महाराष्ट्रासाठी आता पहिली महिला मुख्यमंत्री पाहिजे आहे !
महाराष्ट्रासाठी आता पहिली महिला मुख्यमंत्री पाहिजे आहे ! असे माझे ठाम मत आहे.महाराष्ट्रासाठी कोण व का पहिली महिला मुख्यमंत्री असु शकते तेही वाचायला आपल्याला या लेखात मिळेल.
महाराष्ट्रासाठी आता पहिली महिला मुख्यमंत्री पाहिजे आहे !
महाराष्ट्रासाठी कोण व का पहिली महिला मुख्यमंत्री असु शकते ते वाचा…..
शिरुर,दिनांक 4 नोव्हेंबर:
Dr.Nitin Pawar,Editor,satyashodhaknews.com
(संपादकीय लेख – संपादक : डॉ.नितीन पवार )
महाराष्ट्रासाठी आता पहिली महिला मुख्यमंत्री पाहिजे आहे ! असे माझे ठाम मत आहे. महाराष्ट्रासाठी कोण व का पहिली महिला मुख्यमंत्री असु शकते तेही वाचायला आपल्याला या लेखात मिळेल.
महाराष्ट्रासाठी महिला मुख्यमंत्री अदयाप नाही…
महाराष्ट्रामध्ये अद्याप महिला मुख्यमंत्री झालेली नाही. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा असल्याचे नेहमी सांगितले जाते. मात्र यापूर्वी महाराष्ट्राने अजून महिला मुख्यमंत्री झालेली पाहिलेली नाही. मात्र आता महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्र्याची आवश्यकता आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये अनेकांना अशा प्रकारचे म्हणणे अवघड वाटू शकते. परंतु महाराष्ट्राने आता आपण खरंच पुरोगामी विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी केवळ दाखवण्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रामधील पहिली महिलाही मुख्यमंत्रीपदासाठी ‘रेडी’ आहे, तयार आहे. हे आता कृतीने दाखवले पाहिजे.
इतर काही राज्यात कर्तृत्ववान महिला मुख्यमंत्री. …
बहन कु.मायावती : यशस्वी महिला मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश.
भारतातल्या अनेक राज्यांमध्ये उदाहरणार्थ तामिळनाडू ,उत्तर प्रदेश , पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जयललिता,बहन मायावती, ममता बॅनर्जी अशा महिलांना मुख्यमंत्रीपदी आपण पाहिले आहेत. महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत , महिला पंतप्रधान झालेले आहेत. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये एक वैचारिक मंथन होऊन महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री दिसली पाहिजे असे म्हणणे फारच धाडसाचे आहे असे ठरणार नाही.
त्याचे दुसरे असे एक कारण आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या कोणताही एक पुरुष सर्वांच्या मनाची पकड घेईल अशा विशिष्ट सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबतीमध्ये अस्तित्वात नाही असे चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये महायुतीचे सरकार किंवा महाआघाडीचे सरकार येवो. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री हवी आहे.
ब्रिटनचे उदाहरण व मा.शरदचंद्र पवार…..
श्री.शरदचंद्र पवार : हेच ते करु शकतात!
ब्रिटनमध्ये सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये विशेषता महिला चळवळ चालु असताना विन्टल चर्चिल यांच्या काळात इंग्लंडमध्ये ‘ अद्याप महिला पंतप्रधान झालेली नाही ‘ याबद्दल विचारले गेले होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ‘काही काही काळजी करण्याचे कारण नाही. महिलांचे पुरुषांवर अनादी काळापासून वर्चस्व असे’ असे सांगितले होते. (गमतीने? ) . श्री.शरदचंद्र पवार यांनाही पुर्वी हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते की, ‘आम्ही अजून तिथपर्यंत आलेलो नाही !’ असे मी विद्यार्थी असताना वर्तमान पत्रात वाचले होते. मात्र आता माननीय श्री. शरद पवार यांनी तिथपर्यंत जायला काही हरकत नाही !(लहान तोंडी मोठा घास ! पण ….)
