
Contents
- 1 जरांगे पाटील पुन्हा मोठ्या आंदोलनांच्या तयारित ? विरोधात जाणार्यांना पाडणार?
- 1.1 जरांगे पाटील हे ठरविणार आगामी विधानसभेनंतरचे सरकार ?
जरांगे पाटील पुन्हा मोठ्या आंदोलनांच्या तयारित ? विरोधात जाणार्यांना पाडणार?
जरांगे पाटील हे ठरविणार आगामी विधानसभेनंतरचे सरकार ?
(लेख:डॉ.नितीन पवार, संपादक)

जरांगे पाटील यांनी सगेसोयरे यांच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनांच्या तयारित असल्याचे म्हटले आहे. लोकसभेचे निवडणुकिच्या आधी जरांगे पाटील यांनी राज्यभर मराठा समाजाला संघटित करत पुर्वी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या,नव्याने मिळालेल्या कुणबी नोंदी यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याची मागणी केली. त्याला यश मिळून हजारो नव्याने कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या लोकांच्या सगेसोयर्यांना देखील कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत,अशी मागणी केली होती.कारण कुणबींनी ज्यांच्याशी विवाह केले असे जे लोक असतील ते कुणबीच असणार ! पण त्यांच्या नोंदी जर सापडत नसतील तरी त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र नव्याने द्यावे अशी मागणी केली होती.
कुणबी कोण?….
कुणबी ही नोंद मराठा या नोंदणीच्या आधीची आहे.जमीनदारी पद्धतीत जमीन मोठ्या प्रमाणात जमीनदारांच्या नावावर असे.प्रत्यक्ष जमीनीत शेती पिकवताना कष्ट जो करत असे.त्याला कुणबी म्हणत असत.त्यांची संख्या मोठी असे.जमीनदाराची संख्या मुठभर असे.तो सरंजामशाही (feudal) समाज होता. ‘कसेल त्याची जमीन‘ असा विचार पुढे समाजवादी विचारधारेचेच अपत्य म्हणून पुढे आला.जमीनीबाबत पुनर्रचना झाली.जमीनदारी पद्धत जवळपास नष्ट झाली.दरम्यान छ.शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले.मराठी सरकारांनी उत्तर व दक्षिणेकडे स्वार्या करुन दबदबा निर्माण केला.
मराठा शब्द प्रदेश वाचक…
मराठी लोकांच्या प्रदेशाला इतर राज्यातील लोक मराठा हा प्रदेश वाचक शब्द वापरत असत.तो प्रतिष्ठेचा मानला जाउ लागला.त्यामुळे सर्वच महाराष्ट्रातील मराठीलोकांसाठी असलेला मराठा हा शब्द त्यावेळच्या प्रबळ लोकांनी स्वतासाठी वापरायला सुरुवात केली. पण सर्वांनीच तो शब्द वापरला नाही.तर कुणबी असाच शब्द वापरणारा महाराष्ट्रातील बराच भाग आहे. जास्त करुन पश्चिम महाराष्ट्रात हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला गेला.पण कुणबी शब्द तसा अनेक जातींनीही लावलेला होता.जसे धोबी कुणबी,महार कुणबी असे कुणबी ही आहेत.
जरांगे पाटील यांनी समजुन घेतले. …
जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील आताच्या स्थितीत मोठ्या संख्येने दुरवस्था असण्याची मराठा असा शब्द लावलेल्या पण शेती हाच व्यवसाय करणार्या समुहाची परिस्थिति जाणून एक महत्त्वाचे साधन असलेले आरक्षण धोरण हे मराठा समाजाला लागु करुन त्या समाजासाठी आरक्षणाची मागणी केली. पुढे आरक्षण हे जातीच्या आधारे दिले जात नाही तर समान सामाजिक,आर्थिक,शैक्षणीक स्थिती असणार्या जातीसमुहांना दिले जाते.प्रामुख्याने सामाजिक न्यायाचे धोरण संविधानानुसार ज्या समुहांना काही भक्कम कारणास्तव दिले गेलेले आहे.तसे दिले जावू शकते हेच घटनात्मक धरु शकते.एका जातीला आरक्षण देता येत नाही. याची माहिती झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी ते समजुन घेतले.
शेतीचे विभाजन झाले. .
पण आज शेतीचे दरपिढीगणिक विभाजन होऊन कमी जमीन असणे,पिके निरर्गाच्या लहरीवर अवलंबून असल्याने आणि दुसरा कोनताही पारंपारीक कौशल आधारित व्यवसाय व कौशल्य प्राप्त नसल्याने बेरोजगारी व वंचितता निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात मराठा, कुणबी,व तत्सम जाती ज्या इतर राज्यातही आहेत, उदा.गुजरातमधे पटेल,जाट हरियाणात,यादव वगैरे जातींची अधोगती सुरु झाली. सामाजिक, शेक्षणिक, आर्थिक बाबतील दुरवस्था निर्माण झाली.प्रचंड संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्या.तीव्र प्रतिक्रिया या जातींमधे उमटली.त्यातुन जरांगे पाटील यांच्या नेत्रृत्वाखाली आरक्षण आंदोलन उभे राहिले.महाराष्ट्र सरकारने वेळकाढूपणा केला.न्यायालयात टिकू न शकणार्या,तात्पुरती मलमपट्टी करणार्या घोषणा केल्या.दहा टक्के आरक्षण घोषीतही केले.पण ते न्यायालयात टिकणार नाही,याची जाणीव असतानाही मराठ्यांना फसवले.
शेवटी कुणबी म्हणून. ..
शेवटी कुणबी म्हणून व तेही कुणबी हे आधीच ओबीसी मधे आहेत.म्हणून नव्याने मिळालेल्या कुणबी नोंदी व त्यांच्या सगेसोयर्यांनाही कुणबी प्रमाणपत्र नव्याने देउन ओबीसी मधे समाविष्ट करण्याच्या मागणीने जोर पकडला.त्यामुळे कुणबी जातींची संख्या मोठी होवून आधी कुणबी व इतर ओबीसी असलेल्या नवे भागिदार आले तर अपुरी पडेल हे सरळ सरळ होते.काही ओबीसी जातींनी यावर आक्षेप घेत आमच्यावर अन्याय होणार, अशी भुमिका घेतली.पण यावर ठोस उपाय सरकारने केला नाही.लोकसभेच्या निवडणुकांचे कारण पुढे करत हा प्रश्न शेवटी अनिर्णित ठेवला.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनांचा परिणाम लोकसभेचे निवडणुकीवर नक्कीच झाला.काही भाग अपवाद वगळता !

जरांगे पाटील यांचे पुन्हा आंदोलन अस्र !
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला लोकसभा निवडणूकीत याचा फटका बसला. आता तर राज्यातील विधानसभा निवडणूक समोर येउन उभी ठाकली आहे.आता राज्य पातळीवरील सत्ता स्पर्धेत हा मुद्दा जास्त प्रभावी ठरणार, हे निश्चितच !कारण जरांगे पाटील यांचे हे प्रचंड आंदोलन निपटताना लोकसभेचे निवडणुकिच्या आधी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे व देवेंद फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पुर्ण केले जाते की नाही? हे ठरणार आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी पुन्हा अपुर्ण राहिलेल्या आंदोलनांचे रणसिंग फुंकले आहे.आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता,सत्ताधारी व विरोधी पक्षाचे यशापयश ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा आता या विषयावर चर्चा सुरु झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा युक्तीवाद. ..
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आधीच्या 1980 च्या काळात मराठा आरक्षणाला कोणी विरोध केला व आम्ही मात्र आरक्षण कसे दिले होते?असा युक्तीवाद केला आहे. जरांगे पाटील यांनी देखील त्याबदल्यात त्यांना मोठ्या संख्येने विधानसभेच्या जागा मराठा समाजाने निवडून दिल्या होत्या. याची आठवण करून दिली आहे. सगेसोयरे यांच्या अधिसुचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. अन्यथा पुन्हा आंदोलनांच्या मार्गाने जाण्याचा इशारा देत मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले. तर मराठा समाजाला त्रास दिला तर त्या समाजाच्या नेत्यालाच निवडणूकीत आम्ही पाडु,असा इशारा देखील दिला आहे.