
दुःखद निधन : आमचे मार्गदर्शक मिञ रविंद्र भानुदास गुळादे यांचे निधन!
शिरुर | २५ एप्रिल २०२५ —(सौ.कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर शहरातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व समाजसेवी मिञ रविंद्र भानुदास गुळादे (वय ३८) यांचे आज २५ एप्रिल २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
रविंद्र भानुदास गुळादे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यध्यक्ष होते.शिरूर शहरातीलनागरिकांचे प्रश्न सोडवण्यिसाठी रविंद्र भानुदास गुळादे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यामातुन अनेक आंदोलने केली.
रविंद्र भानुदास गुळादे हे दिलखुलासव्यक्तीमत्व होते.हसतमुख चेहरा असलेले व्यक्तिमत्व होते. शहरातीलनागरिकांच्या प्रशावर त्यांनी आक्रमक भूमिका नेहमी घेतली.त्यांचे कार्य शिरुरकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.
रविंद्र भानुदास गुळादे हे एक चांगले मित्र देखील होते.’सत्यशोधक न्युज’ शी त्यांचा नेहमी संपर्क असायचा.त्यांनी अनेक वेळा ‘सत्यशोधक न्युज’ ला मदत व प्रोत्साहन दिले.त्यांच्या अकाली जाण्याने आम्ही पोरके मात्र झाले आहोत !
अंत्ययात्रा आज सायंकाळी ०६:०० वाजता होलार आळी, शिरुर येथून निघेल. अंत्यविधी शिरुर अमरधाम येथे होईल.
गुळादे सर हे एक संयमी, अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे मार्गदर्शन आणि मैत्री अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली:
शिरुर शहरातील समस्त नागरिकांकडून
शोकाकुल:
गुळादे, माने, ढोबळे परिवार
रविंद्रभाऊ ढोबळे मिञ परिवार