
शिरुर तालुक्यातील महिलेला ,”तु माहेरुन सोने आण’ अशी मागणी करुन नातलगांकडुन काय छळ केला गेला ? वाचा सविस्तर!
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये 5 नातलगांवर गुन्हा दाखल !
शिरुर,दिनांक – 15 डिसेंबर : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर तालुक्यातील महिलेला ,”तु माहेरुन सोने आण’ अशी मागणी करुन नातलगांकडुन काय छळ केला गेला ? ते इथे सविस्तर वाचायला मिळेल. या प्रकरणात
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये 5 नातलगांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog——
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की तरी दिनांक २१/०९/२०२४ ते दिनांक १३/१२/२०२४ रोजी ८:०० वाजेपर्यंत वेळोवेळी फिर्यादी आकांक्षा शुभम मुळे, वय- 22 वर्ष, व्यवसाय , राहणार – तालुका पारनेर, जिल्हा- अहिल्यानगर.
यांना
• पती १) शुभम शिवाजी मुळे
• सासु २) कांचन शिवाजी मुळे
• दिर ३)सुजित शिवाजी मुळे तीघे
राहणार -किन्ही ,तालुका- पारनेर, जिल्हा- अहील्यानगर, तसेच त्यांचे
• पती यांची मावशी ४) काळुबाई काटे व
• त्यांचा मुलगा ५) ओंकार काटे रा. पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड
या सर्वांनी ,” तुला स्वयंपाक येत नाही.तुझ्या बापाने लग्नात मान पान केला नाही. लग्नात तुझ्या बापाने सोने घातले नाही. तु माहेरहुन १० तोळे सोने घेवुन ये.” असे म्हणुन फिर्यादी यांचा शारिरीक व मानसिक छळ जाचहाट केला आहे.त्यांना उपाशिपोटी ठेवुन शिवीगाळ, दमदाटी केली आहे. तसेच हाताने मारहाण केली आहे. म्हणुन त्यांनी वरील सर्वांवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये विरूध्द रितसर तक्रार दाखल केली आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
आरोपींवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कायदा कलम 85,115(2),352,351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.खेडकर हे आहेत.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. मोरे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक ,शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.