

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- आम आदमी पार्टी.
महाराष्ट्रातल्या तथाकथित चाणक्याने (देवेंद फडणवीस) आता राजीनामा द्यावाच – मुकुंद किर्दत, आप.
शिरुर, दि.6 जुन : (डॉ.नितीन पवार)
देवेंद फडणवीस यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या पराभवाची जबाबदारी घेऊन खरा राजीनामा द्यावा,अशी मागणी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री.मुकुंद किर्दत यांनी करत आज राज्याचे उपमुख्यमंत्री व ‘चाणक्य’असे कालपरवा पर्यंत समजले जाणारे याच्यावर घणाघात टिका केली आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी घेऊन देवेंद फडणवीस यांनी राजीनामा दिला होता.पण तो स्विकारण्यात आला नव्हता. तर हे एक नाटक देवेंद फडणवीस यांनी केले होते. पण त्यांनी खरा राजीनामा द्यावा,अशी मागणी मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
घरे फोडण्याची कृती….
देवेंद फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.त्याआधी राज्याच्या राजकारणातील अनेक नाट्यमय घटनांमधे देवेंद्र फडवणीस हे ,’सक्रिय‘,होते.हे सर्वांना माहिती आहे.त्यामुळे त्यांना इतिहासातील कुटनितीतज्ञ आर्य चाणक यांची उपमा दिली जात होती.परंतु त्यांच्या या कुटनीतिला महाराष्ट्रातील जनतेने साफ नाकारले आहे, हे त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही.अगदी ‘घरे’ फोडण्यापर्यंत कृत्ये केली गेली.साम,दाम,दंड,भेद असे चाणक्यनितीतील सर्व प्रयोग देवेंद फडणवीस यांनी केले होते. त्यात त्यांना ,’यश’ मिळाले होते.पण लोकशाही प्रतिनीधी काही काळाकरता निवडले जात असतात. पुन्हा नवीन लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणुका होत असतात.दरम्यानच्या काळात जनतेला विचार करायला,आपण निवडलेल्या प्रतिनीधींचा लेखाजोखा पहायला मिळत असतो.आपले प्रतिनिधी योग्य वाटले नाहीत तर ते निवडणुकीच्या माद्धमातुन बदलण्याचा अधिकार असतो.जनता हीच सर्वोच्च मानली जाते.ही गोष्ट असे ,’चाणक्य’ विसरुन मनमानी करु लागले तर जनता त्यांना घरी बसवते.

अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेच्या प्रचारा दरम्यान नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप लावला होता. मोदी हे पुढील वर्षी ७५ वर्षाचे होत असल्यामुळे पक्ष शिस्तीस अनुसरून निवृत्त होतील आणि तत्पूर्वी अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी ते इतरांचा पत्ता साफ करीत असल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये बाजूला सारल्या जाणाऱ्या नावात त्यांनी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचाही पत्ता कट केला जाईल असा दावा केला होता, त्याच वेळेस महाराष्ट्रातील देवेंद्र फडवणीस यांचे नाव या पंख छाटलेल्या नेत्यांमध्ये घेतले होते.
खोके आणि डोके राजकारण. …
महाराष्ट्रामध्ये मतदारांनी भाजपच्या खोके आणि बोके राजकारणाला नाकारले आहे आणि देवेंद फडणवीस यांच्या चाणक्यगिरीला चपराक दिलेली आहे त्यामुळे वरिष्ठांना केवळ विनंतीचे नाटक न करता खरोखरच त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा, शिवराज सिंह चौहान या यादीमध्ये आता देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ येणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली असून त्या संदर्भात राजकीय चर्चा चालू आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन नरेंद्र मोदी हे अमीत शहा यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा अडसर दूर करतील अशी शंका आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता आम्हाला गरज नाही असे विधान भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी केले होते. त्यामुळे या अंतर्गत दुफळी मध्ये काय होणार हे लवकरच कळेल अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा? …
देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे,अभ्यासु,धडाकेबाज प्रवक्ते म्हणून आधी टि व्ही वरील चर्चामधे दिसत.नंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्विकारले.त्यांच्यावर वैयक्तीक कोनते आरोप झाले नाहीत.नंतर जेव्हा clear cut बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळाले नाही. मात्र सत्तेसाठी आकड्यांचा खेळ सुरु झाला.तसे भारतीय जनता पक्ष शत प्रतिशत भाजप,चार सौ पार आणि इतर त्यांच्या मात्रसंघटना असलेल्या ,’ध्येयवादा’ नादात ते आक्रमक आणि षडयंत्रकारक बनत गेले.त्यात नाही नैतिकता देखील विचार न करता त्यांचे हिंदुत्व ज्यांनी खर्या अर्थाने धारदार केले होते.त्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला व कुटुंबाला अपनानित केले.पक्ष फोडला.चिन्ह हिसकावले.सी बी आय ,ईडी,निवडणुक आयोग यांचा कथीत गैरवापर केला.विरोधक भारतीय जनता पक्षात आला तर ,’पावन’,नाहीतर भ्रष्ट म्हणून ईडीच्या माध्यमातुन तुरुंगात ! पदावर असलेले सोरेन व अरविंद केजरीवाल या मुख्यमंत्र्यांना पदावर असताना अटक करुन तुरुंगात टाकले.या बाबींची महत्वाच्या जर्मनी,अमेरिका अशा देशांकडून दखल घेतली जावून भारतात हुकुमशाही प्रवृत्ती वाढीस लागल्याचे संकेत दिले. भारताचे लोकशाही संविधान धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली होती.या टिममधे केंद्र सरकार तर होतच पण महाराष्ट्रातील देवेंद्र फडवणीस हे एक महत्त्वाचे नावही होते.
हे सर्व महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील लोक पहात होते.त्यांना काही समजत नाही,असे या प्रवृत्तींनी ग्रसित धरले होते.परंतु जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष नेतृत्त्वाखालील एन डी ए ला देखील साधारण बहुमत दिले नाकारले. अशा स्थितीमधे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अभ्यासु नेत्याने आत्मचिंतन करणे आवश्यक आहे, हे कोणीही नाकारणार नाही.या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्यातील आम आदमी पक्षाच्या प्रवक्यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.