
Contents
मलठण येथे दुर्दैवी अपघात : १९ वर्षीय युवकाचा मृत्यू, आरोपी फरार
शिरूर, २३ एप्रिल २०२५ – (कल्पना पुडे यांच्याकडुन)
मलठण येथे दुर्दैवी अपघात घडला आहे.शिरूर तालुक्यातील मलठण येथे २२ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी रस्ते अपघातात एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. कवठे येमाई येथील गणेश रामदास शितकल (वय १९) हा आपल्या पल्सर मोटारसायकलवरून मलठणकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या मालवाहतूक टेम्पोने (क्र. एम एच १६ / सी डी / ६८५२) जोराची धडक दिली.
टेम्पोचालकाने मदत न करता निघुन गेला–
अपघातानंतर टेम्पोचालकाने मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. यात गणेश याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातामुळे मोटारसायकल तसेच टेम्पोचेही मोठे नुकसान झाले.
मामा कैलास बबन कुळके यांनी तक्रार दिली—
या प्रकरणी गणेश याचा मामा कैलास बबन कुळके (रा. कवठे येमाई, वय ३५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गु.र.नं. २६७/२०२५ नुसार विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची तपशीलवार माहिती:
गुन्हा दाखल तारीख: २३ एप्रिल २०२५, वेळ: ०२:२६ वाजता, स्टेशन डायरी क्रमांक ०८/२०२५
• मयत: गणेश रामदास शितकल (वय १९)
• आरोपी वाहन: महिंद्रा सुप्रो टेम्पो (एम एच १६ / सी डी / ६८५२)
• फिर्यादी: कैलास बबन कुळके
• दाखल अमलदार: पोहवा गवळी
• तपास अधिकारी: पोहवा बनकर
• प्रभारी अधिकारी: मा. संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन
शिरूर पोलीस टेम्पोचालकाचा शोध घेत असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास प्रभारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …