माझी स्टोरी – भाग ४ : सत्य, समाज आणि संघर्ष – माझ्या जीवनाचा विचारप्रवास
Majhi Story मालिकेतील हा चौथा भाग आहे. या भागात सत्य, समाज आणि संघर्ष याविषयी माझ्या जीवनातील अनुभव आणि विचार मांडले आहेत.
पहिल्या दोन तीन भागात प्रत्यक्ष व्यक्तिमत्व माझे जीवन थोडं ‘हटके’ जगलं गेले. त्याचे महत्व न कळणे इतका मी Superficial राहिलो नाही. Normal Pattern जर कारणपरम्परेनेच घडला नाही. जसे बालपण, तारुण्य, लग्न, नोकरी, मुलेबाळे, सन्सार, पौढत्व आणि वृद्धत्व असा. किंवा सकाळी सहा वाजता उठणे, दहा वाजता कामाला जाणे. सरकारी किंवा खाजगी आठ दहा तास राबणे. घरी येणे. झोपणे. सकाळी पुन्हा तेच. एक बायको, दोन तीन मुलं. आई, वडिल. अधुन मधुन येणारे आनंदाचे किंवा दुख:चे प्रसंगी पार पाडत पुढे शेवट.हे असे जीवन जगले गेले. तर लिहायचं काय? सगळ्यांची स्टोरी सारखीच असणार!
हे असं काही Normal चालणार नाही माझं आयुष्य. याची भणक तशी मला कुमार वयात थोडी लागलीच. असे म्हणु शकतो मी. दर दोन तीन वर्षांनी ठिकाण, माणसे, शाळा, गुरुजी, मित्र, मैत्रिणी बदलायचे. तसे काही दिवसांनी तरी एक पुरच यायचा. आठवणींचा. नन्तर तो वाढतच होता. भावविश्व इतकं बदलणे, माध्यमे नव्हती त्यावेळी. एखाद्या व्यक्तीबरोबर मी सतत रोज असणार. तो एक दोन वर्षांनन्तर परत कधीच या आयुष्यात दिसणारही नाही. तसेच ठिकाण असेल. शाळा असेल, परिसर असेल. हे परत नाहीच म्हणजे काय?
नवीन जन्म सुरु होण्यासारखे. पुर्वजन्म सम्पण्यासारखे. काय हा खेळ आहे. पुढे सांगतो. तो आजही चालला आहे. म्हणजे एका आयुष्यात ही किती आयुष्ये?. एका गृहावरुन दुसऱ्या ग्रहावर , दुसऱ्या वरुन तिसऱ्या.जणु! असे चालुच. मग Thought Process बदलली. बनली. दिनक्रम बदलला. आयुष्य बदलले. काय काय तेच तर लिहीत पुढे मी चाललोय. आजुबाजूला इतर कुणाचे आयुष्य मला असे दिसत नाही. जगणे दिसत नाही. मरणेही दिसत नाही. झटके, धक्के मन जितकं सन्वेदनशिल तितके जोरदार, कठोर, दुर्मिळ. मग हे लिहिणे हा साहित्यिक निर्मितीचा केवळ आनंद रहात नाही. जबाबदारी बनते. ते अनुभव, ते विजय, ते पराभव, ते अस्रु. ते हास्य. ती कथा. ती स्टोरी लिहीणे एक सामाजिक आणि बर्याच अन्गानी हे शहाणपणाचे आहे मी म्हणेन. आवश्यक आहे. आता ती वेळ आली आहे. योग्य वेळ आली आहे. योग्य तन्त्रज्ञान आले आहे. याची मी नोंद नाही घेतली तर आळशीपणा ठरेल. बेजबाबदार पणा ठरेल. निर्बुद्धपणा ठरेल.
मानवाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात, जेव्हा तो स्वतःकडेच पुन्हा पाहू लागतो. आपण कोण आहोत? आपण काय करतो आहोत? आणि आपण जे करत आहोत त्याला काही अर्थ आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी सुरू होतो. माझ्या आयुष्यातही हा प्रवास लवकर सुरू झाला.ही प्रक्रिया Parellel चालू आहेच.
माझी स्टोरी – भाग ४ हा त्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सत्याचा शोध घेण्याची ओढ, समाजातील वास्तव पाहण्याचा अनुभव आणि त्या अनुभवातून उभा राहणारा संघर्ष — या सर्वांचा विचार येथे मांडण्याचा प्रयत्न आहे.हे आता तरी थोडं हे Random स्वैर लेखन होत आहे. पण हे सतत edit होईल. अचुकता आणि सत्य हे लिखाण घडावे. ही आन्तर्मनामधे दीर्घकाळ आहे. सध्या मी हे शेअर करत नाही. थोडं थोडं करत महत्वाचे लेखन पुर्ण करणे आवश्यक आहे. त्याला साहित्यिक मुल्य देखील निर्माण व्हावे. असा प्रयत्न मी करणे. ही नैसर्गिक बाब ठरावी.
