Contents
- 1 तुमचा ब्रेक अप झाला आहे का? मग हे करा….
- 1.1 ब्रेक अप मधुन स्वतःला कसे सावरायचे ?
- 1.1.1 ब्रेक अप मधुन स्वतःला कसे सावरायचे ?—
- 1.1.2 तुमचा ब्रेक अप झाला आसेल तर तुम्ही हे करू शकता—
- 1.1.3 आपण सहसा वर्तमानात नसतो—
- 1.1.4 शरीरस्वास्थ्याकडे लक्ष द्या—-
- 1.1.5 तिच्या किंवा त्याच्या आठवणी,फोटो पाहु नका—
- 1.1.6 ब्रेकअप होणे म्हणजे तुमची किंमत कमी होणे नाही—
- 1.1.7 मानसिक आरोग्यतज्ञाची मदत घ्या —
- 1.1.8 लक्षात ठेवा—-
- 1.1.9 शरिराकडे/मनाकडे स्वत:ची अशी एक प्रतिकारशक्ती असते—
- 1.1.10 About The Author
- 1.1 ब्रेक अप मधुन स्वतःला कसे सावरायचे ?
तुमचा ब्रेक अप झाला आहे का? मग हे करा….
ब्रेक अप मधुन स्वतःला कसे सावरायचे ?
शिरुर ,दिनांक 21 मार्च 2025:
(सत्यशोधक न्यूज रिपोर्ट )
ब्रेक अप झाला आहे का? मग हे करा….!
ब्रेक अप मधुन स्वतःला कसे सावरायचे ? हे सत्यशोधक न्युज तुम्हाला सांगेल.तुम्ही काळजी करु नका.
ब्रेक अप मधुन स्वतःला कसे सावरायचे ?—
ब्रेक अप मधुन स्वतःला कसे सावरायचे ? याबद्दल खास अनुभवाने आणि अभ्यासाने तुम्हाला मदत आम्ही करु इच्छितो.आधी हे सांगतो की आमच्या भावना तुमच्या सोबत आहेत.घाबरू नका . ब्रेकअप ही एक खूप कठीण आणि वेदनादायक प्रक्रिया व अवस्था असते.हे मान्य आहे .प्रत्येक जण आयुष्यात कधी ना कधी या अवस्थेतुन जात असतोच. पण हे लक्षात ठेवा की ही अवस्था कायमची नसते. आणि तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता !
तुमचा ब्रेक अप झाला आसेल तर तुम्ही हे करू शकता—
तुमच्या मनात ज्या भावना निर्माण होत आहेत.त्या नैसर्गिकपणे, स्वाभाविकरित्या आपल्या जवळच्या व हितचींतकांसमोर व्यक्त करा.हितशत्रुंकडे व्यक्त करु नका. तुम्हाला रडायची देखील इच्छा होत असेल.रघु वाटत असेल.तर एकांतात रडा.पण भावना दडपून ठेवू नका. तुमच्या जवळच्या मित्रांशी किंवा कुटुंबीयांशीही बोलले तरी चालेल.कारण ते तुमचे चांगले करु इच्छितात.तुमचे मन सकारात्मक दिशेकडे वळवा.नकारात्मक दिशेला नेऊ नका.
आपण सहसा वर्तमानात नसतो—
आपण सहसा वर्तमानात नसतो.तर भुतकाळ किंवा भविष्याकाळात असतो.म्हणजे मनात भुतकाळातील आठवणी किंवा प्रतिमा असतात.त्यामुळे एखादी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. एखादे नवीन कौशल्य, वाचन, लेखन, चित्रकला असे काहीतरी सहज करता येते.
शरीरस्वास्थ्याकडे लक्ष द्या—-

