गॅस सिलेंडर ब्लॅक सेलिंग वाढत आहे – संकटातही माणुसकी हरवली का?
Contents
Gas Cylinder Issue,Black Selling etc.
दिनांक 1 एप्रिल 2026| Satyashodhak Article
Gas Cylinder Issue वरुन आढवले.एकदा 2019 साली भारतामध्ये लोक डाऊन नावाचा एक मोठा निर्णय भारताच्या पंतप्रधानांनी अगदी सर्व लोक गाफील असताना घेतला. कुणाला हु की चु करता येणार नाही.अशी जणू पूर्ण खात्री किंवा व्यवस्था करण्यासाठी निर्णय घेण्याची सवय आपल्या पंतप्रधानांना आहे की काय? असेच त्यावेळेस वाटले होते. नोटाबंदीच्या वेळेसही याचे प्रत्यन्तर आले.
आणि पुढे भारतातील लोकांना ज्यांना आता सर्वसामान्य,निर्दोष,निरागस असलं काही उगाचच म्हणू नये.कारण आता तो पूर्वीची भोळा समाज,सर्वसामान्य माणूस, निरागस वगैरे जे लिहायची सवय आहे.बोलायची सवय आहे. नकली मगरीचे अश्रू ढाळण्याची आणि लोकांना प्रभावित करून काहीतरी राजकीय असो किंवा इतर बौद्धिक
असो.काहीतरी आपण विशेष आहोत अशी दाखवण्याची इच्छा असते. ते असे शब्द वापरत असतात.
पण माझ्याच्याने आता ते वापरण्याचे शक्यता संपलेली आहे. कारण मी सुद्धा सर्वसामान्यच आहे. सर्वसामान्यांमध्येच राहतो. आणि सर्वसामान्य जीवन जगतो.फरक फार फार किंचितसा आहे.म्हणून माझ्या हे लक्षात येतं. लिहिण्याची हिंमत माझ्याकडे आहे.हा एक किंचितसा फरक म्हणून लिहितो.
तर अशी एक समाजाची पद्धत होती. संस्कृती होती की ज्यावेळेस समाजावर,संपूर्ण समाजावर एखादे संकट नैसर्गिक असेल किंवा मानवी असेल! आसमानी असेल किंवा सुलतानी ( आधुनिक Gas Cylinder Issue) असेल.अशी एक म्हण म्हणूनच पडली.तर अशावेळी सर्वजण एकत्र येणे आणि एकमेकांना सहकार्य करणे असे घडत असे. किमान तशा कथा, कविता, महाकाव्य आपल्या परंपरेतील ग्रंथांमध्ये,मराठी साहित्यामध्ये, मराठी संतांच्या साहित्यामध्ये मराठी लेखकांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसते.
आणि अशा चांगल्या सज्जनांची तशी अपेक्षा असायची. आणि त्याची समाजात गरज असायची म्हणूनच त्यांनी त्यावेळी ते लिहिलेलं असायचं. म्हणजे गरज होती. डिमांड असेल तर सप्लाय ची गरज असते. हे आधुनिक बाजाराचे तत्व आहे.असो
अशा या शेकडो वर्षांचे वर्षांच्या परंपरेमध्ये समाजाची अनेक वेळा परीक्षा झाली. तो परीक्षेत नापास झाला. कारण तो अनेक आघाड्यांमध्ये वर हरला. तिथंच ताब्यात गेला दुसऱ्यांच्या. गुलाम झाला. जेव्हा आपण गुलाम आहोत हे समजत नाही. त्यावेळेस तो गुलामगिरी एन्जॉय करतो.आणि ज्यांना कुणाला समजते की आपण गुलाम आहोत हे समजते.
तेव्हा तो काहीतरी धडपड करतो. त्याला त्याची लज्जा वाटते. असे घडले. काही लोकांना तशी ती वाटली. त्यांनी प्रयत्न केले. काही इंग्रजांची मजबुरी काही अशा लोकांचे प्रयत्न, कुर्बानी, बलिदान, शहादत वगैरे झाले. अखेर भारत हा देश म्हणून आधुनिक संकल्पनेनुसार ‘नेशन’ म्हणून निर्माण झाला.
आता मूळ स्वभाव असलेला आणि तो स्वभाव असण्याची आणि तो स्वभाव बनण्याचे कारणही मी सांगतो. ते हे की भारतीय समाजामध्ये बंधुभाव,ब्रदरहुड अस्तित्वात नसते. याचे मुख्य कारण भारतीय लोक सहजतेने रक्ताचे नाते निर्माण करू शकत नाहीत. रक्ताचे नाते फक्त जातीतच निर्माण होते.आणि म्हणून एका जातीला दुसऱ्या जातीतला माणूस आपला बंधू वाटत नाही.अर्थात बंधुत्वाची भावना निर्माण व्हायला मोठा अडथळा निर्माण होतो.
