कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात आता वेगाने तपासाची,बनवाबनवीची, नंबर प्लेटबाबातची अशा अनेक घटनांची माहिती पुढे येत आहे. बड्या बापाच्या पोराने केलेल्या या कारनाम्यात दुचाकीवरून चाललेल्या तरुण,तरुणीची माहिती मिळत आहे. हे तरुण तरुणी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत. यातील तरुण इंजिनीयर हा आपल्या पुढील वाटचालीसाठी अमेरिकेला जाणार होता. मोठी स्वप्ने पाहत असताना हा बडे बाप का बिगडा बेटा अशा पद्धतीने क्षणात त्याची स्वप्ने उधळुन लावणार होता, हे त्या बिचार्याला काय माहित होते? अश्विनी असे तरुणीचे नाव आहे. आडनाव लिहीत नाही. कारण त्यावरुन जात समजण्यात इथली व्यवस्था आणि माणसं माहिर आहेत !
लोकशाही कोणत्या गाढवीच नाव?
जातीनुसार लोकांची सहानुमुती कमी जास्त होते. असा हा समाज आहे. तेच मिडीयाबाबत आहे. म्हणजे आपण एका लोकशाही राष्ट्रात राहतो, लोकशाही कोनत्या गाढवीच नाव आहे ? असा प्रश्न कवी नामदेव ढसाळ यांनी 70 /70 च्या दशकात त्यांच्या कवितेत विचारला होता. त्याचा अर्थ या देशातील माणुस लोकशाही हे एखाद्या गाढविनीच नाव असेल,असेही समजत असला तरी आश्चर्य वाटू नये. इतकं अगाध ज्ञान या समाजातील लोकांचे असते ! असे त्यांना सांगायचे होते. त्यानंतर ,
‘निर्भया’ जात लपवण्यासाठीच मग इतरांचे काय?
‘निर्भया ‘प्रकरणातही जात लपवण्यासाठी,’निर्भया ‘असा शौर्यवाचक शब्द वापरला होता. तसा फुलनदेवीच्या बाबतीत वापरण्याची आवश्यकता त्यावेळच्या माध्यमांना वाटली नाही. पुढे ‘निर्भया’च्या वडिलांनी ‘माझी मुलगी मी गमावली, आता नाव काय लपवू? ‘म्हणत शेवटी नाव सांगितले होते.
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात इथली व्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहेत. याचे प्रमुख कारण सोशल मीडिया आहे. सोशल मिडीयावर लोक ‘निर्भय’ होत आहेत, ही चांगली बाब आहे. तर भारतातील what’s up बंद करु असे Google सरकारला बजावले. सरकार सोशल मीडियावर बंधने घालण्याचा प्रयत्नात आहे. पण या देशावर दिडशे वर्ष राज्य केल्यामुळे या गोर्या कातडीच्या लोकांनी इथल्या लोकांची प्रवृत्ती चांगली ओळखून त्याची नोंद पक्की ठेवली असावी.
सोशल मिडिया नसता तर इथला तथाकथीत मिडीया,चौथा खांब वगैरेंनी एवढ्या मालदार माणसाच्या एकुलत्या एक लेकराला सुखरुपपणे बाहेर काढले असते.1990 किंवा अगदी 2010 पर्यंतचा काळ पहा ! उच्चंभ्रुंचा उदोउदो करणे आणि उरलेल्यांच्या नकारात्मकच बातम्या देणे असा सगळा प्रकार चालायचा.
हिंदी माध्यमे महाराष्ट्रद्वेष्टी?
आता मुख्य प्रवाहातील मिडियापेक्षा what’s up सारख्या सोशल मीडियावर तत्काळ एखाद्या घटनेची माहिती व फोटोही तत्काळ येतो.याचा आम्हा पत्रकारांना आज खुप उपयोग होत असतो. पुण्यातील एका पत्रकाराने विषय लावूनच धरला ! त्यामुळे हिंदी आणी इंग्रजी माध्यमांना याची दखल घ्यावी लागली. पण हिंदी माध्यमे महाराष्ट्रद्वेश काही सोडायला तयार नाहीत. पुण्याचे नाव बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संबित बात्राचे चेनल पहा म्हणजे कळेल !
पुणे विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखले जाणारे एक सुंदर व अशात शहर आहे. पण ते आज तसे राहिले नाही,असा एकुण सुर राष्ट्रीय मिडियातुन निघताना दिसतो आहे.