Contents
Majhi Story सत्याचा शोध – एक अंतर्मनातील प्रवास
तरुणपणात म्हणजे साधारण 25 वर्षापुर्वी मला एक प्रश्न सतत सतावत असे — सत्य म्हणजे काय? त्यात Final Truth काय असेल? माणसं आणि मी जगण्याची किती कसरत करत आहोत?तेही माहित असताना की मृत्यू सगळं सम्पवणार आहे.
जगात अनेक विचारधारा आहेत, Ism,अनेक मतप्रवाह आहेत.वैयक्तिक आहेत. सामुहिक आहेत. प्रत्येकजण आपले विचारच अंतिम सत्य असल्याचे सांगतो.पण असे सहज कोणी म्हणतो. पण हे पुर्ण सत्ता नाही.परंतु थोडे खोल विचार केल्यावर लक्षात येते की मानव स्वतःच खूप मर्यादित आहे.हे पुन्हा समजते. जर प्रक्रिया चालू राहिली तर. अन्यथा जो एक complex तयार होतो. तो साधारण माणसापेक्षा जास्त मुर्ख बनतो. आणि ज्याला मागे reverse होता येत नाही ना पुढे प्रवास करणे होत नाही.शिवाय ही स्थिती ते final मानतात. इतरांना सांगण्याचा प्रामाणिक 😅 प्रयत्न करतात. अशा लोकांमुळे इतर मोठ्या सन्ख्येने भरकटतात. खरं सांगणे हे बरं की बरे सांगणे की काही सांगणे आवश्यक नसते. सांगणारे वर्चस्ववादी,हुकूमशाही प्रवृत्ती, अहन्कारी पुढे राजकीय, आर्थिक उद्देश बाळगणारे बनतात.
आज आपण विज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलतो, विश्वाबद्दल बोलतो. पण या अफाट विश्वात मानवाचे अस्तित्व किती छोटे आहे हे लक्षात आले की मन नम्र होते. कदाचित म्हणूनच मला वाटू लागले की absolute truth म्हणजे अंतिम सत्य कदाचित कुणालाही पूर्णपणे कळत नाही.आजपर्यंत कुणा मर्त्य माणसाला समजलेले नाही. मला तर नाहीच नाही. उलट ते शोधताना घायाळ झालो. एकुण माणूस मच्छर आहे. ब्रम्हान्डाच्या तुलनेत. दुसरीकडे गल्ली का शेर पण आहे. पृथ्वीवरील इतर प्राणी व आपले सुर्यकुल Planetary System यांच्या तुलनेत. आपली Galaxy जी आहे, तिचा एक कोपरा, कोपर्याचाही कोपरा यांच्या तुलनेत.
पण म्हणून शोधक वृत्ती थांबवावी का? तर त्यामुळे जे आधीच्या काळातील मानवी जिवनाला फायदेशीर ठरत आल्याचे दिसते. काही वेळा माणसाच्या अस्तित्वाला धक्का पोचण्यापासुन वाचवत आला असे दिसते. एक उदाहरण फक्त एखाद्या महामारी किंवा रोगाबाबत म्हणता येईल. एखाद्या Bacteria ने सर्व पृथ्वी व्यापली असती.पण तसे घडले नाही.
कारण सत्याचा शोध हा मानवी प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.ते वेगवेगळ्या स्वरुपात व्यक्त होत राहिला. माणसाला उपयोगी पडत राहिला. हे ही दिसते की आपण पूर्ण सत्यापर्यंत पोहोचणार नाही, पण त्या दिशेने चालत राहणे हे क्रमप्राप्त आहे. हीच मानवी जिज्ञासा आहे. ही बाब Majhi Story भाग-4 चा महत्वाचा एक ढळक भाग आहे.
Majhi Story: विचारांची प्रेरणा
या विचारप्रवासात अनेक व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव माझ्यावर पडला. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कार्ल मार्क्स, नेल्सन मन्डेला असतील,काही अगदी उजवे किंवा डावे देखील यात समाविष्ट होऊ शकतात.वैज्ञानिक असतील, ओशो असतील, अगदी आचार्य प्रशांत असोत की ध्रुव राठी असो 😅 यांसारख्या अनेक influencer म्हणतो मी, कमी अधिक प्रभावित होत असतो.विचारवंतांनी समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य वेळोवेळी दिले.एक महत्वाचे यातील कुणी अन्तिम सत्य असल्याचा दावा केला नाही.
