
International Yoga Day 2025: आंतरराष्ट्रीय योग दिन : शिरूरमध्ये ‘ओन्ली वुमन्स जिम’ व भाजपा महिला आघाडीच्यावतीने उत्साहात साजरा
International Yoga Day 2025 Shirur Priya Biradar BJP Celebrated
शिरूर ,दिनांक 21 जून 2025 | प्रतिनिधी |
International Yoga Day: 2025:शिरूर शहरात ओन्ली वुमन्स जिम आणि भाजपा महिला आघाडीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 उत्साहात साजरा. योगाचे महत्त्व, प्रात्यक्षिके, आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम लक्षवेधी ठरला.”
शिरूर शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम ओन्ली वुमन्स जिम व भाजपा शिरूर शहर महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी सहा वाजता साई गार्डन, शिरूर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रिया बिरादार यांनी योगाचे महत्त्व समजावले आणि प्रत्यक्ष योगासनांचे प्रात्यक्षिक दिले. तसेच योगी आचार्य गोपेश ब्रह्मपुरीकर यांनी विविध प्रकारचे योग, प्राणायाम आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम समजावून सांगितला.
कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल दादा पाचर्णे, भाजपा महिला मोर्चा उपजिल्हाध्यक्ष वर्षाताई काळे, अल्पसंख्यांक सरचिटणीस राजू शेख, नगरसेवक विनोद भालेराव, आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशनच्या सविता बोरुडे, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सुजाता पाटील, प्रा. सतीश धुमाळ, भाजपाचे माजी अध्यक्ष केशव लोखंडे, विजय नरके, नवनाथ जाधव, नीलमधू शर्मा, दिलीप हिंगे, योगेश जामदार, हुसेन शहा, आकाश चाकणे, अजित डोंगरे, शिवसेनेचे सुरेश गाडेकर, प्रमोद जोशी, साई गार्डनचे संचालक समीर शेख, तसेच प्रीती बनसोडे, विजयालक्ष्मी उपाध्याय, जयश्री हारदे यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओन्ली वुमन्स जिमच्या संस्थापिका व भाजपा महिला आघाडी अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखणाऱ्या योगसाधनेचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधिक आहे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🌐
https://www.indianyogaassociation.com
https://www.mygov.in/campaigns/international-yoga-day/
https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/physical-activity
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••••
International Yoga Day : विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना ‘योग दिवसाचा’ संदेश!