Contents1 Shirur Electricity Office शिरूर शहरातील वीज व्यवस्थापनावर नागरिकांचा संताप – अमरधाममध्ये अंधाराचा प्रकार उघड2 अमरधाममधील अंधार – Shirur Electricity Office वर मोठा सवाल3 प्रशासनाला इशारा – तात्काळ कारवाईची मागणी4 पुराव्यासह बातमी – व्हिडिओद्वारे वास्तव समोर5 लोकप्रतिनिधींना आवाहन5.1 नागरिकांच्या अधिक माहीती व सोईसाठी उपयुक्त लिंकस्5.2 आणखीन सत्यशोधक बातम्या वाचा>>>5.3 About The Author5.3.1 Dr.Nitin Pawar5.4 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Electricity Office शिरूर शहरातील वीज व्यवस्थापनावर नागरिकांचा संताप – अमरधाममध्ये अंधाराचा प्रकार उघड शिरुर, दिनांक 3 एप्रिल 2026|प्रतिनिधी https://www.satyashodhak.blog/wp-content/uploads/2026/04/video_20260403_233119_edit.mp4 Shirur Electricity Office बाबत आता लोक म्हणू लागले आहेत की शिरुर शहरातील विद्युत वितरण विभाग हा ‘विदूषकांचा संच’ बनलेला आहे. त्याला लाईटची बिले वाढलेली कमी करणे, याच्या पलीकडे दुसरा उद्योग उरलेला नाही. अशी परिस्थिती स्पष्ट दिसत आहे. अनेक वेळा अनेक नागरिकांनी विचित्र पद्धतीने अचानक अव्वाच्या सव्वा लाईट बिल आलेले हातात पडल्यानंतर जवळपास चक्कर येऊन पडण्याची स्थिती नागरिकांनी अनेक वेळा अनुभवलेली आहे. कारण समजा दर महिन्याला एखाद्याची बिल पाचशे रुपये येते. अचानक एका महिन्यात ते थेट पाच हजार रुपये येते. हे बिल भरणारा माणूस महिना दहा हजार रुपयांच्या आसपास इतके उत्पन्न असलेला असतो. हे बिल पाहून त्याला धस्स होऊन जातं. जर हे भरायची पाळी आली तर कसे भरायचे? लाईट बंद केली तर काय करायचे? असा प्रश्न त्याच्या समोर पडतो. तो याला फोन कर. त्याला फोन कर. ऑफिसला जा. परत घरी तसेच ते बील घेऊन जा. या धावपळीत गान्गरून गेलेला असतो. आता नवीन टेकनिक आले आहे. बिल Auto Generate होते. कम्पनी बदललेली आहे. आमच्या हातात काही नाही. जेवढे बिल आले आहे तेवढेच भरावे लागेल. वाटल्यास उद्या साहेब असतील. त्यांना भेटा. वगैरे उत्तरे जी आधीच ठरलेली असतात की काय अशी शंका नागरिक व्यक्त करतात. तो नागरिक तसाच परत घरी गावी मागे जातो. पुन्हा याला फोन कर. त्याला फोन कर आणि हे कमी कसे करायचे? कोणाला भेटायचे? कुणाला काही वर पैसे द्यावे लागतात का? असे प्रकारचे प्रश्न विचारत राहतो. सत्यशोधक कडे अशा नागरिकांचे काही फोन आले आहेत. ही माहिती वाचून कुणाला आश्चर्य वाटू नये. ना विद्युत कर्मचाऱ्यांना. ना नागरिकांना. अशी अनेक अजब आणि गजब प्रकार विद्युत वितरण विभागातील कर्मचारी अधून मधून करतच असतात. अनेक वेळा मनसे वगैरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड वगैरे केल्याच्या घटना घडतात. अशी बातमी येते. मग प्रतिवाद शासकीय कामात अडथळा आणणे वगैरे असा केला जातो. हे लोक नेमके शासकीय कामकाज काय करत असतात? अमरधाममधील अंधार – Shirur Electricity Office वर मोठा सवाल आता असा प्रश्न शिरूर शहराचा