तसेच भारतीय आणि पाश्चिमात्य विचारवंतांच्या लेखनातून मला समजले की समाजातील बदल हे सहज घडत नाहीत. त्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागतो.मी नव्हे! मानवाने अस्तित्वासाठी!
१९९० च्या दशकात मान्य.कांशीरामजी एक त्यावेळच्या राजकीय नेत्यांपैकी भारतीय राजकीय पटलावर!विशेषतः त्यांनी ‘मास्टर चावी’ बाबत सत्य सांगणारा फार महत्वाचा मुद्दा प्रकाशात आणला. त्यागही प्रभाव पाडणारा ठरला.सामाजिक बाबतीत सहसा कुणी या काळात भावले नाही. त्यांच्या कामातील एक गोष्ट विशेष जाणवली. प्रतिक बनने खरे तर कारण वैयक्तिक सम्पत्ती व कुटुंब न करणे हे जाहीर पणे सांगणे. ते दिसणे त्यांच्या कृतीमधे दिसणे. ही बाब महत्वाची ठरली — वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी काम करणे. ही बाब लाखो लोकांना विश्वासार्ह वाटत होती.Majhi Story भाग 4 ती ची प्रेरणा आहे.तसे जग भरले आहे ज्यांच्या कडून प्रेरणा मिळावी. पण वेळ महत्वाची, timing ला प्रभावित करणारे महत्वाचे असतात. हे लपवणे योग्य नाही. पुष्कळ व्यक्ती तत्कालीन प्रेरणा सांगण्याचे टाळतात. पण तो खोटारडेपणा योग्य नाही. तिथे मोदीही कुणासाठी असु शकतात. ठाकरे, पवार, आठवले, आण्णा, राजीव दिक्षित, सिताराम येचुरी, केजरीवाल अगदी खोमेईनी असु शकतात. नंतर पुढे बदलले पण गेलेले असु शकतात. पण मुख्य बाब मी Timing अधोरेखित करतो. कारण ती वेळ एखाद्या महत्वपूर्ण निर्णयामागची प्रेरणा किंवा कारण ठरलेली असते.
Majhi Story तील पत्रकारिता आणि समाज
पुढे माझ्या आयुष्यात पत्रकारितेची वाट निवडण्यामागेही एक विचार होता.असे काही नाही.पण स्वतःचा platform नसेल तर पितपत्रकारितेकडे जायला किती वेळ लागतो.नवीन तन्त्रज्ञान हे साधन म्हणून उपलब्ध होणे ही बाब मर्यादित राहिली तरी स्वतःत्र साधन म्हणून वापरता येणे ही बाब महत्वाचे.अन्यथा कान्शीराम यांनी सांगितलेले ते Tools किंवा ‘चमचे’ राज अडथळा ठरतात. यांना Bypass करु शकणारे साधन समाजातील सत्य लोकांसमोर आणण्यासाठी तन्त्रज्ञान प्राप्त होणे हे मला वैयक्तिक बाबतीत पत्रकारितेच्या कामाबाबत स्पष्ट करणे आवश्यक वाटते.
समाजात पत्रकारांविषयी अनेक गैरसमजही आहेत.समजही आहेत जे खरे आहेत त्याबाबत.काही लोकांना वाटते की पत्रकार म्हणजे फक्त राजकारण्यांना चिकटलेला चिकटगुन्डा असतो.ब्लॅक मेलर असतो. खर्याचे खोटे व खोट्यचे खरे करणारा असतो वकील किंवा पोलिसासारखा!😅 काही प्रमाणात हे निश्चित खरे आहे. किंवा काही पत्रकार दोन नंबरच्या, बेकायदेशीर व्यवसायातील व्यवहारातून पैसा कमावतात.असे वाटण्यामधेही तत्थ असु शकते.
काही बाबु अशा की – स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करताना अनेक अडचणी येतात. आर्थिक मर्यादा असतात. समाजातील शक्तिशाली घटकांकडून दबावही येतो.आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रभावशाली गट दबाव पाडतात. जातीचे कार्ड, धर्माचे कार्ड, नेत्याचे कार्ड, उद्योगपतीचे कार्ड, वर्गीय कार्ड आडवे येतात किंवा पाठबळ पुरवतात. असे दिसते.
Majhi Story मधे कधी कधी असेही घडते की एखाद्या विषयावर सत्य मांडण्याचा प्रयत्न केला की काही लोक नाराज होतात.तर काही वेळा मदत मिळते, पण ती दयाभावाने मिळते — न्यायभावाने नाही.