महाराष्ट्राने विचार करायला हरकत नाही. …
महाराष्ट्रानेही करायलाही काही हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये, आघाड्यांमध्ये नामवंत महिला राजकीय कारकीर्द करत असताना आपण पाहतो. या महिलांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपण जबाबदारीने आपण राजकारण करू शकतो, मोठी पदे भूषवू शकतो. विकास करू शकतो. राजकारण करू शकतो. परिवर्तन करू शकतो. ही सिद्ध केलेले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन मायावती यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडत ऐतिहासिक अशी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. शासन प्रशासनावर भक्कम पकड आणि एक दलित महिला देखील मुख्यमंत्री होऊ शकते व आपले पद सक्षमरित्या सांभाळू शकते सिद्ध करून दाखवले होते. तीच गोष्ट जयललिता, ममता बॅनर्जी , शीला दीक्षित अशा नामवंत महिला मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे.
आता महाराष्ट्राचा नंबर आलेला आहे. तसे पहिले तर देशातल्या सर्व पुरोगामी चळवळी महाराष्ट्रातून सुरू होतात. असा इतिहास आहे. मात्र याचेच आश्चर्य आहे की महाराष्ट्रात अजून महिला मुख्यमंत्री झालेली नाही. महाराष्ट्राने अनेक राजकीय रंग आणि ढंग पाहिले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जनतेचे मानस पूर्णपणे ढवळून निघालेले आहे. यातून ही एक क्रांतिकारक घटना घडवून यावी असे वाटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. हे काम धाडसाने आणि तेवढ्याच ताकदीने करू शकतील असे एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचे नाव आहे श्री. शरदचंद्रजी पवार साहेब ! तेच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देऊ शकतात आणि ते पुरोगामी विचारांच्या चळवळींमधून, समाजवादी विचारांच्या प्रभावातून आणि त्यांना महाराष्ट्र ‘जाणता राजा’ असेही म्हणतो ! म्हणून ! ही बाब श्री. शरदचंद्रजी पवार हे नक्कीच महाराष्ट्रामधील करून दाखवतील.
मा.शरदचंद्र पवार आणि त्यांचे वय….
बर्याच लोकांना असे वाटते की शरद पवार यांचे वय 84 वर्षे म्हणजे खूप जास्त झालेले आहे. मात्र अजुन 10 वर्ष ते प्रभावी असणार आहेत.मेडीकल सायन्स फार पुढे गेलेले आहे. ते आजही तास न तास उभे राहून भाषण करतात, प्रवास करतात. सध्या साडे सात हजार किलोमीटरचा प्रवास ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवार हे महाराष्ट्रातील विजयश्री खेचून आणण्याची शक्यता जास्त आहे. एवढेच नाही तर ते महाराष्ट्रामध्ये नव्याने राजकीय समीकरणाची सुरुवात करून पुढील काळातील दीर्घकाळातील महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कशी असावी याचा विचार करून त्याची रुजवणीही करत आहेत असे दिसते.
पुन्हा जुने राजकीय सुत्र….
पूर्वी एक सूत्र होते. काँग्रेस नेहमी सत्तेमध्ये असायचा. त्याचा एक फॉर्मुला काँग्रेसचा होता. तो जरांगे पाटील यांच्या तोंडून बाहेर आलेला आहे. तो म्हणजे मराठा, दलित आणि मुस्लिम यांची राजकीय जुळवणी करणे हा आहे.जरांगे पाटील यांचे विचार देखील आधी थोडे वेगळे होते. कदाचित त्यांना या सामाजिक बाबींचे महत्त्व जास्त वाटले नसावे. परंतु आज या घडीला जरांगे पाटील यांनी अशा प्रकारची एक रणनीती ठरवलेली आहे असे दिसते. आणि काल-परवापर्यंत मराठा समाजाच्या संदर्भातच ते जास्त बोलत होते आणि आज मराठा,दलित आणि मुस्लिम यांच्या सामाजिक नेटवर्किंगच्या बाबतीत ते बोललेले आहेत. हे राजकीय गणित असले तरी ज्यावेळेस हे गणित यशस्वी होत असायचे . त्यावेळेस हे मुख्य घटक राजकीय विजयाला कारणीभूत ठरत होते. तरी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळांनी सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व दिलेले होते. मुख्यमंत्रीपद दिलेले होते. मंत्रिमंडळातील पदे दिलेली होती. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे. सध्या महायुतीकडे तेवढ्या ताकदीची महिला नाही असेही म्हणता येणार नाही. महाआघाडीकडे अशा प्रकारच्या ताकदीच्या महिला आहेत. यातही काही शंका नाही.
