अरविंद केजरीवाल यांनी एकाच बाणात दोनच नाही तर बरेच पक्षी मारले आहेत !
अरविंद केजरीवाल यांनी एका बाणात दोनच नाही तर बरेच पक्षी मारले आहेत ! कसे व अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अतिशी यांच्यावरच का सोपवली? ते वाचा 'आप ' चे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघतील उमेदवार नितीन पवार यांच्या लेखणीतुन....
अरविंद केजरीवाल यांनी एकाच बाणात दोनच नाही तर बरेच पक्षी मारले आहेत !
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अतिशी यांच्यावरच का सोपवली?
डॉ.नितीन पवार, उमेदवार,शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ, आम आदमी पक्ष, शिरुर.
शिरुर ,दिनांक 18 सप्टेंबर: डा.नितीन पवार, उमेदवार,शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ, शिरुर यांचे खास विश्लेषण ….
अरविंद केजरीवाल यांनी एका बाणात दोनच नाही तर बरेच पक्षी मारले आहेत ! कसे व अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अतिशी यांच्यावरच का सोपवली? ते वाचा ‘आप ‘ चे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघतील उमेदवार नितीन पवार यांच्या लेखणीतुन….
अरविंद केजरीवाल यांचे पथम राजीनामा अस्र ?
अरविंद केजरीवाल राजीनाम्याची घोषणा केली आणि दिवसात राजीनामा दिला आहे .नवीन मुख्यमंत्र्यांचीही घोषणा केली.आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिषा सिंग /मार्लेना यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड केली.आणि एका बाणात एकच दोन नाहीतर कितीतरी पक्षी मारले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांच्यावरचढ ठरत असल्याने, तसा वारंवार अनुभव येत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बेसुमार बोलु लागले.’अरविंद केजरीवाल’
गौरव भाटिया उवाच…
भारतात जनता पक्षाचा एक प्रवक्ता ‘गौरव भाटिया हा आतिशय खालच्या भाषेत हिंदी चॅनेल वर अपशब्द वापरत होता. त्यांना निर्लज्ज वगैरेचा म्हणत होता. मूर्खाला हे कळत नव्हते की अरविंद केजरीवाल यांचा एखाद्या मोठ्यात गुन्ह्यात शिक्षा झालेली नाही.दुर्मिळातील दुर्मिळ असे क्रुर कृत्य अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. म्हणून ‘ते ‘निर्लज्ज’ आहेत.
जामीण मिळाला आहे, गुन्हा सिद्ध झालेला नाही. ..
असे म्हणता आलेही असते. परंतू सर्वोच्चमा न्यायालयांने त्यांचा जामीन मंजुर केलेला होता. न्यायालयाच्या रितसर प्रक्रियेत नंतर जामीन मंजुर होणे.गुन्हा सिद्ध अजून झालेला नाही. जामीन मिळालेला आहे.देशातील सर्वोच्च न्यायालयाचा जामीण आहे.निकाल लागलेला नाही.परंतु एकदम अनपेक्षित रित्या केजरीवाल यांना जामीन मंजुर झाल्याचा भारतीय जनता पक्षाला धक्का बसला.शिवाय न्यायालयाने सीबीआई वर ताशेरे ओढले आहेत. म्हणते भारतीय जगता पक्षाने केलेल्या अटके संदर्भात आणि आरोपांच्या संदर्भातील भारतीय जगता पक्ष च्या सरकारला लाज वाटली पाहिजे ! कारण न्यायालयाने ‘खेटराने मारले’ ले आहे ! परंतु हे ‘काही’ हे प्रवक्ते सांगत नव्हते .
पक्ष फोडण्याचे कारस्थान नामोहरम केले…
दुसरे मुद्दा ‘असा होता की श्री. करवंद केजरीवाल यांनी तुरुंगात असताना राजीनामा का दिला नाही? तुरुंगातुन बाहेर आल्या नंतर दोन दिवसांनी राजीनामा देणार असल्याचे का सांगितले? दोन दिवस अशा ‘साठी पाहिजे होते की भारतीय जाता पक्षाचे
कारस्थानी न राजकारण समजण्या इतके केजरीवाल हे अडाणी नाहीत. तुरुंगातही असतानाच राजीनामा दिला असता भारतीय जनता पक्षाचे ‘आम आदमी पक्ष’ च्या आमदारांना अनेक प्रकारचे त्रास देऊन आम आदमी पक्ष फोडण्याचे आणि इतर गोष्टी करण्याचा शक्यता होतीच .
मोदींचा ,’वाढदिवस ‘ फेल केला !
त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात राजीनामा दिला नाही. दोन दिवस श्री. अरविंद केजरीवाल यांनी अशासाठी घेतले की त्या काळातही 17 सप्टेंबरला श्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा होणार होता.दरवर्षी हा वाढदिवस प्रचंड खर्चाने गाजत वाजत उत्सवी वातावरणात केला जातो. देशभरात सतत ‘चमकोगिरी’ केली जात असते.बरोबरच वेगवेगळ्या घोषणा करून जनतेची फसवणूक चालुच असते. त्यांनी पोसलेले पत्रकार यांच्या मार्फत सतत मीडिया मधुन चर्चा घढवून लोकांना ‘बनवण्या’चा प्रयत्न मीडिया करत असायचा तो प्रयत्न 17 सप्टेंबर हा यावर्षीचा श्री. केजरीवाल यांनी हाणून पाडला आणि त्यादिवशी आतिषी यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे मिडीया मध्ये आणि प्रेस मीडियामध्ये याच विषयाची चर्चा रंगली .सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्वीट, पोस्ट, बातम्या चालल्या होत्या आणि नरेंद्र मोदी यांना कुठेच त्यांच्या वाढदिवसाची यावेळी दखल घेतलेली दिसली नाही. तुरळत प्रमाणामध्ये ती होती.
