“Meaningful Ambedkar Jayanti is about knowledge, equality, and social change.”
Contents
How to Celebrate Ambedkar Jayanti ? : आदर्श आंबेडकर जयंती कशी साजरी करावी ? एक दृष्टिकोन
Ambedkar Jayanti 2026 : लेख 10
प्रस्तावना
How to Celebrate Ambedkar Jayanti? अर्थात मला लहानपणापासून प्रश्न पडत असे की एक आदर्श आंबेडकर जयंती नेमकी कशी साजरी करावी? म्हणून मी काही नोटस काढल्या. Ambedkar Jayanti 2026 मी, ” माझ्या पद्धतीने म्हणजे- ” दिनांक 14 – 14 क्रांतिकारी लेख ” लिहून ते माझ्या न्यूज साईट,’ सत्यशोधक ब्लॉग ‘ मधुन प्रकाशित करावे, असे ठरवून topic निवडले. काम सुरु केले. 9 लेख मराठी, हिंदी व English अशा तीन भाषेत विभागून प्रकाशित केले.
कारण मी सांगितले. या तिन्ही भाषेत 60 पेक्षा जास्त देशात माझे वाचक आहेत. जे या क्षेत्रात काम करतात त्यांना याचे तसे आश्चर्य वाटत नाही. इतरांचा विश्वास बसत नाही.
कारण माहीती नाही. काय असते डिजिटल तन्त्रज्ञान, काय असतो keyword, काय असतो algorithms वगैरे. पण हे कोणीही करु शकतो इतके मी सांगु शकतो. बेरोजगार युवकांना सांगणे आहे की कामाचा एक भाग म्हणून digital content creater म्हणून काम करा. पैसा कमवा. डॉलरमधे पैसे मिळतात. रुपयामधे ते बरेच होतात. थोडी बेरोजगारी नक्की कमी होईल. तुमचे content तुमची copyright मालकी असते. हा content आपण या जगात नसु तेव्हा सुद्धा पाहिला जाईल. किमान आपल्या वन्शजाकडुन किंवा चुकून जरी शब्द search झाला तरी तुम्ही 500 वर्षांनन्तर पाहिले, वाचले, ऐकले जावू शकता. प्रसिद्धीचे महत्व जाणा.
आदर, मान, सन्मान मिळतो. जर ‘न्यूज’ तुमच्या साईटच्या कामाला जोडलेत, एक छन्द म्हणून जरी पोलीस, आमदार, सरपंच, नगरसेवक, तहसीलदार असे अधिकारी व्यक्ती सुद्धा तुम्हाला सलाम ठोकतात. इमानदारीमधे पैसा कमी मिळेल. पण मुख्य कामाला हे जोडले, थोडा वेळ दिला, तर बरे होईल. तुमची सन्ख्या पाहून येणाऱ्या काळात तुम्ही जगाल तरी कसे? अशी चिंता वाटते. म्हणून जे जे मला माहित होत जाते. ते इतरांना मी सांगत जातो.
फक्त माझ्या जवळ ठेवत नाही. जे बोलण्यासाठी, सांगण्यासाठी प्राध्यापकाना 2/3 लाख पगार मिळतो. ते व त्यापेक्षा अधिक सखोल मी सहज बोलता बोलता सांगतो. मला कोनती नोकरी नको. आमदार, खासदार व्हायचे नाही.चोरांमधे सामिल व्हायचे नाही. आतुनच एक आवाज येतो. ज्याची प्रेरणा बाबासाहेब हेच आहेत. दुसरे कोण असणार? माझे वडील किंवा आई यांनी काही पान्डित्य मिळवलेले नव्हते. पण मुलांना शिकवायचेच काही करुन. हा बाबासाहेब यांचा सन्देश त्या काळी समजून घेतला होता. पुढे सर्वांचे जीवन बर्यापैकी गेले.आमच्या निकटच्या नातलगान्चे!
या लेखमालेनिमित्ताने रात्री लिहीत असताना हे आठवले . म्हणून सांगितले. तसे आपण ‘रगील’ फार आहोतच. कुणी सांगितले तर नाहीच ऐकणार ! आपल्या समदुःखी वर्गातील माणसाने सांगितले तर मुद्दाम नाही ऐकणार ! ‘मला हा काय सांगतो? मला काही माहित नाही का?’ “माझ्या रक्तातच बाबासाहेब आहेत” अशा काही ‘गोड गैरसमजुती’ बाळगून स्वतः मुर्ख बनत असतो. ‘अडेलतट्टूपणा’ करतो. तसे गावाचे ऐकेल.पण आपले ऐकणार नाही.’कसायाला गाय धार्जिणी’ तसा शत्रूला धार्जिणा असतो. हे मी कायम पहात आलो आहे.कारण पण मला समजते. ते एवढ्या मोठ्या व दिर्घकाळ अपमानित राहिल्याने आलेल्या न्युनगन्डामुळे होते. मी समजु शकतो.
