Contents
घुंगरू – इश्काचा नाद खुळा |शुटिंग समर्थ गार्डन मन्गल कार्यालय, शिरूर |
शिरूर, दिनांक 27 डिसेंबर 2025| प्रतिनिधी|
शिरूर (पुणे) येथे दिनांक २४ व २५ डिसेंबर २०२५ रोजी ‘घुंगरू – इश्काचा नाद खुळा’ या मराठी लघु चित्रपटाचे शूटिंग मोठ्या उत्साहात पार पडले. तमाशा व लावणी कलाकारांच्या जीवनातील संघर्ष, व्यथा आणि त्यांच्या कलेचा सन्मान जपणारी ही कथा आहे.
रामदास राऊत लिखित-दिग्दर्शित या चित्रपटात सात पारंपरिक लावण्या, अनुभवी कलाकारांचा अभिनय आणि लोककलेचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षात हा चित्रपट तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार असून, तमाशा कलेप्रती असलेली तळमळ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
शिरूर, दिनांक 27 डिसेंबर 2025| प्रतिनिधी|
दिनांक २४ व २५ डिसेंबर २०२५ रोजी शिरूर येथील श्री समर्थ गार्डन मंगल कार्यालय, बोरुडे मळा येथे घुंगरू : इश्काचा नाद खुळा या मराठी लघु चित्रपटाचे शूटिंग मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाले. या शूटिंगदरम्यान कला, संस्कृती आणि तमाशा परंपरेचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
हा लघु चित्रपट तृप्ती फिल्म प्रोडक्शन यांच्या बॅनरखाली तयार होत असून, याचे लेखन व दिग्दर्शन रामदास राऊत यांनी केले आहे. शूटिंगदरम्यान निर्माते, दिग्दर्शक, लेखक व कलाकारांनी चित्रपटाशी संबंधित विविध प्रसंग व अनुभव सांगितले.
या चित्रपटामध्ये सहा ते सात नृत्यांगनांनी सहभाग नोंदवला असून, पारंपरिक आणि लोकप्रिय लावण्यांनी संपूर्ण शूटिंग स्थळ भारावून गेले. पहिली लावणी “पाटील तुमचा नादच खुळा” ही रेश्मा परितेकर यांनी सादर केली. दुसरी लावणी “राघू कुठे कुठे गेला की” उमा तासगावकर यांनी सादर केली.
तिसरी लावणी “अर्ध्या रात्री सोडून जायचं नाही” लंका पाचेगावकर यांनी, चौथी लावणी “खेळूया नवा” छाया लाखे यांनी सादर केली. पाचवी लावणी “येता का राया संगतीला” शुभांजली थोरात यांनी तर सहावी लावणी “हेज्वानीचे पाखरू कुड कुडतंय” प्राजक्ता माटे यांनी सादर केली. सातवी आणि शेवटची लावणी “अहो दाजी” रेशमा लाखे यांनी सादर करून प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.
या सर्व लावण्यांना शूटिंगदरम्यान उत्कृष्ट संगत लाभली. पार्श्वगायिका शोभा लाखे (इस्लामपूरकर), ढोलकी वादक रमेश खुडे, पेटी वादक सुरेशजी गायकवाड आणि नाच्या धनंजय कावळे यांनी आपल्या कलेने लावण्यांना जीवंतपणा दिला.
चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये पापाबाई बोरगावकर, शोभा लाखे (इस्लामपूरकर), राजेंद्र ताम्हणे (पुणे), अलका जोगदंड (खेड), वीरेंद्र दांगट (पुणे), उदय ढगे (पुणे), नंदकुमार पाटील (पुणे), प्रा. शेळके सर (पुणे), प्रा. विजय जोरी (लोणावळा) तसेच निर्माते-दिग्दर्शक काळुराम ढोबळे (पुणे) यांचा समावेश आहे.
पाहुणे कलाकार म्हणून वसंत अण्णा जगताप (बेल्हे), संजय विश्वासराव, मधुकर कासळ, पत्रकार सतीशजी तागड, फैजल पठाण (पत्रकार, शिरूर), अभिनेत्री अलकाताई जोगदंड व मोहिनी शिंदे यांनीही उत्कृष्ट काम केले.
या चित्रपटासाठी मार्गदर्शक व अभ्यासक म्हणून माननीय बाबाजी कोरडे सर (खेड), राजेंद्र मोरे सर (बारामती), काळुरामजी ढोबळे सर (पुणे), प्रा. संजय थोरात (सांगली) तसेच Y9 चॅनलचे संपादक विशाल लोंढे यांनी विशेष सहकार्य केले.
शूटिंगसाठी श्री समर्थ गार्डन मंगल कार्यालयचे प्रमुख संचालक तुळशीरामजी पांढरे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यापूर्वीही त्यांनी प्रोडक्शनला भरपूर सहकार्य केले असून, त्याबद्दल निर्मात्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
काही मार्गदर्शक शूटिंगला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र वसंत पवार (मुंबई), खंडू भुकन (मा.पंचायत समिती पारनेर), डॉ. पानमन सर, नाट्यनिर्माते-दिग्दर्शक मोहन पानसरे (मुंबई-ठाणे) तसेच कवी सितारामजी नरके (पुणे) यांचे प्रोडक्शनला नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे नमूद करण्यात आले.
या चित्रपटातील लावण्यांचे रेकॉर्डिंग मल्हार स्टुडिओ, पुणे येथे करण्यात आले असून, संगीत संयोजनाची जबाबदारी योगेश कांबळे यांनी सांभाळली आहे. पार्श्वगायन कांता नलावडे यांनी केले असून, त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.
‘घुंगरू : इश्काचा नाद खुळा’ हा लघु चित्रपट तमाशा कलावंतांच्या व्यथा, संघर्ष आणि जीवनमान यांचे वास्तव चित्रण करतो. तमाशा कला जिवंत राहावी, नव्या ऊर्जेसह पुढे जावी, हीच दिग्दर्शक रामदास राऊत यांची तळमळ या कथेमधून व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन वर्षात हा चित्रपट तृप्ती फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार असून, सर्व रसिक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहून लाईक, कमेंट व सबस्क्राईब करावे, असे आवाहन निर्माता-दिग्दर्शक रामदास राऊत (शिरूर, पुणे) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी Links :
🎬 Marathi Short Films (YouTube Search)
https://www.youtube.com/results?search_query=marathi+short+films
💃 Lavani & Tamasha Art Information
https://en.wikipedia.org/wiki/Lavani
🎭 Marathi Folk Art Overview
https://en.wikipedia.org/wiki/Marathi_theatre
📺 YouTube Channel Promotion Guide (Free)
https://support.google.com/youtube/answer/2499768
📰 Local News & Community Journalism (Reference)
https://www.medium.com/tag/local-news