गाडीला नंबर प्लेटच नाही. …
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा पोर्शे गाडीचा नंबर हा आहे. पण या गाडीला नंबर प्लेटच नाही ! किती गंभीर बाब? आणि गाडी या भागातुन रोज हा बिघडलेला पोरगा फिरवत होता. पण traffic पोलिसांना हा कधीच दिसला नाही. तर आवडीचा नंबर मिळावा यासाठी अगरवालने अर्ज केला होता. पण आर टी ओ कडुन सुचना मिळुनही अगरवाल तिकडे फिरकला नाही. का? हा आवडता नंबर होता MH12WQ2000 ! त्यासाठी 45000 रुपये दिले होते.
या गाडीची खरी किंमत 2.44कोटी रुपये आहे. ती सुपरलक्झरी आहे.मार्च 2024 मधे ती खरेदी करण्यात आली होती. पण रजिस्रेशन करण्यासाठी केवळ 1758 रुपये खर्च होता. पण ते न करता fancy नंबरसाठी अर्ज केला होता. tax वाचवण्यासाठी हे केले जात होते, असे सांगितले जात आहे. इलेक्ट्रिक कार tax कमी लागतो. पेट्रोलच्या गाडीला tax 50 लाख लागला असता. बनिया घाटेमें धंदा कभी नहीं करता ! अगरवाल कुटुंबाचे पंजोबा खरे अगरवाल कुटुंबाच्या आजच्या सांपत्तिक स्थितीचे शिल्पकार आहेत.त्यांनी प्रथम ठेकेदारी,कंस्ट्रक्शन हा व्यवसाय सुरू केला.खराडी,चंदननगर इ.बर्याच भागात त्यांच्या शाखा झाल्या. 5 Star हॉटेलमधेही ते कार्यरत आहेत. यांची मजल अंडरवर्ल्ड मधील Don पर्यंत पोहोचली होती.
बापाचा निसटून जाण्याचा प्रयत्न. …
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील रोमांच निर्माण केला तो आरोपी बापाने निसटून जाण्याचा जो प्रयत्न केला त्यात आहे. त्याने त्याच्या दोन गाड्यांपैकी एक गाडी गोव्याकडे पाठवली. दुसर्या गाडीसह तो मुंबईकडे जाण्यास निघाला. पण ही सुद्धा पोलिसांना चकवा देण्याची चाल होती. जशी लालमहालावर हल्ला करून परतताना शिवरायांनी सिंहगडाकडे जात आहे असे दाखवण्यासाठी सिंहगडाच्या दिशेने बैल,घोडे आदी जनावरांच्या शिंगांना पेटते पलीते लावून सिंहगडाकडे पिटाळत चालवते.
खानाच्या सैनिकांना जळत्या मशाली सिंहगडाकडे जाताना दिसल्यामुळे ते तिकडे शिवरायांचा पाठलाग करत पळाले. पण सापडली ती जनावरे ! शिवराय तोपर्यंत उलट्या दिशेने सुरक्षित ठिकाणी जावून पोहोचलेही ! खान पहातच राहिला. तसा आपल्या मागावर असणार्या पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अगरवालने ड्रायव्हरला एकट्यालाच मुंबई कडे पाठवले. जेणेकरुन पोलिस मुंबईकडे जातील. पण त्या गाडीत तो सापडणार नाही.
पण गाडीतच ओपीएस सिस्टिम !
पण मित्राकडुन औरंगाबादला घेतलेल्या गाडीत ओपीएस सिस्टिम होती. दरम्यान तो Mobile मधील sim बदलत होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच ! पण पोलिसांना औरंगाबादच्या आतील भागात त्याचे location दिसत होते. त्यांनी त्याला गाठलाच ! थोडाफार पळण्याचा प्रयत्नही त्याने केला. पण कितीही शातिर गुन्हेगार असला तरी तो कुठे ना कुठे फसतोच. अमिताभ बच्चनच्या आंखे चित्रपटात जसा अमिताभचा एकच शब्द चुकुन बाहेर पडतो.आणि आदित्य पांचोली जो पोलिस अधिकारी असतो तो पुढचे काम करतो.तसे अगरवालच्या बाबतीत पोलिसांनी औरंगाबाद येथे केले.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com