‘आप’ च्या पहिल्या व दिल्लीच्या तिसर्या मुख्यमंत्रीपदी महिला. …
अरविंद केजरीवाल यांनी ‘दोन दिवसांमध्ये देशभर सर्व प्रकारच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली. वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा चालू असताना श्री. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्नीला ,सुनिता केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर न बसवता अतिषी यांची निवड केली. अरविंद केजरीवाल यांनी सुनीता केजरीवाल यांना बसवावे असे वातावरण निर्माण केले जात होते. त्यानंतर त्यांच्या वर घराणेशाहीचा आरोपही करणे शक्य व सोपे झाले असते.पक्षातील इतर नेत्यांवर विश्वास नाही.असाही प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न केले गेले असते.जे प्रयत्न आधीच सातत्याने चालू आहेत. हा भारतात जनता पक्षाचा डावही सर्वांसमोर केजरीवाल यांनी उजळून लावला !
आतिषी मार्लिने सिंग सर्वगुणसंपन्न. ….
अतिशय उच्चशिक्षित मुख्यमंत्री पदावर निवडून त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत.पक्षातील सर्वांचे एकमत असल्याचे त्यांनी दाखवून दिले.पक्षात बंडखोरीची काडी मात्र शक्यता नाही. हेही लोकांसमोर आणले. अरविंद केजरीवाल यांनी अतिषी यांची निवड करुन भारतीय जनता पक्षाला एक मोठा झटका दिलेला आहे.अतिषी या पहिल्यांदाच आमदार झालेल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेल्या, सखोल अभ्यास करणाऱ्या,सडेतोड बोलणाऱ्या, अभ्यासपूर्ण ,कार्यक्षम अशा नेत्या आहेत.त्यांचे आई-वडील हे प्राध्यापक आहेत.त्यांच्या घरच्या वातावरणात कार्ल मार्क्स व लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव झालेल्या एका कुटुंबांतील त्या वातावरणात वाढलेल्या आहेत. म्हणून त्यांचे नाव कार्ल मार्क्स लेनिन या दोन नावांची केलेली संधी असल्याचे सांगितले गेले.ते बरोबर आहे. अभिमानाची बाब आहे. इतर पक्षाच्या नेत्यांचा व कार्यकर्यांचा असा कोनता वैचारिक पाया नसतो.जनतेला लुटणे हा पाया असतो.त्यांचे आडनाव सिंग हे आहे.
अफजल गुरूवरुन बदनामीचा प्रयत्न?
भारतीय जनता पक्षाच्या घटिया प्रवक्त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच्या या घटनेचा चुकीचा अर्थ लोकांना सांगायला सुरुवात केली. जणू काही मार्क्स आणि लेनिन हे लोकांसाठी मार्क्स रावण आणि कंस आहेत ! अफजल गुरूच्या संदर्भात काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला.तरी ती माहितीचा अतिषी यांनी मुख्यमंत्रीपदावर काम करण्यासाठी काडीचीही अडचण नाही.तरी लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधूनअतिषी यांचे बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
केजरीवाल यांनी दिल्लीला तिसऱ्या महिला व आम आदमी पक्षाच्या पहिल्या मुख्यमंत्री दिल्या आहेत. कार्यक्षम, वक्तृत्व, उत्तम प्रशासक म्हणून काम पाहिलेल्या,तरुण ,तडफदार आणि अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासातील नेत्या आहेत.
आतिषींना दु:ख ;पण ‘खडावा’ वाहणार …
निवड झाल्यानंतर लगेच त्त्यांनी सांगितले की अरविंद केजरीवाल हे माझे गुरु आहेत. मी केवळ त्यांचा खडावा वाहणार आहे.तरीही कोणताही प्रकारचा निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आहे.गेली काही महिने त्या महत्त्वाची खाती दिल्ली सरकारमध्ये संभाळत आहेत आणि महिलांना एक हजार रुपये देण्यात देण्याचे काम त्वरित त्यांच्याकडून केले जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील महिलांमध्ये त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघणार आहे.
‘ताशेरे’ आणि ‘पिंजऱ्यातील पक्षी’. …
या प्रकरणांमध्ये न्यायालयाने मोदी, शहा,सीबीआय, ईडी, यांच्यावर ताशेरे ओढले आहेत . मनिष शिसोदिया बाबतीतही हेच घडलेले आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्षाची नाचक्की झालेली आहे.भारतीय जनता पक्षाची देशभर नाचक्की झालेली होत आहे.काही कंत्राटदारांना माफीचे साक्षीदार बनवून देखील काही काहीच उपयोग झालेला नाही. उलट न्यायमूर्ती भुनिया यांनी सीबीआयला ,’ पिंजऱ्यातील पक्षी’ असे म्हटलेले आहे.श्री.अरविंद केजरीवाल यांची अटक केवळ तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे असे म्हटलेले आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे याचा अर्थ काय होतो?
एकूणच श्री.अरविंद केजरीवाल यांनी एका दगडात दोनच नाहीतर अनेक पक्षी मारलेले आहेत.याचा भारतीय जनता पक्षावर उलटा परिणाम होऊन येणार्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नुकसान होणार आहे !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com