
Contents
शिरुर मधील राष्टसंत कैकाडी महाराज कला क्रीडा युवा प्रतिष्ठाण गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी अनिल गायकवाड तर उपाध्यक्ष पदी अविनाश जाधव!
शिरुर मधील कैकाडी आळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड !
शिरुर,दिनांक 14 आगस्ट : (श्री. अनिल डांगे यांच्याकडून)

शिरुर मधील राष्टसंत कैकाडी महाराज कला क्रीडा युवा प्रतिष्ठाण गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी अनिल गायकवाड तर उपाध्यक्ष पदी अविनाश जाधव यांची निवड झाली आहे. तर खजिनदार पदी नितीन गायकवाड यांची निवड झाली आहे.

आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या शिरुर मधील कैकाडी आळी यथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. या निवडीचे कैकाडी आळी व परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असते.या काळात रचनात्मक सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात.‘शिरुर’
मानव उत्सवप्रिय प्राणी !
शिरुर शहरभर अनेक ठिकाणी दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असतो.जातीनुसार वेगवेगळ्या वस्त्याची नावे पडलेली आहेत.त्या वस्तीत त्याच जातीतील लोक प्रामुख्याने राहतात.अशा कामाठी पुरा ,काची आळी,होलार आळी,पारधी वस्ती, कुंभार आळी इ.नावे असलेल्या वस्त्या शिरुरमधे आहेत.मात्र अनेक भाडेकरु प्रत्येक वस्तीत राहतात.त्यामुळे मिस्र वस्त्या शिरुरमधे आजच्या घडीला आहेत.तरी अशा संबंधित जाती आपल्या कोशातच अद्याप राहणे पसंत करतात.घरात व जातीत ते पुर्वीची त्यांची पारंपरिक भाषा बोलतात.दक्षिण व उत्तर भारत भाषा समुहातील भाषा बोलतात. मराठी माणसाशी चांगले मराठीत बोलत असतात.
उत्तर असो वा दक्षिण असो.मानव उत्सवप्रिय प्राणी आहे. त्याला उत्सव निमित्त फक्त पाहिजे.तो सहभागी होतो.उत्सव जितके जास्त तेवढे जीवनात रंगत जास्त.उत्सवाचे एक मानसशास्त्र असते.उत्सवात माणुस स्वतःचे व्यक्तिमत्व विसरुन जातो. समुहाचा भाग बनतो.समुहाचे देखील एक व्यक्तिमत्व असते.त्यामधे व्यक्तीचे व्यक्तीमत्व उत्सव प्रसंगी विलीन होते.व्यक्तीचे स्वतःचे दु:ख विसरले जाते.आनंदाचा अनुभव येतो.त्यामुळे माणुस उत्सवप्रिय असतो.भारतात हे अगदी भरभरुन आहे.म्हणुन इथली संस्कृती फारच दिर्घकाळ टिकली.
संस्कृती टिकली पण शोषण कायम राहिले !
संस्कृती टिकली.पण शोषण कायम राहिले.कारण शोषित आपल्या होणार्या शोषणावर विचार करायला सुरवात करतो न करतो तोच एक उत्सव समोर ठाकलेला असतो.त्यात तो मग्न होतो.असे वर्षभर चालु असते.अभाव व वंचितता तो विसरून जातो.त्यामुळे शोषक वर्ग याचा फायदा घेतो.तो अशा उत्सव,सण,चालीरिती, जयंत्या इ.ना प्रोत्साहन देतो.वर्गणी देतो.काहींना हाताशी धरून तेथील समुहावर नियंत्रण ठेवतो.असे अव्याहतपणे चालु असते.
साहजीकच सत्यशोधक न्युज पोर्टर केवळ बातमी देत नाही. तर सामाजिक ,सांस्कृतिक ,राजकीय प्रबोधनकारक लेखन करण्यासाठी वचनबद्ध आहे.आणि असणार आहे. बातमी तर दिली जाणारच.पण त्या त्या वेळी व बातमीच्या संदर्भाने विचार, माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. असे आम्ही आधी सांगितले आहे. वेबसाईट केवळ बातमी देत नाही तर तो एक ब्लाग असतो.ब्लाग म्हणजे लेख.ब्लागर म्हणजे लेखक.डिजिटल युगामधे हे असेच असणार आहे. उन्नत असणार आहे.
येवु घातलेले तंत्रज्ञान ?
अजुन ए आय चा वापर आम्ही केलेला नाही. ते शिकत आहोत.त्याचाही वापर पुढील काळात रचनात्मक कामासाठी आम्ही करु हे नक्की.अत्याधुनिक असे तंत्रज्ञान तरुण पिढीने ततडिने शिकुण घेतले पाहिजे. नाहीतर आपण सोळाव्या शतकात असु.जग एकवीसाव्या शतकात खुप पुढे गेलेले असेल.आणि आपल्यावर कोणी तरी शासन करत असेल.उघड करणे अवघड आहे. पण आपल्याला थांगपत्ता ही लागणार नाही की येणार्या तंत्रज्ञानाने आपल्याला गुलाम बनवले गेलेले असेल.
शिरुरचा नागरिक ?

शिरुरमधील नागरिक फक्त जगत आहेत. का? माहित नाही ! जग कुठे आहे? माहित नाही.मोबाइल फोन हेच केवळ एकमेव सुख देणारे साधन समजुन दिवसरात्र त्यात डोके घालुन बसलेले लोक सर्वत्र दिसतील.मेंढरासारखे मान खाली घालुन चालत राहायचे.मग पुढे दरीत पडलो तरी हरकत नाही.पण मान वर करून जगाकडे नजर टाकायची असते.हे विसरुन जगत राहतो.शिरुरमधे कोणीही किमान महाराष्ट्र पातळीवर प्रभाव पाडताना दिसत नाही. देशात काही घडले तरी इथला माणुस सुम्म असतो.पैसा पैसा करत राहतो.तो तरी कुठे मिळवतो.5 टक्के मिळवतात.पण पैसा नेमका कशासाठी वापरायचा असतो.ते कळत नाही. पैसा संपत्ती कुणाची एकाची पाहुन त्याचेच उदाहरण देत बसतो.त्याच्यासारखे बनायचा तरी प्रयत्न कर ! पण तेही नाही.उनुत्पादक,मुर्ख पणाच्या बाता मारत बसलेला इतरत्र दिसत असतो.
स्थितीप्रिय अवस्थेत लोक ?
शिरुर मधील उत्सवांनी या स्थितीप्रिय अवस्थेत इथल्या माणसाला आणून सोडले आहे. एकदम जड ! आणि जड मेंदुचा ! यात्रा,सण,उत्सव,जयंत्या, जत्रा यांमधुन समाजाचे मुलभुत प्रश्न सुटले का?उच्च दर्जाचे शिक्षण,आरोग्य सुविधा, व्याख्यानगृह,सभागृह, व्यायामशाळा,वाचनालये,रोजगार हे उपलब्ध का झाले नाहीत?या उत्सवी कार्यक्रमाला जो खर्च केला जातो. तो जर सर्वांगीण विकास,शाश्वत मुल्ये जपणारा समाज ,दारिद्यमुक्त समाज,संपन्न समाज,ज्ञानमार्गी समाज,शांत समाज,अधिक उच्चतर समाज कसा निर्माण होईल.यावर लक्ष केंद्रीत केले तर चित्र वेगळे असेल! हे शक्य आहे.