
Contents
- 1 खेडकर वृद्ध दांपत्य फसवणुक प्रकरण : पुन्हा वृद्ध दांपत्य निराश?
खेडकर वृद्ध दांपत्य फसवणुक प्रकरण : पुन्हा वृद्ध दांपत्य निराश?
खेडकर वृद्ध दांपत्य फसवणुक प्रकरणात शिक्रापुर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी!
शिरूर ,दिनांक २९ ऑगस्ट २०२५ : |प्रतिनिधी |
खेडकर वृद्ध दांपत्य फसवणुक प्रकरण:न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील दत्तु उर्फ दत्तात्रय खेडकर (वय ८२) व गंगुबाई खेडकर (वय ७८) या वृद्ध दांपत्याने आपल्या मुलाविरुद्ध केलेल्या फसवणुकीच्या गंभीर प्रकरणी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आज पुन्हा एकदा या दांपत्याने शिक्रापूर पोलिसांकडे कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान सततच्या तणावामुळे व न्यायासाठी सुरू असलेल्या धावपळीमुळे वृद्ध दांपत्याची प्रकृती आणखीनच खालावली आहे. आज संध्याकाळी दत्तात्रय खेडकर यांना चक्कर येऊ लागल्याने तातडीने शिरुर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घराभोवती कोणीतरी संशयास्पदरित्या वावरत आहेत,त्यामुळे ते भयभीत झाले आहेत.असेही त्यांनी, ‘सत्यशोधक ‘शी बोलताना सांगितले आहे.
प्रकरणाचा आढावा—
• दांपत्याने आपल्या मुलावर मालकीहक्काची शेती व बंगला फसवून घेतल्याचा आरोप केला आहे.त्यांचे एटीम बनवुन परस्पर रक्कमही त्यांच्या खात्यातुन काढली गेली,असे त्यांच्या नंतर लक्षात आले. असे ते म्हणाले होते.
• या तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्रापुर पोलीस ठाण्यात अर्जही दाखल करण्यात आला आहे.
• मात्र पोलिसांनी अद्याप कसून चौकशी न केल्याने वृद्ध दांपत्य निराश झाले आहे.
दांपत्याची मागणी—-
“आम्ही पोलिसांकडे वारंवार फिर्याद करतो आहोत, पण तपास पुढे सरकत नाही. आमच्या फसवणुकीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी आज दत्तात्रय खेडकर यांनी केली.
गंगुबाई खेडकर यांनी सांगितले, “आमच्या वयात हे सर्व सहन होत नाही. चक्कर येऊन आज आम्हाला दवाखान्यात दाखल करावं लागलं. पण आम्हाला न्याय हवा आहे, म्हणून लढा थांबवणार नाही.”

गावकऱ्यांची भावना—
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. “आई-वडिलांची फसवणूक करणे हे मोठे अन्यायकारक आहे. पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
निष्कर्ष—
वृद्ध दांपत्याची तब्येत बिघडत असताना न्याय मिळण्यात होणारा विलंब हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. शिक्रापुर पोलिसांनी तातडीने तपासात गती द्यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
1. माता-पिता व जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, 2007 – India Code
2. Elder Line – राष्ट्रीय जेष्ठ नागरिक हेल्पलाईन (14567)
3. National Human Rights Commission of India – Senior Citizens Rights
4. National Legal Services Authority (NALSA)
5. Maharashtra Police – Citizen Services
‘सत्यशोधक’ च्या आणखीनच बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करुन•••
Prahaar Sanghatana News: शिरूरच्या कारेगाव येथे शेतकरी कर्जमाफीसाठी चक्का जाम आंदोलन
‘खेडकर वृद्ध दांपत्य फसवणूक’ प्रकरणात शिक्रापुर पोलिसांचा तपास अद्याप थांबलेला?