आपण आपल्या शरीरस्वास्थ्याकडे लक्ष द्या.योगसाधना, ध्यानधारणा किंवा व्यायाम आपण करु शकता.आपण मन रमवण्यासाठी प्रवास करा.आपल्यापेक्षा जास्त दु:खी माणसे आपल्याला दिसतील.एवढेच नाही तर लग्न होवुन मुले होवुनही ब्रेक अप झालेली माणसे दिसतील.अगदी सेलेब्रिकी देखील आठवा.ज्यांच्या बद्दल आपण नेहमी ऐकतो.सलमान खानला आठवले तरी उत्तम ! बिचार्याचे याबाबत रेकॉर्ड ब्रेक असेल ! आणि असे असतानाही की ज्याच्यावर मरणार्या शेकडो सुंदर तरुणी आजही आहेत.अभीनेत्री रेखालाही आपण आठवु शकता. आपण स्री असाल तर ! नविन
लोकांशी संवाद साधा.
तिच्या किंवा त्याच्या आठवणी,फोटो पाहु नका—
Social Media मधील तिच्या किंवा त्याच्या आठवणी,फोटो पाहु नका.तिच्या किंवा त्याच्या प्रोफाईल वारंवार बघणे टाळा.जुने मेसेजेस, फोटो पाहून स्वतःला त्रास करून घेऊ नका.
स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःला सांभाळा.स्वत:वर लक्ष केंद्रित करा.स्वत:वर प्रेम करा.लक्षात ठेवा.आपल्यावर प्रेम कोणी ना करत असते.पण आपल्याला ते माहित नसते.
ब्रेकअप होणे म्हणजे तुमची किंमत कमी होणे नाही—

असा ब्रेकअप होणे म्हणजे तुमची किंमत कमी होणे.असा त्याचा अर्थ नाही.तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःकडे लक्ष द्या. छंद जोपासा. स्वतःला आवडणारे कपडे घाला.नवीन ठिकाणी जा.पर्यटनाचे एक छोटे नियोजन तुम्ही करु शकता. जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा, मानसोपचार तज्ञांचा,समुपदेशकांचा सल्ला घ्या.किंवा हा लेख दोन तीन वेळा वाचा.
मानसिक आरोग्यतज्ञाची मदत घ्या —

मानसिक आरोग्यतज्ज्ञ
(Counselor/Therapist) यांनी या विषयावर शास्रशुद्ध अभ्यास केलेला असतो.असे अनेक व्यक्ती हाताळलेले असतात.त्यांना या अवस्थेतुन बाहेर काढलेले असते. जर झोप लागत नसेल, वारंवार नकारात्मक विचार येत असतील,आत्महानी,सुडाचे विचार येत असतील तर त्वरित अशा तज्ञांची मदत घ्या.
लक्षात ठेवा—-
तुम्ही एकटे नाहीत.जग फार मोठे आहे. या दुःखातून तुम्ही बाहेर पडू शकता.एवढेच नाही तर पडणारच आहात.कारण शेवटी लेखात सांगतो. हा तुमच्या आयुष्यातला फक्त एक टप्पा आहे.संपुर्ण आयुष्य नाही. भविष्यात आणखी चांगल्या संधी तुमच्यासाठी नक्कीच येणार असतात. स्वतःवर प्रेम करा. स्वतःसाठी जगा! कारण खरे तर प्रत्येक जण तेच करत आसतो.फक्त माध्यम वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा.
शरिराकडे/मनाकडे स्वत:ची अशी एक प्रतिकारशक्ती असते—
सर्वात महत्वाचे सांगतो.जसे आपल्या शरिराकडे स्वत:ची अशी एख प्रतिकारशक्ती असते.भक्कम मेकेनिझम असतो.तसा आपल्या मनाकडेही असतो.तो नैसर्गिकरित्या प्राप्त झालेला आहे.त्याला पण काम करायला वेळ द्या.तोच ही समस्या दुर करणार असतो.फक्त तुम्ही थोडा काळ संयम ठेवा.
लक्षात ठेवा काळ हा सर्वात मोठा विलाज आहे.वेट करा !
