
Contents
- 1 Inter District Robbers Arrested :शिरूर पोलिसांचा मोठा ‘गेम’ ! आंतरराज्यीय सराईत घरफोड्यांच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, ६ गुन्ह्यांची उकल !
Inter District Robbers Arrested :शिरूर पोलिसांचा मोठा ‘गेम’ ! आंतरराज्यीय सराईत घरफोड्यांच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, ६ गुन्ह्यांची उकल !
Inter District Robbers Arrested By Shirur Police
📅 प्रसिद्धी दिनांक: ११ जुलै २०२५ | ठिकाण: शिरूर | सत्यशोधक न्युज
Inter District Robbers Arrested : पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी! आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ६ गुन्ह्यांची उकल. आरोपींकडून सोनं, गाडी व इतर साहित्य जप्त. वाचा सविस्तर तपशील…
(Inter District Robbers Arrested : शिरूर पोलिसांचा मोठा ‘गेम’ !)
गुन्ह्यांचा तपशील—-
दि. ०६/०७/२०२५ रोजी शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील आंबळे गावातील कल्पना प्रताप निंबाळकर,वय-६० वर्षे यांच्या घरात त्या व रत्नाबाई शितोळे या झोपल्या होत्या.त्यांचे पती वारीला गेले होते.त्यांचा मुलगा संदिप,त्याची पत्नी व मुलेही झोपलेले होते. त्यावेळी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ चोरट्यांनी दरवाजावर लाथा व धक्के मारुन दरवाजा तोडला.घरात घुसले. घरातील लोकांना दांडक्यांनी मारहाण केली. २ लाख रुपये किमतीचे मंगळसुत्रे,जोडवी,गंठन,कर्णफुले लंपास केली होती .याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घातले.योग्य त्या सुचना दिल्या.गुन्हेगारांनी सिल्वर रंगाची चार चाकी तवेरा गाडी वापरल्याचे सी सी टी व्ही व इतर तांत्रिक विश्लेषणात समोर आले. तब्बल १५० किलोमीटर परिघातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले.त्यात संशयित गाडी पाथर्डीच्या पुढे दिसली होती. गुप्त माहितीच्या आधारे ही गाडी सराईत गुन्हेगार संजय तुकाराम गायकवाड़,भोकरदन,जि.जालना हाच चालवत होता. त्याने त्याच्या साथीदारांसह हा दरोडा टाकलेला होता.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाला तपास करतानाच समजली.
त्यानंतर हाच आरोपी व त्याचे साथीदार नगर पुणे रोडवरुन पुण्याकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.शिरुर पोलिस व गुन्हे शाखेचे पोलीस यांनी सापळा रचला.आरोपींनी क्षणाची उसंत न देता अखेर बेड्या ठोकल्या.त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केलेले इतर गुन्हे यांची माहिती दिली. कबुली देखील दिली.साथीदारांची माहिती दिली.
अटक केलेल्या आरोपींची नावे—-
👉1. संजय तुकाराम गायकवाड़, वय ४५ वर्षे, रा. धनगरवाडी, भोकरन , जालना.
👉 2.सागर सुरेश शिंदे, वय १९ वर्षे, रा.संत तुकाराम नगर, मंठा, ता.मंठा,जि.जालना.
त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कोरिअरची गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी उकललेले गुन्हे—-
(१) शिरूर, पुणे – गु.र.नं. ४७८/२०२५,भारतीय न्याय संहिता ३१०,३११
(२) शेवगाव, अहिल्यानगर – गु.र.नं. ५९६/२०२५,भारतीय न्याय संहिता ३१०(२)
(३) पारनेर,अहिल्यानगर – गु.र.नं. ५३६/२०२५,भारतीय न्याय संहिता ३०९(५), ३३३(४)
(४) अकोला ,जुने शहर,अकोला – गु.र.नं. ४३१/२०२५,भारतीय न्याय संहिता ३३१ (४),३०५ (अ)
(५) अकोला,जुने शहर,अकोला – गु.र.नं. /२०२५,भारतीय न्याय संहिता ३०५
(६) मालेगाव,जि. वाशिम – गु.र.नं. ३०२/२०२५,भारतीय न्याय संहिता 331(४),३०५(अ)
हे गुन्हेगार प्रामुख्याने महिलांना लक्ष्य करत.दांडक्यांनी मारहाण करत व अंगावरील दागिने लुटत असत.
या टोळीविरुद्ध यापूर्वी १४ पेक्षा अधिक गुन्हे महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, बीड, लातूर, परभणी, अहमदनगर वगैरे जिल्ह्यांत नोंदवलेले आहेत.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष योगदान—–
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.संदिप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले ,पोलिस उपनिरीक्षक संदेश केंजळे,स्थानिक गुन्हे शाखेचे कुलदिप संकपाळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके ,संजु जाधव,राजु मोमीन,अतुल डेरे, सागर धुमाळ , शिरुर पोलिस स्टेशनचे श्री.निखील रावडे,नितेश थोरात,अजय पाटील, निरज पिसाळ,रविंद्र आव्हाड तसेच शिरूर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थांळांना—
1.https://www.mahapolice.gov.in/
2. https://puneruralpolice.gov.in/
3.https://www.mumbaipolice.gov.in/
4.https://www.indianpolice.gov.in/
5.https://www.abplive.com/news/crime
6.https://www.lokmat.com/crime/
जर तुम्हाला तुमच्या गावातील गुन्हेगारीविषयी वेळेवर, स्पष्ट आणि शुद्ध मराठीत बातम्या पाहायच्या असतील, तर ‘सत्यशोधक न्यूज’ ला नियमितपणे वाचा आणि फॉलो करा!
✍️ रिपोर्टर: सत्यशोधक न्यूज टीम
📌 जिल्हा: पुणे ग्रामीण
सत्यशोधक न्युज वर वाचा आणखीन बातम्या खालील लिंकवर क्लिक करून ••••
Chori Shirur : मोबाईल टॉवरवरून सोलर केबल व उपकरणे चोरी; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Share your link and rake in rewards—join our affiliate team! https://shorturl.fm/j9pgT