मुख्य मसणघाट म्हणजे, आपण अमरधाम असेही म्हणतो. तेथे दिनांक 3 एप्रिल 2026 ला अनेक लोकांना पडला. आता अमरधाम मध्ये देखील जर विद्युत कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार आणि भंपक कार्यपद्धतीमुळे तेथे विजेचे दिवे जर ऐनवेळी नसतील तर त्याचा अर्थ काय घ्यावा? कुणाचा मृत्यू कोणत्या वेळेस येईल? हे काही कुणाला माहिती नसते. आणि शिरूर विज वितरण कर्मचाऱ्यांना देखील हे माहिती होण्याचा कोणता मार्ग नाही. हे खरे. त्यांनाही एक वेळेस तिथे जाणे आहेच. ‘आम्ही जातो आमच्या गावा! आमचा राम राम घ्यावा’ असं गाणं मागे वाजत एक दिवस हा प्रवास विद्युत कर्मचारी शिरुर यांना देखील चुकलेला नाही. दिनांक 3 एप्रिल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या अमरधाम नावाच्या स्मशानभूमीमध्ये चार लाईटचे खांब आहेत. त्यापैकी एकालाही लाईट चालू नाही. अशा गैरसोयीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. आणि बऱ्याच महिन्यांपासून येथे लाईट नाही. अशी माहिती मिळत आहे. प्रशासनाला इशारा – तात्काळ कारवाईची मागणी म्हणून आता वीज वितरण कार्यालय नेमकी कशाची वाट पाहत आहे? असा प्रश्न निर्माण होतो. ज्याचे नावच अमर धाम आहे. जिथून माणूस अनंताच्या प्रवासाला निघतो. तिथला प्रवास अंधारातून सुरू झाल्यावर तो अनंताकडे जाईल, प्रकाशाकडे जाईल, मोक्षाकडे जाईल, परमात्म्याकडे जाईल की कुठे अंतराळातल्या एखाद्या ‘ब्लॅक होल’मध्ये जाऊन पडेल? अशी व्यवस्था किमान Shirur Electricity Office कर्मचारी यांनी करु नये. याचे भान ठेवावे. आणि तत्काळ अशा प्रकारच्या ठिकाणी लाईट व्यवस्था करावी. पुराव्यासह बातमी – व्हिडिओद्वारे वास्तव समोर आम्ही केवळ बातमी देत नाही. बातमीमध्ये पुरावा देखील देतो. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे परिसराचे चित्रण करण्यात आले आहे. ते पहावे. लोकप्रतिनिधींना आवाहन शहराचे नगराध्यक्ष, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, विद्युत विभागाचे अधिकारी यांनी याविषयात लक्ष घालावे. अन्यथा नागरिकांच्या संतापास सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया येथे जमलेल्या लोकांमधून येत होती. नागरिकांच्या अधिक माहीती व सोईसाठी उपयुक्त लिंकस् महाराष्ट्र वीज वितरण संबंधित माहिती: ग्राहक तक्रार नोंदणी: https://consumerhelpline.gov.in वीज ग्राहक हक्क मार्गदर्शक: https://powermin.gov.in आणखीन सत्यशोधक बातम्या वाचा>>> Shirur Encroachment Protest: 3 दिवसांच्या उपोषणानंतर प्रशासन झुकले? Shirur illegal construction protest : अतिक्रमण बातमी, शिरुर Shirur Crime News : शिरूरमधील गुन्हेगारीच्या ताज्या बातम्या | Satyashodhak News About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Gas Cylinder तुटवड्यामागचे खरे कारण काय? Peth Anganwadi मध्ये Senior Citizens कडून Good Manners Training ; मुलांना संस्कारांचे Live Learning