
Contents
- 1 मांडवगण फराटा येथील अवधूत ज्वेलर्समध्ये चोरी:दोन महिलांची केली ३२,००० रुपयांच्या अंगठीची चोरी !
मांडवगण फराटा येथील अवधूत ज्वेलर्समध्ये चोरी:दोन महिलांची केली ३२,००० रुपयांच्या अंगठीची चोरी !
मांडवगण फराटा येथील अवधूत ज्वेलर्समध्ये चोरी:शिरूर पोलिसांकडे गुन्हा दाखल !
शिरुर,दिनांक 5 मे 2025: (प्रकाश करडे यांच्याकडुन )

मांडवगण फराटा येथील अवधूत ज्वेलर्समध्ये चोरी:मांडवगण फराटा, शिरूर (पुणे) ५ मे २०२५ रोजी ही घटना घडली आहे.शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात ३ मे २०२५ रोजी दुपारी ४.३० ते ४.४५ दरम्यान अवधूत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात दोन अज्ञात महिला ग्राहक म्हणून आल्या आणि दुकानदाराचे लक्ष विचलित करून तब्बल ३२,००० रुपयांची कलकत्ती ए रिंग चोरी करून पसार झाल्या.
महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला–
या प्रकरणी अमोल कचरू दहिवाळ (वय ३४, व्यवसाय – सराफ, राहणार – रौनिकनगर सोसायटी, दौंड, पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी अमोल आणि त्याचा भाऊ योगेश दुकानात उपस्थित असताना आरोपी महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला आणि संधी साधून ४ ग्रॅम २०० मि.ली वजनाची, ३२,००० रुपये किमतीची अंगठी चोरी केली.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल —

या घटनेची तक्रार शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ४ मे २०२५ रोजी स्टे क्र. १८ अंतर्गत दाखल करण्यात आली असून गुन्हा क्रमांक ३०२/२०२५ प्रमाणे भारतीय दंड संहिता कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत–
या प्रकरणाचा तपास स. फौ. कदम हे करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. श्री. संदेश केंजाळे कार्यरत आहेत. चोरी करणाऱ्या दोन अज्ञात महिलांचा शोध सुरु असून, परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन:
या दोन अज्ञात महिलांविषयी कुणाला काही माहिती असल्यास शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…