
Contents
शिरुर मधे गोळीबार?का ,कुठे आणि कोणी केला ? वाचा सविस्तर!
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
शिरूर,दिनांक 21जानेवारी : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

शिरुर मधे गोळीबार ?का ,कुठे आणि कोणी केला ? ते या बातमीत वाचा सविस्तर! या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शिरुर शहरातील सरदार पेठ ते मारुती आळी रोडवर घडला आहे. पुर्वीच्या एक घटनेचा राग मनात धरुन आरोपीने पिस्तुल काढले.ते हाताळत असताना आरोपीकडुन गोळीबार केला गेला. फिर्यादीने शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिस अधिक तपास करत आहेत.
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
शिरुर मधील हलवाई चौक ते मारुती आळी रोडवर घटना !
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार
हकीकत अशी आहे. दिनांक 20/01/2025 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिरूर ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत सरदार पेठ येथील स्विटी प्रोव्हीजन स्टोअर्स समोर हलवाई चौक ते मारूती आळी रोडवर हा प्रकार घडला. कृष्णा वैभव जोशी, राहणार- सरदार पेठ, शिरूर ,तालुका – शिरूर, जिल्हा पुणे याचा फिर्यादी महेंद्र मोतीलाल बोरा, वय -53 वर्ष, धंदा-किरणा दुकान, राहणार- सरदार पेठ, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांनी आरोपी कृष्णा वैभव जोशी, राहणार- सरदार पेठ, शिरूर,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे याने त्याच्या विरूद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाला होता.
Read more >>
पिस्तुल रोखुन ठार मारण्याची धमकी?
म्हणुन तो दारू पिवुन फिर्यादी च्या दुकानाजवळ आला.त्यांना शिवीगाळ करू लागला. त्याने त्याच्या जर्कीगमधील एक पिस्तुल बाहेर काढली. फिर्यादीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या जवळील पिस्तुल फिर्यादीच्या छातीवर रोखले.व म्हणाला, ” मी तुला आज जिवंत सोडणार नाही” .अशी धमकी देवुन पिस्तुलचा खटका दाबत असताना फिर्यादीने त्याचा हात बाजुला ढकलला. तरी देखील त्याने त्याच्या हातामधील पिस्तुल वरील बाजुने मागे पुढे ओढत होता. त्यातुन एक गोळी तेथेच खाली रोडवर पडली. फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देवुन कृष्णा तेथुन पळुन गेला आहे.
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
म्हणुन फिर्यादी कृष्णा वैभव जोशी, राहणार- सरदार पेठ, शिरूर,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांनी त्याच्या विरूद्ध कायदेशिर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल केली आहे.
शिरूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर -46/2025 आहे.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 109,351(2), 352 सह आर्म अॅक्ट 3,25 महा. पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
पुढील पुढील तपास पोलिस सब इन्पेक्टर श्री. चव्हाण हे करित आहेत. दाखल अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक श्री. कारंडे हे आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक ,शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.