Contents 1. गणेशोत्सव निमित्ताने शिरूर शहरात साकारली आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती !1.1. शिरूर गणेशोत्सव देखावा बातमी1.1.0.1. अधिक महत्वाची माहिती वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••• 1.1.0.2. शिरुर न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••• 1.1.1. About The Author1.1.1.1. Dr.Nitin Pawarगणेशोत्सव निमित्ताने शिरूर शहरात साकारली आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती !शिरूर गणेशोत्सव देखावा बातमीशिरूर,दिनांक १ सप्टेंबर २०२५ | प्रतिनिधी |शिरूर शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असून घरगुती व सार्वजनिक गणपतीसमोर आकर्षक सजावटीचे देखावे उभारले जात आहेत. यावर्षी जोशीवाडी येथील निशांत भवर या तरुणाने आपल्या घरच्या गणपतीसमोर तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.निशांत भवर याने सांगितले की, “दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारतो. मागील वर्षीच ठरवले होते की आई तुळजाभवानीचा देखावा करायचा. जवळपास 15 ते 20 दिवस मेहनत घेऊन हा देखावा तयार केला. देवीचा मुखवटा वगळता संपूर्ण साज, प्रभावळ व इतर साहित्य घरीच तयार केले.”या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या अंगावरील साडी नेसविण्याची कठीण प्रक्रिया निशांतने यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे प्रतिकृती तुळजापूरच्या मूर्तीप्रमाणेच डोळे भरून पाहण्यासारखी झाली आहे.निशांत भवरने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श ठेवत शाडूमातीच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली आहे. या देखाव्याच्या निर्मितीसाठी निशांतच्या वडील अमृत भवर, आई मनीषा भवर, भाऊ अक्षय भवर, वहिनी शितल भवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला हा देखावा शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.अधिक महत्वाची माहिती वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••• 🟢 तुळजाभवानी देवी बद्दल माहिती (Maharashtra Tourism)गणेशोत्सवाची पारंपरिक माहितीशाडू मातीच्या मूर्तींचे महत्त्वशिरुर न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••• बेलापूर फॉरेस्ट हिल सोसायटीत ७९ वा स्वातंत्र्य दिन: ऐक्य, उत्साह आणि देशभक्तीचा जल्लोष !तुमची समस्या LIVE : लोकशाहीत जनतेचा आवाज शिरूर पोलिसांची धडक कारवाई : तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त ! About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरूर तालुक्यात चांडोह गावातून 58,750 रुपयांच्या विजेच्या केबल चोरी मराठा आरक्षण आंदोलन थांबणार,मिळणार की चिघळणार? ताजी अपडेट वाचा. ..