रीव्हिजन, सराव, आणि कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर तिचा भर असतो. धनश्री एसएससी व सीबीएससी बोर्डचे विषय शिकवते. त्यामुळे इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमाची मुले तिच्याकडे येतात. मुलांना त्यांच्या कळेल अश्या भाषेत त्यांच्याएवढे होऊन त्यांच्या संकल्पना नीट स्पष्ट कशा होतील यावर तिचा भर असतो.
लाइव्ह डेमो, exprimental किट्स व डिजिटल किटचा वापर—
कोरोना काळात मुलांचे खूप नुकसान झालंय. अनेक मुलांना वाचताही येत नाही त्यामुळे अभ्यासात ती खूप मागे पडलीत. हे जसं जसे दिवस पुढे सरकले तसे लक्षात आलंय. या दोन वर्षात विद्यार्थांचे शिक्षण बुडाल्याने त्यांना आताच्या अनेक गोष्टी शिकताना प्रॉब्लेम होतो. मग त्यांना अगोदर त्या संकल्पना स्पष्ट कराव्या लागतात. मग पुढचे शिकवावे लागते. पण हेच गरजेचे आहे तरच मुले नीट शिकू शकतात त्यामुळं धनश्री यांच्या वर्गात एका वेळी एका बॅचला केवळ ७ ते ८ मुलेच घेते. या मागचा उद्देश हाच की त्यांना नीट वेळ देता येईल. हे Dk’z Vision education for all क्लासेस’ला इतरांपेक्षा विशेष करते. मुलांना शिकावतना त्या डिजिटल बोर्डचा वापर करतात. लाइव्ह डेमो, exprimental किट्स यांचाही वापर करतात. खूप वेगवेगळी चॅलेंज समोर येतात पण वेळोवेळी त्यावर काम करून त्यांची वाटचाल चालू आहे.
स्कॉलरशिप, नवोदय, एनएमएमएस, एनटीएसई, एमपीएससी यांचे वर्गही घेण्याची इच्छा —-
दरम्यानच्या काळात धनश्रीचे लग्न झाले. पती सैन्यात असल्याने मग काही काळ ती पंजाबला गेली. तिथे आर्मी कॅम्प मध्ये राहिल्यावर तिच्या लक्षात आले की तिथल्या मुलांना हवे तसे कोचिंग मिळत नाही. कॅम्पमधून बाहेर जाणे प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नसते. जरी बाहेर पडले तरी ३ ते ४ किलोमीटर प्रवास असतो. आपल्या महाराष्ट्रात जसे भौगोलिक वातावरण आहे तसे सगळ्या राज्यात नसते. हीसुद्धा एक अडचण शिक्षण घेताना मुलांना येते. कधी काही ठिकाणी खूप जास्त उन्ह असतात तर कधी प्रचंड थंडी मग अश्या वातावरणात मुले बाहेर पडू शकत नाहीत. काही काळ तिथे सुद्धा धनश्रीने मुलांना शिकवले. आज धनश्री पुण्यात असते. इथूनच तिचे क्लासेस चालतात. म्हणूनच आर्मी कॅम्प मधील विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन शिकवणी देण्याचा तिचा मानस आहे. याशिवाय धनश्रीला स्कॉलरशिप, नवोदय, एनएमएमएस, एनटीएसई, एमपीएससी असे स्पर्धा परीक्षेसाठीचे वर्ग सुद्धा घ्यायचे आहेत.
कुटुंबाची भक्कम साथ गरजेची असतेच—-
या तिच्या प्रवासात कुटुंबाची भक्कम साथ आहे. लग्नानंतरसुद्धा आज पती आणि कुटुंबीय यांची खूप साथ आहे. म्हणूनच आज मी हे करू शकते असे धनश्री सांगते. या प्रवासात विद्यार्थ्यांच्या पालकांचा विश्वास वाढलाय. आर्थिक, सामाजिक पातळीवर सुद्धा वाढ झालीय. त्यामुळे लवकरच तिला क्लासेसचा विस्तार करायचा आहे. त्यादृष्टीने तिचे प्रयत्न चालू आहेत.
🎯त्यांच्या या प्रवासाला सत्यशोधक न्यूज नेटवर्क परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा...
📚 बॅचची ठळक वैशिष्ट्ये—

🎯ऑनलाईन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅचेस
🎯डिजिटल बोर्डवर अध्यापन
🎯प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष
🎯साप्ताहिक उजळणी आणि शंका निरसन सत्र
🎯साप्ताहिक सराव चाचण्या
🎯प्रिंटेड नोट्स
🎯अत्यंत माफक दर
📲 प्रवेशासाठी माहिती—
गुगल प्ले स्टोअर वरून अँप डाउनलोड करा – Dk’z Vision
संकेतस्थळाला भेट द्या:
टेलिग्राम चॅनेल: https://t.me/Dkzvision_for_education
ऍडमिशन साठी संपर्क (व्हॉट्सअॅप):
👉9699399536
🌐पाल्याच्या सर्वांगीण व दैदिप्यमान यशासाठी आजच नावनोंदणी करा!
👉आणखीन माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना •••• —
🔗
Maharashtra SSC Board Official Site
National Digital Library of India
👉सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून —-
https://satyashodhak.blog/mall-shirur-news-shree-ramdevji-super-mall-udghatan-shirur/
—