
Contents
- 1 शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ : माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने जिंकली ! तर वडगाव रासाईत शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक !
- 1.1 शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा पारडे वर खाली !
- 1.1.1 शिरूर,दिनांक 15 नोव्हेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन)
- 1.1.2 माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने जिंकली. ..
- 1.1.3 महायुतीतील घटक पक्षांची एकजूट. …
- 1.1.4 ‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
- 1.1.5 मतदारांनी केले स्वागत….
- 1.1.6 महिला मोठ्या संख्येने. …
- 1.1.7 पारडे स्थिर होईना….
- 1.1.8 शरदचंद्रजी पवार यांचा मास्टर स्ट्रोक. ..
- 1.1.9 About The Author
- 1.1 शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा पारडे वर खाली !
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ : माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने जिंकली ! तर वडगाव रासाईत शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक !
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा पारडे वर खाली !
शिरूर,दिनांक 15 नोव्हेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन)

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने आज जिंकली आहेेत. तर वडगाव रासाईत शरद पवारांचा ‘मास्टर स्ट्रोक’ पहायला मिळाला आहे. त्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू केला जाईल,अशी हमी दिली आहे. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा पारडे वर खाली होताना दिसत आहे.
माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने जिंकली. ..
आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी शिरूर शहरांमध्ये महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली होती.ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिरूर शहरातील सर्व प्रमुख भाग पादाक्रांत करत अखेर कुंभार आळी येथे समाप्त झाली. या वेळेस शिरूर शहरातील आज नागरिकांनी घराबाहेर येऊन माऊली कटके यांना आज प्रथमतः पाहिले आणि आपल्या संस्कार क्षमतेचे दर्शन घडवत त्यांना मानसन्मान अर्पण केला.’शिरुर हवेलीत’
महायुतीतील घटक पक्षांची एकजूट. …
त्यांना विजयी करण्याचे आश्वासन हे दिले. त्यामुळे माऊली आबा कटके यांच्यासाठी आजचा दिवस हा चांगला ठरलेला आहे. त्याच बरोबर शिरूर शहरातील महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार , भारतीय जनता पक्ष , रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना या सर्व प्रमुख महायुतीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog
—
मतदारांनी केले स्वागत….
या पदयात्रेमध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झालेले होत्या. या सभेमध्ये माऊली कटके यांनी शिरूर मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांनी ‘घड्याळ’ या चिन्हासह शहरभर फिरून मतदारांना घड्याळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून माऊली आबा कटके यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
महिला मोठ्या संख्येने. …
या पदयात्रेमध्ये राहुल दादा पाचर्णे, नितीन पाचर्णे, मयूर थोरात,सुरेश गाडेकर, रेड्डी, रवी बापू काळे, शरद कालेवार, अनिल बांडे, विजय नरके, उमेश शेळके, सुप्रिया साकोरे, श्रुतिका झांबरे, राणी कर्डिले अशा सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या होत्या.
पारडे स्थिर होईना….

एकंदरीत आजची सभा आजची पदयात्रा माऊली आबा कटके यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलेली आहे. मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने शिरुर शहरांमध्ये राहत असल्याने शिरूर शहरातील मते शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त मते मिळावी असा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून होत आहे. मात्र मतदारांचा कौल हा अजूनही दोन्ही बाजूंना समसमान असा दिसत आहे.पारडे वर खालीच होत आहे. अशी स्थिती शिरूर शहरांमध्ये आहे.
काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचे सर्व ज्येष्ठ नेते श्री. शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झाली.
शरदचंद्रजी पवार यांचा मास्टर स्ट्रोक. ..
महाआडीचे उमेदवार श्री.अशोक बापू पवार हे आहेत आणि या सभेमुळे महाआघाडीच्या समर्थकांमध्ये देखील एक चैतन्य निर्माण झाले आहे. श्री. शरदचंद्रजी पवार यांनी पूर्णपणे अशोक बापूंच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केलेले आहे. आणि घोडगंगा सहकारी साखर कारखाना देखील पुन्हा सुरू करण्यात येईल अशा प्रकारे आश्वासित केलेले आहे. त्यामुळे आजच्या घडीला महायुती आणि महाआघाडी दोघांची बाजू तुल्यबळ असल्याचे दिसत दिसत आहे.अशा परिस्थितीमध्ये आज कौल कुणाकडे झुकेल हे सांगणे देखील चांगल्या चांगल्या जाणकारांना देखील सांगणे कठीण होत आहे. नवा चेहरा निवडून द्यायचा की अशोक बापू पवार यांना मंत्रिपदासाठी म्हणून शिरूर हवेली मतदारसंघातून संधी द्यायची असा प्रश्न मतदारांच्या समोर आहे.
आणखीन दोन-तीन दिवसांमध्ये याबाबतची थोडीफार स्पष्टता यायला काही हरकत नाही, असे दिसते.