Contents
- 1 🔎 कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाच्या अपहरण–खून प्रकरणाचा उलगडा
🔎 कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाच्या अपहरण–खून प्रकरणाचा उलगडा
कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाच्या अपहरण – खुन पण शिरुर पोलिसांकडुन आरोपींचा,’नेमका ‘गेम’ (?)
शिरूर, दि. 15 ऑक्टोबर 2025 |प्रतिनिधी|
कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक मंजुनाथा एन.शेज्जामगडकर, वय 58 वर्षे, रा.होलुलु,जि.हाडागळ यांच्या अपहरण–खून प्रकरणाचा उलगडा शिरूर पोलिसांनी अल्पावधीत केला आहे.आरोपींनी मंजुनाथा यांचे अपहरण करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.ती मिळाली नाही.तेव्हा त्यांनी मंजुनाथा यांचा खुन करुन कर्नाटक मधील तुंगभद्रा नदीत फेकला होता.त्याआधी चारचाकी वाहनाच्या डिक्कीत त्यांना ठेवण्यात आले होते.अशी माहिती मिळाली आहे.
हिरेहाडागळी,ता.हाडागळी,जि.विजयनगर पोलीस स्टेशन, कर्नाटक ( Karnataka State Police ) येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा क्र. 126/2025 व भारतीय न्याय संहिता कायदा कलम कलम 140(2) प्रमाणे कर्नाटक पोलिसांमधे दाखल करण्यात आलेला होता.त्यांचे अपहरण झाल्याची नोंद देखील होती. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे आरोपी महाराष्ट्रात लपल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार आरोपींना थांगपत्ता लागु न देता शिरुर पोलिसांकडुन आरोपींचा ‘नेमका ‘गेम’ अर्थात मलठण येथे दाखल होवुन आरोपींना क्षणाची उसंत न देता बेड्या ठोकण्याचे काम शिरुर पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या शिरुरच्या, ‘तरबेज’ पथकाने पार पाडली.
👮♂️ शिरूर पोलिसांची तत्पर तपास मोहीम
या घटनेत माहिती मिळताच शिरूर पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी तात्काळ तपास पथक तयार केले.या पथकात पोलीस कॉन्स्टेबल भवर, शिरोळे, शिंदे आणि रावडे यांचा समावेश होता.गुप्त माहितीच्या आधारे मलठण, शिरूर तालुका, जिल्हा पुणे परिसरात छापा हा टाकण्यात आला.या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाच्या अपहरण–खून प्रकरणाचा उलगडा होणारी धक्कादायक कबुली दिली.सराफ मंजुनाथा हे सकाळी मॉर्निंग वाकला जात असताना त्यांचे पैशासाठी अपहरण करण्यात आले होते.
👥 आरोपींची संपूर्ण माहिती
- योगेश बेसेटेप्पा अंगदी, वय 24 वर्षे, रा. कोटे, होलालु ,ता.हिरेहाडागळी,जि.विजयनगर, कर्नाटक
- मल्लिकार्जुन नामम्मा उज्जामानावरा,वय- 25, रा.कोठ ,होलालु, ता. हिरेहाडागळी, जि. विजयनगर, कर्नाटक.
या दोघांनी मिळून मंजुनाथ एन. शेट्टी यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली.
🕵️ गुन्ह्याची पार्श्वभूमी
दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपींनी मंजुनाथ शेट्टी यांना व्यावसायिक व्यवहाराच्या बहाण्याने बोलावले.त्यांना कारमध्ये बसवून डिकीत कोंबले. मारहाण करून खून केला नंतर शव तुंगभद्रा नदीत फेकला.हिरेहाडडागळी पोलिसांनी (Karnataka Police Department) आणि शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करून आरोपींना अटक केली.
📍 तपास पथकातील अधिकारी
या उत्कृष्ट कारवाईत खालील अधिकारी सहभागी झाले:
- श्री. संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक, शिरूर
- श्री.रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर
- श्री. संदीपसिंह गिल (मा.पो.से.), पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
- सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढोले , पुणे
- पोलीस कॉन्स्टेबल शिरोळे, शिंदे, राऊत
हिरेहाडागगळी पोलिसांच्या विनंतीवरून महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police Official Site) हे तातडीने सहकार्य केले.
💬 अधिकाऱ्यांचे मत
शिरूर पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी सांगितले —
“राज्यांतर गुन्हे तपासात समन्वय राखणे हे आव्हानात्मक असते. पण आमच्या पथकाने समन्वय, गुप्त माहिती आणि तातडीच्या कारवाईच्या जोरावर हा गुन्हा उघडकीस आणला.”
📰 गुन्ह्याचे महत्त्व
हा प्रकार महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील पोलिस समन्वयाचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.या कारवाईमुळे दोन्ही राज्यातील पोलिस यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.गुन्हेगार कोठेही गुन्हा करुन भारतभर कोठेही लपुन बसला तरी ,’कानून के हात लंबे होते है’,पोलिसांच्या तावडीतुन तो सुटु शकत नाही.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या प्रकरणातील पुढील तपास हिरेहाडागळी पोलीस स्टेशन, जि. विजयनगर (Karnataka) येथे सुरू असून, त्याबाबत Punekar News आणि The Indian Express यांनीही वृत्त दिले आहे.
Read more >>>>>
शिरुर तालुक्यात तिसरा खुन ? कायदा व सुव्यवस्था धोक्यात ?
‘आधार छाया फाउंडेशन, शिरूर’ तर्फे पोलिस व एसटी डेपो अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत राखीबंधन उत्सव!
शिरूरमध्ये ३.५६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त – एकाला अटक
