शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला तर पिंपरखेडच्या दोघांनी ‘तंगड्या काढण्या’ ची धमकी देत एकाला केली मारहाण !
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला आहे तर पिंपरखेडच्या दोघांनी 'तंगड्या काढण्या' ची धमकी देत एकाला मारहाण केली आहे. या दोन्ही फिर्यादी शिरुर पोलिस स्टेशनला नोंदवल्या गेल्या आहेत.पोलिस निरीक्षक श्री. ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला तर पिंपरखेडच्या दोघांनी ‘तंगड्या काढण्या’ ची धमकी देत एकाला केली मारहाण !
शिरुर तालुक्यात दोन घटनांमधे एक विनयभंग तर दुसरीत दोघांकडून एकाला मारहाण !
शिरुर,दि.31 जुलै : ( श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला आहे तर पिंपरखेडच्या दोघांनी ‘तंगड्या काढण्या’ ची धमकी देत एकाला मारहाण केली आहे. या दोन्ही फिर्यादी शिरुर पोलिस स्टेशनला नोंदवल्या गेल्या आहेत.पोलिस निरीक्षक श्री. ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा विनयभंग?….
कवठे येमाई परिसरातील घडणार्या गुन्हेगारी घटना सातत्याने शिरुर पोलीस स्टेशनला नोंद होताना दिसत आहेत. याचा अर्थ कवठे येमाई व परिसर या भागात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.जवळ टाकळी हाजी येथे एक पोलिस चौकी आहे.पण तीचा कोनताही धाक या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तसा चांगला लौकीक असलेला हा भाग नको त्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत येत असेल तर या भागातील नागरिक व लोक प्रतिनीधींनी विचार करण्याची आवश्यकता आहे.
Dr.Nitin Pawar,Shirur.
‘संपादकिय टच”
“महिलांची सुरक्षितता आणि तरुण हिंसक का बनत चालला आहे?हा एक महत्वाचा प्रश्न आहे यात शंका नाही. ग्रामीण भागात हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शिरुर पोलिस स्टेशनला वावरताना हे लक्षात येत आहे. महिला असुरक्षीत अनेक कारणांमुळे होत आहेत़. पुरुषी मानसिकता समाजात परंपरागत पुरुषप्रधान कुटुंब व समाज पद्धतीने आधी होतीच !
पण आता पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेला आव्हान प्रथमच स्रिवर्गाकडुन निर्माण होवू लागले आहे. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक खुणावते आहे.ते त्यांना हवे आहे हे ही योग्य आहे.अधिकाधिक स्वातंत्र्याडे जाण्याची मानवी आकाक्षा राहीली आहे.विशेषता स्री वर अधिकाधिक नियंत्रण ठेवण्याची वर्चस्ववादी मानसिकता परंपरेने चालत आली.आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाने स्रीला भित्या पाठी ब्रह्म राक्षसासारखे उपलब्ध झाले. अखेर तिने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.आधी ती ,’सैराट’ झाली !
इथे आता समाज बदलाची थिणगी पडली.त्यानंतर कुटुंबाशी ,जातीशी आणि पोलिसांशी तरुणी ज्या बेधडकपणे बोलताना दिसत आहेत. ते पाहता परंपरेला आव्हान देत अनेक परंपरा इतिहासाजमा होतील अशी चिन्हे विचारवंतांना दिसत आहेत. त्याची पुरुषप्रधान समाजातील पुरुषांमधे तिव्र प्रतिक्रिया छोट्या मोठ्या घटनांमधून स्पष्ट दिसत आहे.”
महिलेचा हात पिरगळुन मारहाण?
महिला असुरक्षीत !
फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिगत की दिनांक 27/07/2024 रोजी सायंकाळी 7: 00 वाजण्याच्या . सुमारास कवठे येमाई गावच्या हाद्दीत मुंजालवाडी येथील डिंभे धरणाच्या कॅनॉल वरील पुलावर फिर्यादी महिलेच्या गावातील विजय सावकार मुंजाळ ,राहणार- मुजांळवाडी, कवठे येमाई तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे हा समोरून आला. फिर्यादी महिलेला घाण घाण शिवीगाळ करू लागला. तेव्हा फिर्यादी महिला त्याला म्हणाली की,’ तु मला शिव्या देवु नकोस. तेव्हा त्याने फिर्यादी महिलेचा डावा हात मनगटाजवळ पकडला.हात देखील पिरगाळला. तेव्हा फिर्यादी डाव्या कुशीवर पडली. तेव्हा आरोपीने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन त्यांने केले आहे. म्हणुन फिर्यादी महिलेने आरोपीच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. आरोपी विजय सावकार मुंजाळ,राहणार, मुजांळवाडी, कवठे येमाई,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’शिरुर‘
विनयभंगाचा गुन्हा दाखल. …
आरोपीवर शिरूर पोलिस स्टेशनला गु. र. नं. 661/2024 हा आहे.तर भारतीय न्याय संहिता कलम 74,352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. राउत हे करत आहेत.तर दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. खेडकर हे आहेत. प्रभारी अधिकारी श्री.ज्योतीराम गुंजवटे,शिरुर,पोलिस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
———–
शिरुर तालुक्यातील दुसरी घटना !
तर शिरुर तालुक्यातील दुसऱ्या घटनेत फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिगत अशी की दिनांक 21/07/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याचा सुमारास काठापुर खुर्द गावच्या जिल्हा परिषद शाळेसमोर 1) सागर विलास उदागे 2) संजय फकीरा उदागे
दोन्ही राहणार-पिंपरखेड, तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे हे फिर्यादी राहुल बाबुराव राक्षे ,वय- 31 वर्षे,व्यवसाय- शेती,राहणार-पिंपरखेड गावठाण,तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे यांना
म्हणाले की,’ तुला खुप माज आला आहे’.तसेच अशा पद्धतीने शिवीगाळ केली.’तुझ्या टंगड्या काढतो’ अशी धमकी दिली.ते दोघे फिर्यादीच्या अंगावर धावुन आले. त्यावेळी सागर उदागे यांने फिर्यादीस पाठीमगुन धरून ठेवले.तर संजय उदागे यांने हातात दगड घेवुन फिर्यादीच्या गालावर,नाकावर,भुवईवर मारून दुखापत केली आहे.
म्हणुन फिर्यादीने त्या दोघांविरूद्ध तक्रार दिली आहे. शिरुर पोलिस स्टेशन ला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी
1) सागर विलास उदागे
2) संजय फकीरा उदागे
यांच्यावर गु. र. नं. 662/2024 तर भारतीय न्याय संहीता कलम 118(1),352,351(2)(3),3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री.भगत हे करत आहेत.तर दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. खेडकर हे आहेत. प्रभारी अधिकारी जोतीराम गुंजवटे,पोलिस निरीक्षक ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
1 thought on “शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला तर पिंपरखेडच्या दोघांनी ‘तंगड्या काढण्या’ ची धमकी देत एकाला केली मारहाण !”
1 thought on “शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला तर पिंपरखेडच्या दोघांनी ‘तंगड्या काढण्या’ ची धमकी देत एकाला केली मारहाण !”