
शिरुर तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार टोळी हद्दपार – पोलिसांची कठोर कारवाई
शिरुर सह अनेक ठिकाणी गंभीर कारवाया केल्याने कारवाई !
Maharashtra News 3 April 2025: (Satyashodhak News Report)

शिरुर तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार टोळीला हद्दपार रण्याची पोलिसांची कठोर कारवाई पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी केली आहे.या टोळीने शिरुर सह अनेक ठिकाणी गंभीर कारवाया केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात टोळीवर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांना हद्दपार केले आहे.
संकेत संतोष महामुनी टोळी?—
शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत 2016 ते 2025 या कालावधीत विविध गंभीर गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या या टोळीचे नेतृत्व संकेत संतोष महामुनी आणि अभिषेक हनुमान मिसाळ उर्फ ‘घ्या’ (वय 23, सरदवाडी, ता. शिरूर) यांनी केले. टोळीमध्ये शुभम दत्तात्रय दळवी (सोनार आळी, शिरूर), गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय 30, गोळेगाव, शिरूर) तसेच इतर काही सदस्यांचा समावेश होता.
शिरुर परिसरात गुन्हेगारी कारवाया:
शिरूर आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने अनेक गुन्हे केले. गावठी पिस्तूल बाळगून खून करण्याचा प्रयत्न, दमदाटी, शिवीगाळ, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजवणे आणि गुन्हे करण्यासाठी चिथावणी देणे यासारखी कृत्ये टोळीने वारंवार केली.
शिरुर व पुणे पोलीस कारवाई:
पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी टोळीविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार, शिरूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत 2024 मध्ये टोळी पांगापांग करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत या गुन्हेगारांना पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा आणि अहिल्यानगर या भागातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला.
कारवाई करणारे अधिकारी–
पंकज देशमुख – पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक
प्रशांत ढोले – उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर
अविनाश शिळिमकर – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण
संदेश केंजळे – पोलिस निरीक्षक, शिरूर
शुभम चव्हाण – पोलिस उपनिरीक्षक
परशराम सांगळे, सचिन भोई, महेश बनकर, रामदास बाबर, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, रविंद्र आव्हाड, विजय शिंदे, अजय पाटील, निखील रावडे – पोलिस अंमलदार
शिरुर पोलिसांचा इशारा:
शिरूर, रांजणगाव एमआयडीसी आणि परिसरातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे.
Here’s more on the topic https://bediva.ru/
сделать заезд на участок через канаву цена под ключ .