म्हणून माझ्या खास या अनुयायाना मी अनुभवाने समजतो. तो एकटा एका बाजुला आणि ‘सर्व’ विरुद्ध बाजूने.तरी लढत राहतो. वन्चित राहतो.तो काय त्रास असतो. ते मी समजु शकतो. म्हणून सांगतो.
म्हणून एक पहा आपण इतरांच्या पेक्षा नेहमी कमी लोकप्रिय असतो. त्यांने सर्व क्षेत्रात पिछेहाट झाली.’रक्तात’ कधी महापुरुष असत नसतात. महापुरुषांना मोठी तपश्चर्या वेगवेगळ्या स्वरुपात करावी लागते.तेव्हा ते महापुरुष बनतात. त्यांची नक्कल करु नका.
कुणाची Copy करु नका. प्रत्येक व्यक्ती unique असाच निसर्ग निर्माण करतो.आठवले व लिहिण्याची अडचण काही नसल्याने लिहून टाकले आहे.आगाऊ पणा करु नका. अडेलतट्टुसारखे वागु नका.लोक तिरस्कार करतात.स्वताची बाबासाहेब यांच्याशी तुलना करू नका.त्यांची आपण त्यामुळे बदनामी करतो नकळत.सारखं सारखं त्यांचे नाव घेऊ नका.
अगदी मेष्रामसाहेबान्चे,कान्शीराम,मायावती, आझाद,प्रकाशजी आम्बेडकर, म.फुले, शाहू महाराज वगैरे.त्यांच्या नावावर जगु नका.फक्त भाषणे ऐकून,यु ट्यूब वर दोन तीन व्हिडीओ पाहून सगळं समजत नसते.हजार,दोन हजार पानांचे ग्रन्थ वाचावे लागतात.ठोकळे वातावे लागतात.कुणाचे लिखाण,’अस्पृश्य’मानू नका. ब्राम्हणांचेही.हा बहाणा असतो वाचन टाळण्यासाठी!तेही मोठ्या स्रमाचे काम असते.
‘आपोआप रक्तात’ तर सोडूनच द्या.नाहक महापुरुषांची बदनामी करु नका. जयंती, मिरवणूक, नृत्य, डिजे, पोरी, गाणी म्हणजे चळवळ नसते.आन्दोलन नसते.पावती पुस्तकावरचे बरेचदा’कार्यकर्ते (?)असतात. वर्गणीत त्यांना रस असतो.ते पावती पुस्तक नाही मिळाले तर लगेच गट बदलतात.त्यांची भाषा बदलते.दुसरा गट join करतात.पहिल्याला ‘तो’ ‘आर एस एस’😅 चेच काम करतो.असे ठोकून देतात.
आर्थिक प्रेरणा अशी काम करते.ते पहा.कार्ल मार्क्स वाचा. हरारी वाचा.देशातील तमाम पक्ष, सन्घटनानी असे लाखोच्या सन्ख्येने बेरोजगार पोरं वापरुन घेण्याचा सपाटा चालवला आहे.नाही जयंती साजरी केली तरी चालेल एक वेळ!पण तिचा बहाणा करु नका.महापुरुष स्वयंसिद्ध आहेत.तुम्ही ते सिद्ध करण्यासाठी धडपड करु नका.उलटा परिणाम होतो.लोक पैसा पाहतात.ते तितके सुमार दर्जाचे या व्यवस्थेनेच बनवले आहेत. ते कुणाला,’सर्टिफिकेट’देण्यास अद्याप लायक बनलेले नाहीत. त्यांना योग्य criteria वापरता येत नाही. त्यांना शिक्षणापासून असेच दिर्घकाळ दूर ठेवलेले आहे.त्याचा परिणाम तो आहे. कारण नाही. त्याचा तुम्हाला त्रास होतो.तुमची पिछेहाट होते. झाली.असो पुढे आणखीन लिहीन. आपणही लिहा.
दरवर्षी 14 एप्रिलला आपण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. रस्त्यांवर निळे झेंडे, मिरवणुका, घोषणाबाजी आणि विविध कार्यक्रमांची रंगत दिसते.पण या सगळ्या उत्साहात एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागतो — How to Celebrate Ambedkar Jayanti? म्हणजेच आंबेडकर जयंती खऱ्या अर्थाने कशी साजरी करावी?ती करणार्यांना मी लहाणपणापासून इतर लोक,’हे सुधारणार नाहीत’अशी टिप्पणी करताना ऐकत असे.मग कशी करावी? याचे उत्तर कोणी सुचवत नसत. नन्तर समजले,’हे सडलेली पुर्वग्रहसुचक टिप्पणी आहे.हेच अजून सुधरलेले नाहीत. मुगल, इन्ग्रज यांचे, ब्राह्मण यांचे गुलाम आहेत.असो.पुढे लिहीन.