संघर्षाचे अनुभव
समाजात काम करताना अनेक अनुभव आले. काही वेळा लोकांनी साथ दिली असे बहुदा घडलेच नाही. तर काही वेळा एकटा पाडून ऐनवेळी साथ सोडली गेली. हे असे प्रसंगी ढिगाणी सांगता येतील. ते पुढे प्रत्यक्ष अनुभव थेट सांगीन. पण पुढे. ते क्षण नेमके पकडणे, नेमक्या शब्दात, नेमक्या छटान्सह पुढे येईल. तिथेच विविध भावना, स्वार्थ, धोकेबाजी, पाठीमागून वार, अपप्रचार, परिक्षा, कसोटी यांची कश्मकश्म टिपता येईल.
काही लोकांशी जवळीक असताना अचानक परिस्थिती बदलते.
फोन उचलला जात नाही.
एखाद्या महत्वाच्या क्षणी लोक बाजूला होतात.इ. इ.
मराठीत एक म्हण आहे — “खिंडीत पकडणे.”
हा अनुभवही आयुष्यात आला. Majhi Story चा हा भाग एक अनुभव क्लेशदायक आहे.त्याची कथा सांगीन. कुणी, का वैगरे सर्व विविध रन्ग आणि छटासह येईल.
अशा प्रसंगी मन दुखावले.वेदना झाल्या. धडा मिळाला,दाग लागला, जखम झाली, सुड झाला, भोग झाला, बदनामी झाली, त्यातून एक एक गोष्ट शिकायला मिळत गेली — Public Life मधे काम करताना One Man Show- One Man Army हा एक पर्याय देखील उपलब्ध आहे.
सत्यशोधक विचार आणि आजचा काळ
आजच्या काळात सत्य बोलणे कधी कधी कठीण वाटते. समाजात विविध प्रकारचे पूर्वग्रह आहेत. जात, धर्म, राजकारण या आधारावर लोकांचे मत आधीच तयार असते–
परंतु विचार करायला लावणारा हवा —
जर आपण सत्याचा शोधच घेतला नाही तर समाज पुढे जाणार?पण destination- खड्डा किंवा दरी.
कदाचित म्हणूनच मला “सत्यशोधक” हा शब्द जवळचा वाटतो. सत्यशोधक म्हणजे ज्याला प्रश्न निर्माण होतात , जो त्यांची उत्तरे शोधतो आणि आणखीन नवीन उत्तरांच्या शोधात राहतो.
डिजिटल जग आणि नवीन संधी
आज इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांमुळे विचार मांडण्याचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत. ब्लॉग, सोशल मीडिया, स्वतंत्र वेबसाइट — या सर्व माध्यमांतून आपले विचार जगासमोर मांडता येतात.
माझ्यासाठी satyashodhak.blog ही केवळ एक वेबसाइट नाही.
ती माझ्या विचारांचा, अनुभवांचा आणि प्रश्नांचा एक प्रवास आहे.
कधी कधी असे वाटते की या कामामुळे मनातील वेदनाही कमी होतात. लेखन म्हणजे केवळ माहिती देणे नाही; ते स्वतःशी संवाद साधण्याचेही एक माध्यम आहे.ते लेखक थेरपीसारखे वापरतात. समाजासाठी.
मानवाचे अस्तित्व आणि विचार
विश्वाच्या विशालतेसमोर मानव खूप छोटा आहे. पण त्याच वेळी मानवाकडे एक अद्भुत क्षमता आहे — विचार करण्याची.
ती क्षमता आपल्याला प्रश्न विचारायला शिकवते.
ती क्षमता आपल्याला समाज बदलण्याची प्रेरणा देते.
म्हणूनच मानवाचे खरे मूल्य त्याच्या स्वतःला व समाजाला शक्तीत नाही तर मुलभुत विचारांत बदल घडवण्याची क्षमता हे आहे.
निष्कर्ष
माझी स्टोरी –भाग ४ हा केवळ वैयक्तिक अनुभवांचा लेख नाही. तो एक विचारप्रवास आहे. सत्याचा शोध, समाजातील वास्तव आणि त्या वास्तवाशी सामना करताना उभा राहणारा संघर्ष — या सर्वांचा हा प्रवास आहे.
मानवाला कदाचित पूर्ण सत्य कधीच कळणार नाही. पण सत्याच्या शोधात चालत राहणे हीच मानवी सभ्यतेची खरी ओळख आहे.
आणि कदाचित म्हणूनच हा प्रवास अजूनही सुरू आहे.पुढे भयानक वास्तव चित्रीत करणारे लेखन येईल. धोडी वाट पहा. क्रमाने वाचा…
माझी स्टोरी -भाग 3 वाचा इथे:
माझी स्टोरी – सत्यशोधकाचा विचारप्रवास (भाग-3) | My Story Self Reflection
