
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
गंठण हिसकावून नेले : तिघे चोरटे फरार !
गंठण 4 लाख 20 हजार रुपयांचे !
शिरुर,दि.19 नोव्हेंबर : ( प्रकाश करडे यांच्याकडुन )
गंठण हिसकावून नेले गेले आहे. तिघे चोरटे फरार आहे आहेत. हेगंठण 4 लाख 20 हजार रुपयांचे आहे.ही घटना वडगाव रासाई येथे घडली आहे.
घटना वडगाव रासाईतील….
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानुसार हकिकत अशी की दिनांक 17/11/2024 रोजी दुपारी 4.00 वागण्याच्या सुमारास फिर्यादी सुनिता अप्पासाहेब गोळेकर, वय- 41 वर्ष, धंदा- व्यवसाय, राहणार,कमल पार्क, शिरूर,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे, मूळ राहणार -वडगाव रासाई, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे व त्यांचे पती आप्पासाहेब गोळेकर व मुलगी प्रेरणा असे शुभम मंगल कार्यालय, आंधळगाव, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे येथे हे तिघेही लग्नकार्य झाल्यानंतर त्यांच्या चार चाकी गाडी लावलेल्या ठिकाणी एकामागे एक असे काही अंतराने न्हावरा ते केडगाव चौफुला रोड वरून चालत जात असताना न्हावरा बाजूकडून समोरून तीन अनोळखी इसम मोटरसायकल वरून येऊन अचानक सुनिता यांचे वरील वर्णनाचे सोन्याचे मंगळसूत्र, गंठण जबरीने चोरी करून चोरून नेले आहेत. या मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा शिरुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गेलेला माल पुढीलप्रमाणे आहे —
1) 4,20,000/- रू किमतीचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गंठण ; त्यामध्ये सोन्याची साखळी व त्याच्या मध्ये काळेमणी असलेले व मध्यभागी सोन्याचे पेंडल असलेले जु वा कि अं.
————-
4,20,000/- रूपये येणे प्रमाणे.आहे.
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. …
आरोपींवर भारतीय संहिता कलम 304 (2) प्रमाणे शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक श्री. करांडे हे आहेत.तर पुढील तपास पोलिस सहायक निरिक्षक श्री.चव्हाण हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.