आज अनेक ठिकाणी जयंती ही केवळ उत्सवापुरती मर्यादित राहिली आहे. DJ, मोठ्या मिरवणुका आणि बाह्य दिखावा यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अर्थ हरवतो. त्यामुळे हा दिवस केवळ आनंदाचा नसून जागरूकतेचा, शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा दिवस म्हणून साजरा करणे अधिक महत्त्वाचे आहे.
आंबेडकर जयंतीचे आजच्या काळातील महत्त्व
आंबेडकर जयंती ही केवळ ऐतिहासिक आठवण नसते. तर आजच्या काळातही ती अत्यंत महत्त्वाची का असते ? आपल्या आजवरच्या प्रवासाची आठवण, चिकित्सा करण्यासाठी. आपण कसे सामाजिक बाबतीत उत्क्रान्त झालो.याची आठवण ह्वावी म्हणून असते.पुढे काय करायचे? हे ठरवणे असते.बाबासाहेबांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला. भारताला एक मजबूत संविधान दिले. त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांना शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाला.
आजही समाजात विविध प्रकारच्या असमानता दिसतात. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार अधिक प्रभावी आणि आवश्यक ठरतात. आंबेडकर जयंती साजरी करताना आपण त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा देणे गरजेचे असते .
शिक्षणाद्वारे जयंती साजरी करा
बाबासाहेबांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे शिक्षण. त्यांनी स्पष्ट सांगितले होते — “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.” त्यामुळे आंबेडकर जयंती साजरी करताना शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे.असे मला दिसते. शिक्षण नोकरी साठी असते हे डोक्यातून काढून टाका. ते सुसन्स्कृत बनण्यासाठी असते. माहिती, ज्ञान, समज वाढवण्यासाठी असते.ते डिझाईन करणारे कोण आहेत? हे पहा. विचारवंत आहेत आपल्याकडे. ते ओळखतात. त्यांचे ऐका, वाचा.
या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि समाजात संविधान वाचन, निबंध स्पर्धा, व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करणे किंवा वाचनालय सुरू करणे हा देखील एक चांगला उपक्रम ठरू शकतो. ज्ञानाचा प्रसार हा बाबासाहेबांना दिलेला खरा सन्मान आहे.
समाजसेवा – खरी श्रद्धांजली
जर आपल्याला खरोखरच How to Celebrate Ambedkar Jayanti याचे उत्तर शोधायचे असेल, तर समाजसेवा हा सर्वात योग्य मार्ग आहे. बाबासाहेबांनी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपणही समाजासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे.त्याग दिसु द्या.करा.त्याग ही पुर्व अट असते.काही घडवण्यासाठी.
रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी शिबिरे,अन्नदान, कपडे वाटप किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा उपक्रमांद्वारे आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. या कृतींमधूनच बाबासाहेबांच्या “सामाजिक न्याय” या विचाराची अंमलबजावणी होते.
संविधानाची जाणीव वाढवा
भारतीय संविधान हे बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान आहे. परंतु आजही अनेक नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
संविधान वाचन कार्यक्रम, युवकांसाठी कार्यशाळा, आणि मूलभूत हक्कांवर आधारित चर्चासत्रे आयोजित करून नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देता येते. जागरूक नागरिकच लोकशाहीला मजबूत बनवतात.
पर्यावरणपूरक जयंती साजरी करा
आजच्या काळात जयंतीच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण आणि पर्यावरणाचे नुकसान वाढले आहे. हे बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत नाही. त्यामुळे आंबेडकर जयंती साजरी करताना पर्यावरणाचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
DJ आणि मोठ्या आवाजाचा वापर टाळणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, झाडे लावणे आणि स्वच्छता मोहीम राबवणे हे काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत.जबाबदारीने साजरी केलेली जयंती हीच खरी आदर्श जयंती आहे.
सामाजिक ऐक्य आणि समानता
आंबेडकर जयंती ही केवळ एका समाजाची नसून संपूर्ण देशाची आहे.त्यामुळे या दिवशी सर्व समाजांना एकत्र आणणे आणि समानतेचा संदेश देणे आवश्यक आहे.