हे असेतु हिमाचल घडत असल्याने सार्वत्रिक बंधुत्व भारतीय संविधानाने जोर देऊन सांगितलेले असले तरी ते भारतीय लोकांमध्ये येणे कठीण झाले.इतर अनेक कारणे व लक्षणे आहेत. फक्त नमुने सांगतो. वेगळी वस्ती, वेगळा व्यवसाय, इ. तो तसा खुप मोठा विषय आहे.
एवढं सगळं उकारण्याची आता काय गरज आहे असं कोणी म्हणेल. पण त्याचा थेट संबंध तुमच्या Gas Cylinder Issue शी असतो , असो तुमच्याकडे लॉकडाऊन लागलेला असो , तुमच्याकडे एखाद्या वस्तूचा दैनंदिन जीवनात गरजेची असणारी, तिचा तुटवडा असो, त्यावेळेस अशा पद्धतीची सडलेली मानसिकता बाळगणारा काय करतो? हे आपण पाहणार आहोत.म्हणुन.
कोरोना काळात माझ्या गावांमध्ये एका व्यक्तीकडे कोरोणाची लस होती. दुसऱ्याला कोरोणाची लस अत्यंत अर्जंट होती. त्याने ती एक हजार रुपयाच्या आसपास अशी काहीतरी किंमत असलेली दुसऱ्याला त्या लसीची गरज होती. तो अडलेला होता.तो भयभीत होता.पहिल्याने दुसऱ्याला ती 25 हजार हजाराला विकली. हे मी माझ्या डोळ्यांमध्ये पाहिलेले आहे. संकट काळात एकमेकांना ‘सहाय्य’ करण्यापेक्षा ‘ब्लॅकमेल’ करणे या बाबीला मी ‘सडलेली मानसिकता’ म्हणत आहे. हे लक्षात घ्यावे.
लॉकडाऊन काळातच मी एक रुपयाची कॉफीची पुडी घ्यायला गेलो. मागच्या बाजूने दुकान चालू होते. पुढच्या बाजूने नव्हते. हाही त्याच मानसिकतेचा एक भाग. एक रुपयाची पुडी त्यांनी मला मी पत्रकार असून देखील पाच रुपयाला विकली. माझाच मित्र होता. पण तो म्हणाला जर पोलिसांनी पकडले तर किती रुपये द्यावे लागतील तुम्हाला माहित आहे ना! मग काय करता?
तिथे असे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत,प्रत्येक दुकानदाराच्या बाबतीत ज्याच्याकडे आहे त्यांनी ते पाच पाच, दहा पटीचे पट किंमत घेऊन विकले. Gas Cylinder Issue हा असाच प्रकार आहे.
शिरूर मध्ये शासनमान्य वेगवेगळ्या दारूच्या दुकानांच्या बाहेर लागलेल्या रांगा. तेथून अनेकांनी दोन चाकी, चार चाकी गाड्यांमध्ये देखील दारू विकत घेऊन ती आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये, धाब्यांवर वगैरे दुप्पट तिप्पट किमतीने विकली.पोलीस संरक्षण त्यावेळेस तिथे तैनात करण्यात आले होते.
कुणाला आपल्या समाजातील,देशातील बंधूंना अशावेळी ज्यावेळेस त्याच्या स्वतःसह सर्वांवर संकटाची वेळ होती. संकटाच्या वेळी एखादा उलट कमी किंमत घेऊन गरजूंना विकेल. हे संत तुकारामांनी केले होते याच महाराष्ट्रात.नाही असे नाही.त्यामुळे त्यांना कुटुंबीयांचे बरेच बोलणे ऐकावे लागले होते. असे भजन करताना, किर्तनामध्ये, पुस्तकांमध्ये सांगितले जाते. लिहिले गेलेले आहे.पण हा सडका मेंदूचा माणूस असे काही करणार नाही.
हा समाज काही खास विशेष आहे. हा पुन्हा पुन्हा गाढवचुका करण्याचे कधी थांबत नाही. इतिहासातून कधी धडा घेत नाही. आणि दुसऱ्या प्रगत समाजाकडून गुलाम कधी झाला तर तेही गांभीर्याने घेत नाही. समाज कसा नसावा असे जपानच्या शालेय अभ्यासक्रम शिकवताना विद्यार्थ्यांना शिकवले जाते. तो भारतीय समाजासासारखा असला तर आपली देखील अवस्था तशीच होईल. आपण गुलाम होऊ. हे भारतात बंगालचा नबाब शिराज उद्दौला पासून शिकवले जाते.असे मी वाचलेले आहे.एका लेखकाने, प्रवाशांने हा जपान मधील अनुभव नोंदवून ठेवलेला आहे
आता इराण युद्ध सुरू झाले.इराण म्हणजे तेल. Gas Cylinder Issue समोर येणारच. तेल म्हणजे डोक्याला लावायचे किंवा वडे तळायचे तेल नाही. खरे म्हणजे हा तेल शब्द पेट्रोल, डिझेलला सुद्धा तेल म्हणून मराठीत पहिल्यांदा कोणी वापरला? तसा तो वापरायला नको होता! तेल हा काही सकारात्मक आहे.पेट्रोल डिझेल वगैरे नकारात्मक शब्द आहेत.