मुख्यमंत्री पदासाठीचे पुरुष उमेदवार …..
महाराष्ट्रामध्ये सध्या असणारे पुरुष राजकारणी आणि जे या सत्ता संघर्षामध्ये सर्वस्व लावून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते योग्य जरी असले तरी बहुतेक सर्वांना महाराष्ट्राने मुख्यमंत्री पदावर पाहिलेले आहे. केवळ पाहिलेले नाही तर त्यांचे कामही पाहिलेले आहे. मात्र आता पहिली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे हे नक्की ! त्यामुळे एक नवीन आणि नव्याने महाराष्ट्राची वाटचाल वाटचाल पुढे सुरु होईल आणि महाराष्ट्र पुन्हा सर्वसमावेशक अशा राजकारणाकडे जात आणि धर्म यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांच्या सर्वांगीण विकासाचे राजकारण करण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये अधिक अत्यंत आधुनिक अशा तंत्रज्ञानाच्या काळामध्ये एक वेगळा महाराष्ट्र त्याला सामोरे जाण्यासाठी तयार झाला पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे आणि अनेक गोष्टी आता कालबाह्य होणार आहेत. त्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे !
नवे जग..नवा महाराष्ट्र. ..
कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स अशा अत्यंत आधुनिक अशा कालखंडाला आणि तंत्रज्ञानाला येत्या दहा ते वीस वर्षांमध्ये संपूर्ण जगाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत याविषयी जगभर चर्चा चालू आहे. मात्र महाराष्ट्रातील समाजामध्ये अजूनही पूर्वीचे संकुचित विचारांचे राजकारण असो किंवा समाजकारण असो किंवा संस्कृतीच्या बाबतीतल्या गोष्टी असोत. आर्थिक बाबतीतल्या गोष्टी असोत. या अंगाने विचार फारसा चालू असलेला दिसत नाही. यावर काही चर्चा फारशी होताना दिसत नाही. मात्र जगभर या विषयाची चर्चा आहे. अगदी पाकिस्तान मध्ये सुद्धा सामाजिक माध्यमे आणि प्रसार माध्यमांमध्ये याविषयी चर्चा असल्याचे पाहायला मिळते आहे. भारताची पाकिस्तानची तुला होऊ शकत नाही. कारण भारत या आधीच पुढे गेलेला आहे. भारत 140 कोटी लोकांचा देश आहे आणि या देशातील एक टक्का लोक देखील जरी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करत असले तरी देखील त्यांची संख्या मोठी होते आणि त्यांच्यावर देश चालतो. इतरांनी काळजी करण्याचे कारण नाही. अशी परिस्थिती असते. (किमान) त्यामुळे हा देश चाललेला आहे हे अनेकांच्या गावीही नाही. भारतातील आधुनिक विज्ञानाच्या सर्व केंद्र स्थानांमध्ये भारतातील बुद्धिमान तरुण-तरुणी काम करत आहेत आणि ते भारताला यशाच्या नव्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी देखील सक्षम आहेत आणि प्रयत्नशील आहेत. परंतु समाज हा मात्र अजूनही या गोष्टी बाबींना सामोरे जाण्यासाठी तयार झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये या सर्व गोष्टींची चर्चा झाली पाहिजे.
सुप्रियाताई सुळे याच का?
