
Contents
- 1 ‘मामाच्या गावाला जाऊया’ लघुपट प्रदर्शित : ग्रामीण जीवन, कौटुंबिक नाती व बालपणीच्या आठवणींचा नवा अनुभव
‘मामाच्या गावाला जाऊया’ लघुपट प्रदर्शित : ग्रामीण जीवन, कौटुंबिक नाती व बालपणीच्या आठवणींचा नवा अनुभव
(अभिनेते सुनिल गोडबोले)
‘मामाच्या गावाला जाऊया’ : रामदास बबन राऊत यांची नवीन निर्मिती ! सुंदर अनुभव !
श्रीगोंदा ,अहिल्यानगर दिनांक २९ ऑगस्ट २०२५| प्रतिनिध |

‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन‘ निर्मित व दिग्दर्शक लेखक रामदासजी राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘मामाच्या गावाला जाऊया’ हा लघु चित्रपट नुकताच मौजे हिंगणी ,तालुका- श्रीगोंदा, जिल्हा ,अहिल्यानगर येथे चित्रित करण्यात आला आहे. आता तो ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे.

या लघुपटाचे कथानक संपूर्ण ग्रामीण भागातील आहे. निसर्गरम्य वातावरणात कौटुंबिक नात्यांची उब, बालपणीच्या आठवणी , गावाकडील मायेचा ओलावा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये—-
यातील कलाकार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मंगळवेढा आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांतून सहभागी झाले आहेत.

या चित्रपटासाठी उद्योजिका चंद्रकला ताई आवटी (तिरुपती उद्योग समूह, पारनेर) विशेष उपस्थित होत्या. त्यांची चार नातवंडे बालकलाकार म्हणून या फिल्म मधे झळकली आहेत.
श्री.रामदास राऊत सर गेल्या पाच वर्षांपासून ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’च्या माध्यमातून शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, लावणी, बतावणी, कविता, लोकगीत, हास्याचा धिंगाणा आर्केस्ट्रा अशा विविध प्रकल्पांची निर्मिती करत आहेत.केली आहे.
‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’च्या चे अनेक शो व कार्यक्रम आपण खालील लिंकवर क्लिक करून ••••
https://youtube.com/@truptifilmproduction4659
प्रेक्षकांचा प्रतिसाद–
चित्रपटाला पहिल्याच प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
🔻 उद्योजिका चंद्रकला ताई आवटी म्हणाल्या, “या चित्रपटातून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. निसर्ग आणि कौटुंबिक नात्यांचे दर्शन घडते.”
🔻 गणेश गुंजाळ यांनी सांगितले, “कलाकार, तांत्रिक बाजू व वेशभूषा उत्कृष्ट आहे. हा प्रवास यशस्वी ठरेल.”
🔻 संतोष वीर (नाना दूध डेरी) यांनीही सर्व कलाकारांचे कौतुक करून, “बालपण जागं झालं” अशी प्रतिक्रिया दिली.
🔻 विकास अत्रे (पुणे शहर पोलीस) यांनी चित्रपटातील गावाकडील खेळ, बैलगाडी, निसर्गदर्शन व ग्रामीण संस्कृती याचे कौतुक केले. मात्र, “बालकलाकारांना अधिक वाव दिला असता तर चित्रपट अजून सुंदर झाला असता” अशीही त्यांनी सूचनात्मक नोंद केली.
निर्मितीमागील हेतू—-
निर्माते-दिग्दर्शक रामदासजी राऊत यांनी सांगितले की, “पन्नास वर्षांपूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती, नातीतील जिव्हाळा, माया यांचे सांस्कृतिक दर्शन या लघुपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”
📌 अधिक मनोरंजक माहितीसाठी या संकेतस्थळांना भेट द्या ••••
Trupti Film Production YouTube Channel
Short Films in India – Film Companion
Gramin Sanskruti Information – Maharashtra Gov