
Contents
- 1 Kawathe Yemai Jaminicha Vaad News :जमीन वादातून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला; 7 आरोपींवर गुन्हा दाखल !
Kawathe Yemai Jaminicha Vaad News :जमीन वादातून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला; 7 आरोपींवर गुन्हा दाखल !
Kawathe Yemai Jaminicha Vaad News 19 April 2025 🙁Satyashodhak News Report)
Kawathe Yemai Jaminicha Vaad News: शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जमीनीच्या वादातून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे. शिरुर पोलिसांनी 7 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
कवठे येमाई, शिरूर तालुका येथील इचकेवाडीमधील घटना —
कवठे येमाई (तालुका – शिरूर) येथील इचकेवाडीमध्ये आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जमीन वादातून एक गंभीर प्रकार घडला आहे. शेतकरी श्री. बाबुराव सगाजी इचके यांच्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
बेकायदेशीर गर्दी जमवून बांधकाम थांबवण्यास सांगितले-
श्री. इचके यांच्या मालकीच्या गट नं. 291 या जमिनीवर कांद्याच्या अरणीचे (चाळीचे) बांधकाम सुरू असताना, त्यांचे शेजारी असणारे आशा बबन इचके, राजेंद्र बाळकृष्ण इचके, सुरेखा राजेंद्र इचके, यश राजेंद्र इचके, मंगल बाळकृष्ण इचके, रूपाली संतोष इचके, व संतोष बाळकृष्ण इचके यांनी बेकायदेशीर गर्दी जमवून बांधकाम थांबवण्यास सांगितले.
Read more >>
वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले—
या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी बाबुराव इचके यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगी, चुलत भाऊ आणि इतर नातेवाईकांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास—
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 259/2025 अन्वये BNS कलम 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस नाईक बनकर (2436) करत आहेत.
Read more >>
ही घटना शेतजमिनीतील मालकीच्या वादावरून उद्भवली असून, सध्या संपूर्ण गावात याबाबत तीव्र चर्चा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …