
Contents
इनामगावात वृद्ध महिलेवर हल्ला; रोख २३,४०० रुपयांची चोरी!
दिनांक २३ ऑगस्ट २०२५ |प्रतिनिधी |
शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे वृद्ध महिलेवर हल्ला करून २३,४०० रुपयांची चोरी. शिरूर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
शिरूर तालुक्यातील इनामगाव ,घुमरेवस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेवर हल्ला केला आहे.यात तब्बल ₹२३,४००/- रोख रक्कम लंपास केले आहेत.
ही घटना २१ ऑगस्ट २०२५ च्या रात्री ९ वाजता ते २२ ऑगस्ट सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
फिर्यादी अनिल विठ्ठल घुमरे ,वय-६५ वर्षे, राहणार- इनामगाव, घुमरेवस्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम त्यांच्या आईवर डोक्यात प्रहार करून दुखापत केली. नंतर
• पत्र्याच्या पेटीत ठेवलेली ₹१०,००० रक्कम
• तसेच हॉटेल गावकरीच्या काऊंटरमधून ₹१३,४०० रक्कम
• असा मिळून एकूण ₹२३,४०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
घटनेनंतर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक- ६०७/२०२५ कलम ३०९(६), ३०५, ३३१(४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलिस हवालदार श्री. भगत,पोलिस सबंध इन्पेक्टर श्री. कदम यांच्याकडे आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
🌐
1. Maharashtra Police Official Website
2. Pune District Official Website
सत्यशोधक च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करुन •••
शिरूरमध्ये ३.५६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त – एकाला अटक