भेदभावमुक्त समाज निर्माण करण्यासाठी विविध समाजातील लोकांना एकत्र आणून कार्यक्रम आयोजित करणे,एकात्मतेचे संदेश देणे आणि समानतेवर आधारित चर्चा घेणे महत्त्वाचे आहे.हीच बाबासाहेबांच्या विचारांची खरी अंमलबजावणी आहे.
डिजिटल माध्यमांचा वापर
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा सर्वात प्रभावी संवादाचा मार्ग आहे.त्यामुळे आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने योग्य माहिती आणि विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे.
WhatsApp, Facebook, Instagram आणि YouTube यांसारख्या प्लॅटफॉर्मवर माहितीपूर्ण पोस्ट, व्हिडिओ आणि लेख शेअर करून आपण जागरूकता निर्माण करू शकतो. डिजिटल माध्यमातून पसरलेला विचार अधिक वेगाने समाजात बदल घडवू शकतो.
युवकांना प्रेरणा द्या
युवक हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे आंबेडकर जयंतीच्या दिवशी त्यांना योग्य दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.करिअर मार्गदर्शन, मोटिवेशनल सेमिनार आणि कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करून युवकांना प्रेरित करता येते.
जर युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले, तर समाजात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.
महिला सशक्तीकरणावर भर द्या
बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांसाठी मोठा संघर्ष केला. त्यामुळे आंबेडकर जयंती साजरी करताना महिलांच्या सशक्तीकरणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
महिलांसाठी विशेष कार्यक्रम, शिक्षणावर भर, आणि त्यांच्या हक्कांवर चर्चा आयोजित करून समाजात समानतेचा संदेश दिला जाऊ शकतो.महिलांचा सन्मान हा समानतेचा पाया आहे.
विचार आचरणात आणा
आंबेडकर जयंतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाबासाहेबांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात लागू करणे. फक्त एक दिवस साजरा करून उपयोग नाही. तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागणे आवश्यक आहे.
भेदभाव टाळणे, शिक्षणाला प्राधान्य देणे, आणि समाजासाठी काम करणे हीच खरी श्रद्धांजली आहे. प्रत्येकाने स्वतःपासून बदल सुरू केला तर समाजात मोठा फरक पडू शकतो.
आणि एक आठवले. ‘आपले लोक’,’ आपले लोक’असे आपण म्हणतो.अर्थ असतो आपल्या जातीतले लोक!हा नाद सोडून द्या. महापुरुषांनी जाती अन्ताचा सन्देश दिला आहे.जात जाणीव बाळगणे, जात आधारित अस्मिता तयार करण्यास नाही सांगितले. जात हा रोग आहे. तो प्रत्येकाला असतो. म्हणून आधी स्वतः decaste व्हा. म्हणजे जातविरहित व्हा.असे अनेक लोक मी पाहिलेले आहेत. ते शक्य आहे. उत्तमराव काम्बळे नाहीत का?मा.कान्शिराम,’बहुजन की भाषा बोल!असे सांगत असायचे की नाही? रावसाहेब कसबे यांना विचारवंत म्हणून सर्वांनी मान्य करावे लागते की नाही? गवयीना सर्वोच्च न्यायाधीश मानावे लागले की नाही?मुर्मु यांना राष्ट्रपती मान्य केलेच ना. न्युनगन्ड बाळगु नका. गुणवत्ता struggle मधुनच विकसित होते. तसा क्रियाकारणभावच आहे. तुमच्या कडे जास्त प्रतिभा आहे.
निष्कर्ष
मग How to Celebrate Ambedkar Jayanti? याचे उत्तर स्पष्ट आहे — ज्ञान, समाजसेवा, समानता आणि कृती. जर आपण बाबासाहेबांचे विचार समजून घेतले आणि त्यानुसार जीवन जगलो, तरच ही जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल.
👉 “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” — हा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. चला, यावर्षीची आंबेडकर जयंती केवळ साजरी न करता ती अर्थपूर्ण आणि परिवर्तन घडवणारी बनवूया.
अधिक माहितीसाठी लिंकस्—-
भारतीय संविधानाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 👉
https://www.constitutionofindia.net/
नागरिकांचे हक्क समजून घेण्यासाठी
समाजसेवा उपक्रमांसाठी
आणखीन ” दिनांक 14 – 15 क्रांतिकारी लेख ” वाचा >>>>>>
Dr B R Ambedkar Biography 2026 | अभिनव अभिवादन ;14 दिन – 14 क्रांति लेख
Ambedkar Jayanti 2026 | विशेष लेखमाला | 14 दिनांक 14 क्रांतिकारी लेख | लेख ; 2
Ambedkar Jayanti 2026 Our Duties : आपली संविधानिक जबाबदारी काय असते ? -4