आता महाराष्ट्रातील राजकीय मैदानामध्ये विधानसभेद्वारे मुख्यमंत्री निवडला जाईल. मात्र नवा मुख्यमंत्री हा या नव्या येणाऱ्या दशकांमध्ये परिस्थितीला तोंड देण्यासाठी या विषयांची जाण असलेला व्यक्ती असावा. अशी जाण सध्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शरीरातील प्रमुख पुरुष उमेदवारांमध्ये नाही असे नाही. परंतु आता मात्र महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवी आहे. आधुनिक विचारांची, आधुनिक तंत्रज्ञानाशी, अर्थशास्त्राची,फाड फाड इंग्लिश बोलणारी, चर्चा करणारी अशी एकच महिला मुख्यमंत्री तेवढ्या ताकदीची आहे असे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला नक्की वाटते. अनेकांना आश्चर्य वाटेल पण सुप्रियाताई सुळे या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वात योग्य अशा महिला राजकारणी महाराष्ट्रामध्ये आहेत. यात मला शंका नाही. (लोकसभेचा राजीनामा घेता येईल) सुप्रियाताई सुळे या उच्चशिक्षित ,संसदेमध्ये चर्चा गाजविणाऱ्या , इंग्लिश वर प्रभुत्व असणाऱ्या, अशा खंबीर, तरुण असणाऱ्या महिला नेत्या आहेत असे मी म्हटले तर बऱ्याच जणांना हा ‘वेडसरपणा ‘ आहे असे वाटेल. परंतु माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराने, अभ्यासक असणाऱ्या व्यक्तीचा हा आतला आवाज आहे. तो हे मात्र हे सांगत आहे की महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या राजकीय परिस्थितीतुन आलेली असावी आधुनिक असावी , इंग्रजीवर प्रभुत्व असणारे असावी, तरुणही असावी, चपळही असावी, वाकचातुर्य असणारी असावी, संयमी असावी, सुसंस्कारी असावी ! या सर्व गोष्टी या सुप्रियाताई सुळे यांच्यामध्ये आहेत. असे माझा आतला आवाज सांगतो आणि म्हणून मी या ठिकाणी हे माझे एक मत मांडलेले आहे.
एक आतला आवाज…..
त्यासाठी मला कोणीही सांगितलेले नाही. केवळ एक अभ्यासक, निरपेक्ष, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, महाराष्ट्रातील जनतेचे भवितव्य यांची काळजी असणे यातुन हे लिहित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दर्जाच्या बाबतीतील सध्याचे असलेली परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या मनामध्ये हा विचार आलेला आहे. हे मी स्पष्ट पणे या ठिकाणी सांगतो. मी जेवढे माझ्या अल्पशा बुद्धीला आणि अभ्यासाला समजते ते मी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. दुसरे महत्त्वाचे असेही की जर सुप्रियाताई सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावयाच्या असतील तर महाआघाडीला राज्यात बहुमत मिळवावे लागेल किंवा इतर कोणी महिला मुख्यमंत्री बनवायचे असेल तर महायुतीला सुद्धा बहुमत मिळवावे लागेल. मात्र या दोन्ही आघाड्यांनी पहिली महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री देण्याची आता वेळ आलेली आहे. असे मला नक्कीच वाटते !
डॉ. नितीन पवार हे ‘Satyashodhak Blog’ चे संस्थापक, संपादक आणि वैचारिक लेखक आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाने त्यांना समाज, शिक्षण आणि मानवी मानसिकतेचे बारकावे समजून घेण्याची संधी दिली.
ते सामाजिक प्रश्न, जातव्यवस्था, शिक्षण, राजकारण, तत्त्वज्ञान आणि जागतिक घडामोडी यावर सखोल, तर्कशुद्ध आणि निर्भीड लेखन करतात. त्यांच्या लेखनात वैयक्तिक अनुभव, अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि वास्तवाचे थेट प्रतिबिंब दिसते.
“सत्य शोधणे, त्याचे विश्लेषण करणे आणि निर्भीडपणे मांडणे” हे त्यांच्या लेखनाचे मुख्य ध्येय आहे. ते केवळ माहिती देत नाहीत, तर वाचकाला विचार करायला भाग पाडतात.