तर अशा प्रकारच्या मानसिकता असलेल्या असलेल्या लोकांना याची चाहूल लगेच लागत असते.आणि मग यांना ही संधी (?) आलेली असते हे ते ओळखतात. छुप्या पद्धतीने वस्तूंचा साठा करून ठेवतात.पोलीस ताबडतोब सर्वत्र छापे मारायला सुरुवात करतात. बातमीदार,चॅनेलवाले, युट्युबवाले त्या बातम्या देतात.असे सुरुवातीचे तीन-चार दिवस होते.
आणि त्यानंतर ‘ब्लॅक’ ने सिलेंडर विकायला सुरुवात होते.मग 1000 चा साधारण गॅस सिलेंडर 3500 रुपयाला घेतल्याचे एकाने मला मार्केट यार्ड जवळ सांगितले. दुकानाचे शटर खाली ओढून आत व बाहेर अशा प्रकारची ही देवाणघेवाण चाललेली होती. Gas Cylinder Issue चे उदाहरण. नाव लिहित नाही. लिहीली तर आयुष्यभर लिहतच बसावे लागेल. कारण 140 कोटींच्या आसपास नावे!
तर असा स्वभाव, अशी मानसिकता, अशी वृत्ती माणसाची का बनलेली आहे. विशेषतः भारतीय लोकांची. याचे मूलभूत कारण देखील मी शोधून समजून लोकांना सांगणे, लिहिणे हे माझे कर्तव्य आहे. याचे खरे कारण ‘लेक lack ऑफ ब्रदरहूड’ हे आहे. बंधुभाव समाजात अस्तित्वात नसणे हे आहे.
आणि हा बंधुभाव निर्माण न होणे याच्यामागे रक्तामध्ये भिडलेली जातीव्यवस्था आहे. जरी लोकसंख्या 147 कोटीच्या आसपास झाली असली तरी हे लोक संकुचितता कमालीची बाळगतात.Hardware बदललेली दिसते. पण Software काही बदललेले नाही जसेच्या तसे आहे.
याचे कारण कोणत्याही दोन जातींमध्ये रक्त संबंध निर्माण होत नाहीत. कारण विवाह होत नाहीत.विवाह करणे यासाठी काही प्रतिष्ठेच्या आणि अप्रतिष्ठेच्या संकल्पना समाजाने फार पूर्वीच निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे तसे केले तर प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठा होते.त्यामुळे साहजिकच एका गावात 1000 लोक राहत असतील तर 25 जाती असतात. एका गावातील लोक 25 जातींमध्ये विभागलेले असतात.
एका जातीतला माणूस दुसऱ्या जातीतल्या च्या माणसाला बंधू समजू शकत नाही. याचे शिक्षण(?) त्याला जन्माला आल्यापासून त्याला मिळायला सुरुवात होते. हे कौटुंबिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर पुढे संक्रमित होते.अस्तित्वात असते. अस्तित्वात आहे. म्हणूनच हा स्वभाव बनतो. हा साधा रोग नाही.
परिणाम याचे नेहमी भयानकच असणार. कुणाला आनंदाचे, दुःखाचे असणार.फार कमी संख्येने लोकांना अशा पद्धतीने पैसा किंवा तत्सम बाबी मिळाल्यामुळे आनंद होतो.बहुसंख्य लोकांना त्रास होणे स्वाभाविक असते.
सर्वसामान्य माणूस हे पाहतो आणि त्याला जर संधी मिळाली तर तो तेच करतो. म्हणून सर्वसामान्य वगैरे मी वर लिहिलेल्याप्रमाणे निरागस वगैरे, गरीब वगैरे असली काही चीज अस्तित्वात नाही.हे ही नोंदवतो. सगळेच ‘हमाम मे नंगे’ आहेत.
तर ही आहे ‘गॅस सिलेंडर आणि सडलेली मानसिकता’ यांची कथा! आज एवढेच !
आणखीन सत्यशोधक लेख :
Sexual Freedom Debate India: स्वातंत्र्य, कायदे आणि समाजातील वास्तव
Bondi Beach Attack: हल्लेखोर पाकिस्तानी, ज्यू समुदायाला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला
