
Contents
- 1 Jarange Patil Shirur: मराठा आरक्षणासाठी अंतिम लढाईची हाक: मनोज जरांगे पाटील यांचे शिरूरमध्ये भावनिक आवाहन
Jarange Patil Shirur: मराठा आरक्षणासाठी अंतिम लढाईची हाक: मनोज जरांगे पाटील यांचे शिरूरमध्ये भावनिक आवाहन
Jarange Patil Shirur Doura
दिनांक 6 जुन 2025 | सत्यशोधक न्युज |
” Jarange Patil Shirur:शिरूरमध्ये मराठा आरक्षण जनक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन. 29 ऑगस्टला मुंबईत अंतिम लढाईची हाक. डॉक्टर, शिक्षक, कर्मचारी वर्गाला दोन दिवस आरक्षणासाठी देण्याचे आवाहन.”
मराठा आरक्षण आंदोलनाचे जनक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हक्कासाठी ठाम भूमिका मांडत 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे अंतिम लढाई देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
शिरूरमध्ये क्रिटीकेअर हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर, शिक्षक, वकील, सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना भावनिक साद घालत, “तुम्ही मदत करता, पण आंदोलनात सहभागी होत नाही – यावेळी तुमचे दोन दिवस आरक्षणासाठी द्या,” असे आवाहन केले.
🔸 ‘आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी’ – जरांगे पाटील
जरांगे पाटील म्हणाले की, “आजवर चार कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाले, आता उरलेल्यांसाठी आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे.” त्यांनी विश्वास व्यक्त केला की, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात मागील आंदोलने फिकट वाटावीत इतकी वीसपट गर्दी करणे आवश्यक आहे.
🔸 छगन भुजबळ यांच्यावर व मुख्यमंत्री यांच्यावर थेट आरोप—-
जरांगे यांनी यावेळी स्पष्ट आरोप केला की, “छगन भुजबळ यांना मंत्रीपद देणे म्हणजे जाती-जातींमध्ये भांडणे लावण्यासाठीच आहे.” यामागे मुख्यमंत्री यांचा हात असून, “मराठा-ओबीसी वाद भडकावणे, मराठ्यांची शांतता भंग करणे हा यामागील उद्देश आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
🔸 हॉस्पिटल उद्घाटनाचे औचित्य—-
शिरूर येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन मनोज जरांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक विठ्ठल पवार, संभाजीराव कर्डिले, श्यामकांत वर्पे, शोभना पाचंगे, युवराज थोरात, प्रकाश थोरात, तुषार दसगुडे, रमेश दसगुडे, रुपेश घाडगे, नवनाथ फरगडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर निखील अनभुले, डॉ. कृतिका अनभुले, डॉ. अंकुर फलके, डॉ. आदर्श पांडे, डॉ. शुभम भुतकर आणि डॉ. पूजा भुतकर यांचीही उपस्थिती होती.
🔸 डॉक्टरांना दिला सामाजिक जबाबदारीचा सल्ला—
मनोज जरांगे यांनी नव्याने हॉस्पिटल सुरू करणाऱ्या डॉक्टरांना उद्देशून सांगितले की, “बुद्धिजीवी वर्गाने गोरगरीब जनतेची सेवा करावी. हे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि सहकार्य करतात. त्यांच्या आशीर्वादातूनच तुमच्या सेवेचा खरा लाभ होतो.”
प्रास्ताविक डॉ. पूजा भुतकर यांनी केले. सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अंकुर फलके यांनी केले.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
https://www.baliraja.com/ (मराठा समाज संदर्भ)