
Contents
- 1 Girls Missing Shirur Taluka शिरुर तालुक्यात मुली बेपत्ता होत आहेत ?
- 1.1 Girls Missing Shirur Taluka ; पाठोपाठ मुली बेपत्ता होण्यामुळे पालक व पोलीसही हैराण !
- 1.1.1 हे ही वाचा….
- 1.1.2 Girls Missing Shirur Taluka : मांडवगण फराटे येथील घटना—
- 1.1.3 घटना 1-
- 1.1.4 Girls Missing Shirur Taluka : मुलीचे वर्णन —-
- 1.1.5 मुलीचे वर्णन –
- 1.1.6 नाव- आलकनंदा कालिदास काळे ,वय- 13 वर्ष, रंग -निमगोरा, नाक – सरळे, केस लांब, डोळे काळे, नेसणीस लाल हिरवे रंगाची साडी.
- 1.1.7 —– हे ही वाचा …
- 1.1.8 Girls Missing Shirur Taluka: दुसरी घटना कवठे येमाई ची —
- 1.1.9 घटना 2
- 1.1.10 खास भेट :
- 1.1.11 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.12 हे ही वाचा …
- 1.1.13 Girls Missing Shirur Taluka: कवठे येमाई येथील मुलीचे वर्णन —-
- 1.1.14 वर्णन –
- 1.1.15 नाव- कु. सपना नारायण चव्हाण, वय- 19 वर्षे, – सावळा, डोकीस काळे केस लांब, नाक सरळ, चेहरा उभट, कपाळावरती मध्यभागी गंद लावलेला, कानात कर्णफुले, गळ्यामध्ये चैन, दोन्ही हातामध्ये कडे हाताचे लाने निकालनेदिल मलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची पॅन्ट, शिक्षण 10 वी, भाषा मराठी, हिंदी.
- 1.1.16 हे ही वाचा. ….
- 1.1.17 About The Author
- 1.1 Girls Missing Shirur Taluka ; पाठोपाठ मुली बेपत्ता होण्यामुळे पालक व पोलीसही हैराण !
Girls Missing Shirur Taluka शिरुर तालुक्यात मुली बेपत्ता होत आहेत ?
Girls Missing Shirur Taluka ; पाठोपाठ मुली बेपत्ता होण्यामुळे पालक व पोलीसही हैराण !
Girls Missing Shirur Taluka News 5 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Girls Missing Shirur Taluka शिरुर तालुक्यात मुली बेपत्ता होत आहेत ? ही बाब चिंतेची बनली आहे. पाठोपाठ मुली बेपत्ता होण्यामुळे पालक व पोलीसही हैराण झाले आहेत. ताज्या बातमीनुसार दोन भिन्न वयाच्या मुली missing बेपत्ता झाल्याची नोंद शिरुर पोलीस ठाण्यात झाली आहे. एक 13 वर्षाची मुलगी मांडवगण फराटा जवळुन तर दुसरी 19 वर्षे वयाची मुलगी कवठे येमाई येथुन बेपत्ता झाली आहे. शिरुर पोलीस या मुलींचा तपास करत आहेत.
हे ही वाचा….
Missing Man Aहेnd Woman: एकच गाव , एकच दिवस एक महिला व एक पुरुष बेपत्ता झाले !
Girls Missing Shirur Taluka : मांडवगण फराटे येथील घटना—
घटना 1-
हकीकत अशी आहे. दिनांक 03/03/2625 रोजी रात्री 01:30 ते पहाटे 06:00 च्या दरम्यान
फिर्यादी कालिदास आभिश काळे, वय- 39 वर्षे ,व्यवसाय- मजुरी, सध्या राहणार – कोळपेवस्ती, मांडवगण फराटा, तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे , मुळ राहणार – मलठण, तालुका – दौंड, जिल्हा -पुणे या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. ते घरी झोपलेले असताना त्यांची मुलगी आलकनंदा कालिदास काळे, वय- 13 वर्ष हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणासाठी त्यांच्या कायदेशिर रखवालीतुन फुस लावुन पळवुन घेवुन गेलेले आहे. म्हणुन त्यांनी त्या अंज्ञात व्यक्तीविरूध्द कायदेशिर तकार शिरुर पोलीस ठाणे येथे केली आहे.
Girls Missing Shirur Taluka : मुलीचे वर्णन —-
मुलीचे वर्णन –
नाव- आलकनंदा कालिदास काळे ,वय- 13 वर्ष, रंग -निमगोरा, नाक – सरळे, केस लांब, डोळे काळे, नेसणीस लाल हिरवे रंगाची साडी.
अज्ञात आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर 148/2025 असा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.वारे हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक श्री. गिरी हे करत आहेत.
—– हे ही वाचा …
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी ‘महामंडलेश्वर’ का बनली ? वाचा एक खास रिपोर्ट !
Girls Missing Shirur Taluka: दुसरी घटना कवठे येमाई ची —
घटना 2
हकीकत अशी आहे. खालील प्रमाणे वर्णनाची मुलगी फिर्यादी नारायण रामभाउ चव्हाण ,वय -37 वर्षे ,धंदा -मजुरी, सध्या राहणार – पोकळदरावस्ती, कवठे येमाई, तालुका -शिरुर, जिल्हा -पुणे यांची कु. सपना नारायण चव्हाण, वय- 19 वर्षे ही दिनांक 03/03/2025 रोजी सकाळी 11:08 वाजण्याच्या सुमारास पोकळदरा वस्ती, कवठे येमाई, तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे येथील फिर्यादीच्या राहत्या घरातुन कवठे येमाई येथे ‘ कपडे शिवण्यासाठी जाते ‘.असे सांगुन राहत्या घरातुन एकटीच निघुन गेली आहे. ती अदयाप पर्यंत घरी आली नाही.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇हे ही वाचा …
Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
Girls Missing Shirur Taluka: कवठे येमाई येथील मुलीचे वर्णन —-

वर्णन –
नाव- कु. सपना नारायण चव्हाण, वय- 19 वर्षे, – सावळा, डोकीस काळे केस लांब, नाक सरळ, चेहरा उभट, कपाळावरती मध्यभागी गंद लावलेला, कानात कर्णफुले, गळ्यामध्ये चैन, दोन्ही हातामध्ये कडे हाताचे लाने निकालनेदिल मलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची पॅन्ट, शिक्षण 10 वी, भाषा मराठी, हिंदी.
हे ही वाचा. ….
Shinde Fadnavis Cold War : तर तुमचा टांगा पलटी करु – एकनाथ शिंदे !
शिरुर पोलिस स्टेशन मधे याची मानव मिसिंग / बेपत्ता नंबर – 34/2025 अशी नोंद करण्यात आली आहे. दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. वारे हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार श्री. गरकळ हे करत आहेत.
पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे.
मुली बेपत्ता Missing होण्याचे एक प्रमुख कारण मोबाईल फोन वर व त्यातील सोशल मीडिया व इतर कंटेंट हा कुमार वयातील मुला मुलींना अश्लील व्हिडिओ, फोटो,चॅटींग इ.गोष्टी या उत्तेजित करणार्या सतत दाखवल्या जातात.हे आहे.प्रेम व विकृत सेक्स यातील फरक या मुला मुलींना समजण्याचे ते वय नसते.त्यामुळे सेक्स करण्याची घाई या वयातील मुला मुलींना होते.त्यात अशा प्रकारच्या वर्तनाचे मुळ आहे.इथे त्याची चर्चा शक्य नाही. पण यावर सत्यशोधक न्युज लवकरच प्रकाश पाडणारे लेखन सविस्तर देईल !